Search

अननस काढणी पश्चात तंत्रज्ञान

अननस काढणी पश्चात तंत्रज्ञान

buttons eng-min

अननस या फळाची लागवड करताना आपण व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती आपण अननस लागवडया लेखात जाणून घेतले.

Nature-Fruits-Pineapple

अननस काढणी पश्चात तंत्रज्ञानया लेखात आपण काढणी पूर्व आणि काढणी पश्चात महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकूया.

सिंचन :

Irrigation of Pineapple

अननस हे पीक पावसाच्या पाण्यावर चांगले होऊ शकते. मात्र ज्या भागात पाऊस कमी असेल अशा ठिकाणी अतिरिक्त पाणी व्यवस्थापन करताना सिंचन करणे फायदेशीर ठरू शकते.

आंतरमशागत :

Weed control in Pineapple

या पिकासाठी वर्षातून तीन ते चार वेळा तणनियंत्रण केले जाऊ शकते. हाताने तसेच तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करणे शक्य आहे. तण नियंत्रकांमध्ये ड्यूरॉन२ किलो प्रति हेक्टर किंवा ड्यूरॉनआणि ब्रोमासिलयांचा संयोग २ किलो प्रति हेक्टर वापरावे. तसेच पहिल्या फवारणीनंतर ५ महिन्यांनी दुसरी फवारणी करावी.

मल्चिंग :

Straw mulching - Pineapple Pineapple mulching

सुकलेली पाने किंवा सुकलेलं गवत यांचा मल्चिंग साठी वापर करता येऊ शकतो. काळ्या पॉलिथिन चे मल्चिंग आणि लाकडाच्या भुश्श्याचे मल्चिंग अतिशय प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे. फळ पक्व झाले असता पाने किंवा वाळलेले गवत यांनी ते झाकून ठेवले तर पक्ष्यांपासून होणारे नुकसान रोखता येऊ शकते.

रोपाची निगा राखणे :

कीटक :

अननस या फळावर शक्यतो कीटकांचा हल्ला होत नाही मात्र क्वचितच पिठ्या ढेकणासारख्या रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

रोग :

अननस या फळावर खोड कूज या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगनियंत्रणासाठी लागवडीपूर्वी पाण्याचा योग्य निचरा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच लागवडीपूर्वी कंद बोर्डो मिश्रणात बुडवणे आवश्यक आहे.

काढणी आणि उत्पादन :

Harvesting of Pineapple

अननस या फळाला १२१५ महिन्यात फुलधारणा होते तर साधारणपणे १५ ते १८ महिन्यात फळ तयार होते. यामध्ये लागवडीसाठी कोणती जात निवडली आहे तसेच लागवड कशी आणि केव्हा केली आहे? हे महत्वाचे मुद्दे आहेत. बंद डब्ब्यांमध्ये फळांची विक्री करतांना काढणी काहीशी आधी केली जाते.

canned-pineapple-250x250

तर सर्वसाधारण पाने विक्री करताना फळ पिवळ्या रंगाचे झाले कि काढणी केली जाते. साधारणपणे प्रति हेक्टरी ५० ते ८० टन उत्पादन शक्य आहे.

काढणी पश्चात व्यवस्थापन :

प्रतवारी :

Grading of pineapple

वजन, आकार आणि रंग यावर फळाची प्रतवारी केली जाते.

साठवण :

pineapple fruit

शेंड्यासह असलेले फळ १० ते १५ दिवस सुस्थितीत राहू शकते. १० ते १३ अंश तापमानात रेफ्रिजरेट केल्यास २० दिवसापर्यंत फळाची साठवण करता येऊ शकते.

पॅकिंग :

packing of pineapple1

बाजारात विक्रीसाठी नेताना फलनाचे नुकसान होणार नाही याचा विचार करून काळजीपूर्वक पॅकिंग करणे गरजेचे आहे. वाहतूकीदरम्यान फळे हळू नये यासाठी भाताच्या कोंढ्याचा वापर केला जाऊ शकतो. तर काही वेळा नरम पुठ्ठा किंवा जाड कागदाने फळे झाकून पॅकिंग केले जाते.

वाहतूक :

pineapple transportation

 

ट्रक किंवा टेम्पो च्या माध्यमातून वाहतूक केली जाते कारण या वाहतूक साधनांचा वापर करून रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून थेट बाजारात माल पोहोचविणे शक्य होते.

विपणन :

transportation of pineapple

उत्पादक त्यांच्या मालाची विक्री दलाल किंवा आडते यांच्या माध्यमातून करतात. बहुतांश उत्पादक त्यांचा माल दलाल किंवा मध्यस्ताच्या मदतीने गाव पातळीवर किंवा बाजारात विकतात.

संदर्भ : उद्यानविद्या विभाग भारत सरकार

इमेज संदर्भ – गुगल इमेजेस

Related posts

Shares