Search

आपत्कालीन पीक व्यवस्थापन

आपत्कालीन पीक व्यवस्थापन

 

सद्यस्थितीत पावसाचे आगमन लांबल्यामुळे भात रोपवाटीकेचे खालीलप्रमाणे व्यवस्थापन करावे.

dryland paddy

१. ज्या शेतकऱ्यांकडे  संरक्षित पाणी उपलब्ध आहे व ज्यांची २५-३० दिवसांची रोपे तयार आहेत, त्यांनी रोपवाटिकेस शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी बेताचे पाणी द्यावे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर  पुर्नलागवड करतांना रोपांची संक्या वाढवून म्हणजेच ३-४ रोपे प्रती चुड लागवड करावि. रोपांचे अंतर हळव्या वाणांसाठी १५ सेमी. x १५ सेमी. तसेच निमगरव्या व गरव्या वाणांसाठी २० सेमी x १५ सेमी ठेवावे.

२. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणी उपलब्ध आहे व ज्यांची रोपे १५ दिवसांची तयार आहेत त्यांनी रोपवाटिकेस रोपांच्या जोमदार वाढीसाठी प्रति गुंठा १ किलो युरिया खत द्यावे. त्यांनी रोपवाटीकेस सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. पाऊस सुरु झाल्यावर पुर्नलागवड करतांना रोपांची संख्या २-३ प्रती चूड ठेवावी.

३. भात रोप तयार करण्यासाठी थोडी उंचवट्याची जागा निवडावी व चारही बाजूने खोलगट चरी काढावी. त्यामळे जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. अशा शेतकऱ्यांनी पुर्नलागवड योग्य वेळेत होण्यासाठी कमी वयाची ( १४ दिवसापासून पुढील ) रोपे वापरावीत.

४. काही कारणास्तव लागण पद्धतीसाठी भात रोपे तयार करता न आल्यास व हंगाम वाया जाउ नये यासाठी ‘ रहू पद्धत ‘ वापरावी त्याचा कमी कालावधीत रोपे तयार करण्यासाठी उपयोग होतो.

उन्हाळी बागायती कापूस

१. बीटि कापसाची १ ते १० जूनपर्यंत लागवड झालेल्या कापूस पिकास पाण्याचा पान पडल्याने कपाशीची वाढ खुपच कमी झालेली असून त्यावर आकस्मित मार व विकृती प्रादुर्भाव १०-७० टक्के पर्यंत झालेला आहे.

उपाययोजना

पाण्याचा ताण पडू देवू नये. सरिआड सरी पद्धतीने पाणी द्यावे. शक्य असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. पिकास प्रती एकरी २५ किलो युरिया + २५ किलो पालाश खत जमिनीतून द्यावे.

 

पिकास २ % पोट्याशिअम नायट्रेटची फवारणी करावी. पिकास ८ % केवोलीनची  फवारणी करवि. आकस्मित मर विकृती लक्षणे दिसू लागताच १.५ किलो युरिया + १.५ किलो पालाश प्रती १०० लि. पाण्यात मिसळून १५० ते २०० मिली द्रावण विकृतीग्रस्त झाडांच्या बुंध्याभोवती ओतावे.  यानंतर ८-१० दिवसांनी २ किलो डीएपी खत १०० लीटर पाण्यात लीटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे  व हे द्रावण १५०-२०० मिली विकृतीग्रस्त झाडाच्या बुंध्याभोवती ओतावे.

खरीपातील कापूस लागवड

मध्यम खोल ते खोल जमिनीत बीटी कपाशीची लागवड १५ जुलै पर्यंतच करवी. लागवड ९० सेमी  x ६० सेमी अंतरावर करावी. लागवड ९० सेमी x ६० सेमी अंतरावर करावी. नंदुरबार, धुळे, जळगांव येथील शेतकऱ्यांनी उशिरा जिरायत पेरणीसाठी देशी संकरीत कापशिचेच वाण वापरावेत. ( उदा. जेएलए – ७९४, एकेए – ७, अंबिका – १२ व १८, स्वदेशी – ५, अंकुर – ६५१ इ.)

अवर्षणातील ऊस व्यवस्थापन

अतिरिक्त ऊस असेल तर चारा म्हणून उपयोग करावा व त्याचे पाचट हे उर्वरित ऊस पिकामध्ये पसरून द्यावे. ८%  केवोलीनची फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास शिफारशीप्रमाणे जमिनीतून पालाश अन्नद्रव्ये दिले नसल्यास ११५ किलो पालाश प्रती हेक्टरी पाण्याच्या आगोदर द्यावे. पाण्याची उपलब्धता नसल्यास ऊस पिकास फवारणीद्वारे १०० ग्राम  १९:१९:१९ आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत ( ग्रेड-२) ५० मिली  प्रती १० लि. पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून दोन वेळा फवारण्या कराव्यात.

अशाप्रकारे आपण योग्य नियोजन केल्यास आपल्याला याचा फायदा निश्चितच होउ शकेल.

स्त्रोत : म.फु.कृषि विद्यापीठ, राहुरी,कृषी माहीती तंत्रज्ञान केंद्र

Related posts

Shares