Search

कसे कराल रोगमुक्त भात खाचर ???

कसे कराल रोगमुक्त भात खाचर ???

पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे चांगले बी – बियाणे, नव्या लागवड पद्धती, पिकांची योग्य काळजी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पिकाचे रोगांपासून संरक्षण कसे करावे याविषयी माहिती शेतकऱ्यांना असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

) कडा करपा (Bacterial blight) : 

 

या रोगाचे जीवाणू रोपे उपटताना मुळांना होणारी इजा, नैसर्गिक कारणांमुळे पानांना होणारी इजा, लावणीपूर्वी रोपांची पाने खुडण्यामुळे पानांना होणारी इजा आणि पानांवरील नैसर्गिक छिद्रे इत्यादींमुळे रोपांच्या शरीरात प्रवेश करतात आणि रोगाची लागण होते.

रोगाची लक्षणे :kada karpa

 • प्राथमिक अवस्थेत रोगग्रस्त पानांच्या एका किंवा दोन्ही कडांवर शेंड्याकडून खोडाकडे फिकट पिवळसर हिरवट रेषा निर्माण होतात. कालांतराने ह्या रेषा वरून खाली आणि पानाच्या आतील बाजूला मध्यशिरेकडे वाढतात आणि पानांवर राखाडी किंवा तांबूस रंगाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यांच्या कडा नागमोडी असतात. पुढे पाने करपून वाळतात.
  २. रोगाचे जीवाणू तुटलेल्या मुळांतून किंवा खुडलेल्या पानांतून अन्ननलिकेत प्रवेश करतात आणि अणूजीव आंतरप्रवाही होतात. रोगग्रस्त चुडांची पाने हिरवट करड्या रंगाची होऊन दोन्ही कडांकडून आतील भागाला पुंगळीसारखी मोडतात. चुडातील संपूर्ण पाने करपून फाटतात

नियंत्रण :

 • १,३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळून घ्यावे. द्रावणात भात बियाणे ढवळून घ्यावे. तरंगणारे बियाणे/पळींज गोळा करून नष्ट करावे. तळाचे बियाणे पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे.
  २) वरील बियाण्यास दर किलो मागे २५ मिली जर्मिनेटरबरोबर २.५ ग्रॅम पारायुक्त बुरशीनाशक किंवा कॅप्टॉंन किंवा थायरम पेरणीपूर्वी चोळावे
  ३) धसकटे गोळा करून जाळावीत.

) करपा (Xantomonos oryseae) :

करपा हा बुरशीजन्य रोग आहे.

रोगाची लक्षणे :

karpa bhat

 • झाडांच्या पानांवर, पेरांवर आणि ओंबीच्या देठांशी दिसून येतात. रोगाची सुरुवात पानांवर बारीक हिरवट पिवळसर आणि भिजट ठिपके पडून होते. कालांतराने ठिपक्याचे आकारमान वाढत जाते.
 • त्यांच्या कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आतील भाग राखाडी रंगाचा असतो. रोगास जास्त बळी पडणाऱ्या जातींवर ठिपक्यांची संख्या आणि आकार मोठा असून दोन किंवा अधिक ठिपके एकत्र मिसळून पानांवर राखाडी रंगाचे चट्टे पडतात आणि संपूर्ण पान करपते.

नियंत्रण :

 • हेक्टरी ५०० लिटर पाण्यात १ लि. थ्राईवर + ७५० मिली हार्मोनी किंवा १२५० ग्रॅम बावीस्टीन किंवा डायफोलेटॉंन किंवा ५०० मि.लि. एडीफेनफॉस यापैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी रोगाची लक्षणे दिसल्यास करावी व नंतर रोगाची तीव्रता बधून दर पंधरा दिवसांनी नंतरच्या फवारण्या कराव्यात

) शेंडे करपा (Leafscald) :

leafscald

हा बुरशीजन्य रोग आहे.

रोगाची लक्षणे :

रोगग्रस्त पानांचे शेंडे वरून खाली करपतात आणि रोगग्रस्त पाने सूर्यप्रकाशात धरल्यास रोगट भागावर गर्द तपकिरी पट्टे ठराविक अंतराने दिसतात. दोन पट्ट्यांमधील भाग फिक्कट तपकिरी रंगाचा असतो. रोगग्रस्त भागावर सुपारी कातरल्यासारखी नक्षी दिसते.

रोगाची लक्षणे कधी – कधी पानांच्या पृष्ठभागावर कडेला धरून कुठेही उद्भवतात

नियंत्रण :

 • धसकटे गोळा करून नष्ट करावीत.
 • बांधबंदिस्ती आणि बांधावरील गवत व इतर तणे काढावीत.
 • रोग प्रतिकारक किंवा रोगास कमी बळी पडणाऱ्या भात जातींची लागवड करावी.
 • नत्र खताचा योग्य वापर करावा.
 • 25 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा सहा ग्रॅम ट्रायसायक्‍लोझोल किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. बुरशीनाशकाच्या द्रावणात 20 मि.लि. चिकट द्राव (स्टिकर) वापरावा. रोगाच्या तीव्रतेनुसार दोन ते तीन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात.

संदर्भ : किड व्यवस्थापन विभाग, डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ.

Related posts

Shares