Search

दोन्ही हंगामात घ्या कारली आणि दोडक्याचे पिक भाग – १

दोन्ही हंगामात घ्या कारली आणि दोडक्याचे पिक भाग – १

रब्बीच्या मोसमात विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. यामध्ये, अनेक वेलवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करताना विशेष काळजी घ्यावी लागते. अशा या वेलवर्गीय भाज्यांमध्ये साधर्म्य असलेल्या भाज्या म्हणजे कारली आणि दोडका. या दोन्ही भाज्यांच्या वाढीच्या सवयीमध्ये साधर्म्य आढळते. यामुळेच, त्यांच्या मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत. या दोन्ही भाज्यांची लागवड फायद्याची ठरू शकते कारण कारल्याला परदेशात तसंच मोठया शहरात तर दोडक्या ला स्थाननिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
हवामान
कारले किंवा दोडका हि दोन्ही पिके कोणत्याही हंगामात येऊ शकतात. पावसाळा असो किंवा उन्हाळा दोन्ही हंगामात कारली आणि दोडक्याची लागवड करता येऊ शकते. कारल्याऊस उष्ण. व दमट हवामान तर दोडक्या स समशितोष्णा व दमट हवामान मानवते. दोडक्याला थंडी मानवते मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
जमीन
कारली आणि दोडका या वेलवर्गीय भाज्या आहेत. वेलवर्गीय भाज्यांना पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते. कारले आणि दोडक्याची लागवड करताना भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यणम जमीन निवडावी. चिकणमाती किंवा पाण्याच्या नीचऱ्यास बाधक जमिनीची निवड करू नये.
पूर्वमशागत व लागवड
कोणत्याही बियाण्याची लागवड करण्याआधी जमिनीची पूर्वमशागत करणे गरजेचे असते. भाजीपाल्याची लागवड करण्यापूर्वी जमीनीची उभी आडवी नांगरट करावी. नागरणी करून झाल्यानंतर वर आलेल्या तणांचे व गवतांचे तुकडे वेचून शेत स्वजच्छ करावे. यानंतर मातीची मशागत करावी यासाठी प्रति हेक्ट री १०० ते १५० क्विंटल शेणखत किंवा कंपोस्टेखत कुळवणी करून जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. कारल्याची लागवड करायची असल्यास दोन ओळीत १. ५ ते २ मिटर व दोन वेलीत ६० सेमी अंतर ठेवावे. दोडक्याचसाठी दोन ओळी २. ५ ते ३. ५ मिटर वर दोन वेलीत ८० ते १२० सेमी अंतर ठेवतात. प्रत्येतक ठिकाणी २ ते ३ बिया लावतात. दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत. बिया वरंब्यावच्याग बगलेत टोकाव्याीत. उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे.
हंगाम
कारल्याची लागवड उन्हााळी हंगामात करायची झाल्यास जानेवारी फेब्रूवारी महिन्याचत केली जाते. उशिरात उशिरा मार्चमध्येल सुध्दाह उन्हाळी हंगामातील कारल्याची लागवड करतात. खरीपाची हंगामात साधारणपणे जून जूलै महिन्याात कारल्याची लागवड केली जाते. दोडक्याचे उत्पादन कमी दिवसात येणारा असल्याामुळे त्या ची लागवड कारल्यानपेक्षा १५ ते २० दिवसांनी उशिरा केली तरी चालते.

आणि या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण बियाण्याचे प्रमाण, खते व पाणी व्यवस्थाापन, आंतरशागत, रोग व कीड प्रतिबंध आणि काढणी व उत्पातदन अशा विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकूया.

Related posts

Shares