Search

देस्ताटॉक हा देस्ताग्लोबल या भारतीय कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीचा एक उपक्रम आहे. शेतीविषयक समस्या एकाच छताखाली सोडवता याव्यात; या हेतूने कंपनीने देस्ताटॉकची निर्मिती केली आहे.

उद्देश

शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात भेडसावणाऱ्या समस्या दूर करून त्यांचे जीवनमान उंचावणे; हा देस्ताटॉकचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आपल्या वेबसाईटवर अत्यंत सोप्या व सुलभ भाषेतील शेतीविषयक लेख प्रकाशित करण्याचे कार्य देस्ताटॉकद्वारे केले जाते. देस्ताटॉक च्या लेखांमध्ये हाताळले जाणारे प्रमुख विषय:

  • आधुनिक शेती
  • हवामान
  • यशोगाथा
  • नवीन शोध
  • शासकीय योजना

आत्तापर्यंतची मजल

  • 20,000+ प्रतिमहिना वेबसाईट व्हिजिटर
  • 30,000+ फेसबुक पेज फॉलोअर
  • 20,000+ रजिस्टर्ड सदस्य

देस्ताटॉकद्वारे राबवले जाणारे उपक्रम

वेबसाईटवरील लेखांबरोबरच देस्ताटॉकचे कृषीतज्ञ फेसबुक, व्हॉट्सअप आणि फोनकॉल मार्फत शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवतात.
तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी विविध ऑनलाईन स्पर्धा, कार्यशाळा, मेळावे इत्यादींचे आयोजनदेखील केले जाते.