Search

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला अक्षय कुमार सरसावला

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला अक्षय कुमार सरसावला
[Total: 0    Average: 0/5]

एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळली कि कलाकार नेहमीच सरसावतात हे चित्र आपण नेहमीच पहिले आहे. कारण कलाकार हळवा असतो. सध्या अवघ्या महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी समाजाच्या विविध थरातून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. राज्य सरकारने दुष्काळ ग्रस्त भागात जनावरांसाठी चार छावण्या सुरु केल्या आहेत. तर, महाराष्ट्रातील पाणी टंचाई वर मात व्हावी यासाठी राज्यासरकाराने कंबर कसली आहे.

दुष्काळ ग्रस्त आणि कर्जाच्या बोझ्याखाली दबून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला सगळ्यात आधी पुढे आले ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. त्यांच्या बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या मदतीसाठी आपला हात पुढे केला. दोन दिवसापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज अजिंक्य राहणे याने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीत आपला खारीचा वाटा  उचलला. यावेळी आपली ९० वर्षांची आजी आजही शेती करते, सध्या महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाले असताना त्यांना मदत करणे गरजेच होत असे अजिंक्य सांगतो.

महारष्ट्रात मुख्यत्वे मराठवाड्यात या दुष्काळाची परिस्थिती अतिशय विदारक आहे. या भागातील शेतकरी नैराश्यात आत्महत्येचा मार्ग स्वीकारत  होते. बॉलीवुड मधील सुपरस्टार अक्षय कुमार आता शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावला आहे. अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांसाठी  ९० लाख रुपयांची मदत करणार  असल्याचे वृत्त असून येत्या सहा महिन्यात हे पैसे देण्यात येतील असे समजते.

सध्या शेतकऱ्यांच्या मदतीला विविध स्तरातून मदत केली जात आहे. क्रीडा क्षेत्रातील काही मान्यवर अशा प्रकारे मदत करण्यासाठी पुढे येतील असा विश्वास व्यक्त होतो आहे. अक्षय पाठोपाठ आता बॉलिवूड मधील इतर सेलिब्रिटी देखील मदतीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. यामुळे, दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर काही प्रमाणात मदत होईल. पण, सगळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले असताना आपण कुठे आहोत? आपल्याला अन्न पुरविण्यासाठी घाम गळून अविरत मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे आपले कर्तव्य नाही का? याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण, समस्या गंभीर आहे. तुमची मोलाची मदत शेतकऱ्याच्या जीवनात काही प्रमाणात बदल घडविण्यास कारणीभूत ठरू शकते, तुमच्या मदतीने त्यांच्या घरातल्या चिमुकल्याच्या डोळ्यात आनंदाची झळक दिसू शकते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर येण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरू शकता. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा जर शेतकरी जगाला तर तुम्ही जगाल.

 

फोटो कर्टसी : गुगल इमेज

Related posts

Shares