Search

मुंबई कृषी उत्पन्न  बाजार समिती आणि सोलापूर येथील काही उत्पादनांचा आढावा  

मुंबई कृषी उत्पन्न  बाजार समिती आणि सोलापूर येथील काही उत्पादनांचा आढावा  

मुंबईमध्ये भेंडी 2500 ते 3400 रुपये

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 12) भेंडीची 330 क्विंटल आवक झाली. भेंडीला 2500 ते 3400 व सरासरी 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

 

बाजार समितीतील शेतमालाची आवक स्थिर असून, मंगळवारी मार्केटमध्ये 550 ट्रक भाजीपाला आवक झाली होती. सोमवारी (ता. 11) बाजार समितीमध्ये लसणाची 1560 क्विंटल आवक झाली. लसणाला 1100 ते 4550 व सरासरी 2850 रुपये प्रतिक्विंटल दर होता. कांद्याची 14400 क्विंटल आवक होऊन रुपये 1200 ते 1400 व सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल दर होते. बटाट्याची 10560 क्विंटल आवक झाली होती.

 

वाढत्या उष्म्यामुळे लिंबांस मागणी वाढली आहे. वाशी समितीतील सोमवारी लिंबाला 200 ते 300 रुपयांदरम्यान प्रतिशेकडा दर होता. फ्लॉवरची 1860 क्विंटल आवक झाली. त्यास 800 ते 1200 व सरासरी 1000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. गवारीला 2200 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल दर होता. शेवगाची 350 क्विंटल आवक झाली. शेवग्यास 1200 ते 1600 व सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल दर होता. टोमॅटो (नं.1) ची 3240 क्विंटल आवक झाली. टोमॅटोस 1400 ते 1600 व सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल दर होता. हिरव्या मिरचीची 1220 क्विंटल आवक झाली. मिरचीस 3000 ते 3200 व सरासरी 3100 रुपये प्रतिक्विंटल दर होता. वांगीची 380 क्विंटल आवक होऊन 1200 ते 1600 व सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल दर होता. वाटाण्याची 600 क्विंटल आवक झाली. वाटाण्यास 5000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल दर होता.

सोलापुरात कांदा वधारला

सोलापूर – येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात आवक वाढूनही कांद्याचे दर वधारले होते. कांद्यास 250 ते 1800 व सरासरी 1000 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

 

बाजार समितीत गतसप्ताहात कांद्याची रोज 100 ते 150 गाड्या आवक झाली. ही सर्व आवक पुणे, नगर, उस्मानाबाद या बाहेरील जिल्ह्यांतून होती. जिल्ह्यातील आवक तुलनेने अगदीच कमी होती. आवक वाढूनही कांद्याला मागणी सर्वाधिक राहिल्याने कांद्याच्या दरात तेजी राहिली. विशेषतः कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांदा खरेदीसाठी व्यापारी इथे दाखल झाले. सर्वाधिक कांदा या राज्यांतच गेला. गेल्या सप्ताहात जवळपास 700 गाड्या बाहेर गेल्या. गेल्या महिन्यापासून कांद्याचा दर तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाला होता. त्यात मोठ्या फरकाने तेजी होती. खरिपातील कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर असेच तेजीत राहतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याशिवाय बाजारात लसणाची आवकही चांगली राहिली. लसणाची रोज 10 ते 20 गाड्या आवक राहिली; पण ही सर्व आवक स्थानिक भागातून राहिली. लसणाला प्रतिक्विंटल किमान 1900 रुपये, सरासरी 3500 रुपये आणि कमाल 4000 रुपये दर होता.

भाजीपाला बाजारातील तेजी या सप्ताहात पुन्हा कायम होती. विशेषतः कोथिंबीर, मेथी, शेपूला मागणी वाढली होती. भाज्यांची आवक रोज सरासरी पाच ते दहा हजार पेंढ्यांपर्यंत झाली. भाज्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी किमान 400 रुपये, सरासरी 800 रुपये आणि सर्वाधिक 1400 रुपये, मेथीला किमान 300 रुपये, सरासरी 500 रुपये आणि सर्वाधिक 700 रुपये, शेपूला किमान 200 रुपये, सरासरी 400 रुपये आणि सर्वाधिक 600 रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, टोमॅटो आणि वांग्यालाही काहीशी मागणी वाढली. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी 150 ते 300 रुपये, टोमॅटोला 100 ते 140 रुपये आणि वांग्याला 150 ते 200 रुपये दर होता.

 

Related posts

Shares