Search

सुपारी लागवड

सुपारी लागवड

प्राचीन काळापासून सुपारीचा वापर विविध धार्मिक कामांमध्ये केला जातो. तसेच भारतात खाण्यासाठी देखील सुपारीचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. सुपारीला उष्ण व दमट हवा लागते. शिवाय समुद्रकिनार्यापासून फार लांब अंतरावर ती होत नाहीं. डोंगरी बागाइती जमीनींत सुपारी लागवड करतात व तिच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत.

 

सुपारीमध्ये प्रामुख्याने दोन जाती आहेत पांढरी सुपारी आणि लाल सुपारी.सुपारी

) पांढऱ्या सुपारीच्या जाती:— गोवी; मंगळुरी; रूपसई; कलकत्ता; असिग्री; शिरसी; श्रीवर्धनी.

) लाल सुपारीच्या जाती:— मलबारी; कुमठा; मुरारकडी; गोंवा; वसई; सेपळी; मालवणी; वेंगुर्ला; कलकत्ता.

लागवड कशी कराल?

सुपारी

 • श्रीवर्धनी जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो.
 • योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन कि.ग्रॅ. उत्पादन मिळते. लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत.
 • लागवड करण्यासाठी 2.7 x 2.7 मीटर अंतरावर 60 सें.मी. x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.
 • त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा.
 • लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, 12 ते 18 महिने वयाची रोपे निवडावीत.
 • रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत.
 • उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी.
 • रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.

सुपारी

 • सुपारीस खतांचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि दुसरा हफ्ता डिसेम्बर जानेवारी महिन्यात द्यावा.
 • खते झाडाच्या बुंध्यापासून १ मीटर अंतरावर १५२० से.मी. खोल आणि २० से.मी. रुंदीच्या चरात बांगडी पद्धतीत द्यावीत.
 • सुपारीच्या पिकास जमीन व हवामानानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
 • उन्हाळ्यात व हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • पाणी देण्यास १५ दिवसांहून अधिक विलंब झाल्यास पावसाळ्यात फळे फुटून मोठया प्रमाणात गळतात.

संदर्भ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.

Related posts

Shares