Search

इस्रो च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे भारताची अंतराळातील वेधशाळा कार्यान्वित होणार …

इस्रो च्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे  भारताची अंतराळातील वेधशाळा कार्यान्वित होणार …
[Total: 0    Average: 0/5]

‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे  भारताची अंतराळातील वेधशाळा कार्यान्वित होणार भारत जगभरात दिवसागणिक आपली प्रतिमा अधिकाधिक उज्वल करत चालला आहे. विविध क्षेत्रांमधील भारताची घौड दौड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. खगोल शास्त्र, वैद्यकीय क्षेत्र, अंतराळ संशोधन अशा विविध आघाड्यांवर भारत दिवसागणिक प्रगती करत चालला आहे. १९७५ साली ” आर्यभट्ट” हा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने खगोल क्षेत्रात आपण लवकरच सक्रिय होणार याचे सुतोवाच केले होते. या नंतर दूरसंचार तसेच विविध महत्वपूर्ण बाबींसाठी भारताने विविध उपग्रह प्रक्षेपित  केले.

चांद्रयान आणि मंगलयान  अशा विविध महत्वाकांक्षी योजना सफल करत भारताने अंतराळ संशोधनात मोठा पल्ला गाठला. यामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ ने महत्वाची भूमिका बजावली. सोमवारी २८ सप्टेंबर २०१५ म्हणजेच आज सकाळी दहा वाजता आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून पीएसएलव्ही सी 30 प्रक्षेपकाच्या सहाय्याने ‘अॅस्ट्रोसॅट’चं प्रक्षेपण करण्यात आलं. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं हे यशस्वी प्रक्षेपण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद ठरले. इस्रोसोबत पुण्यातील आयुका, टाटा मुलभूत संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, रामन रिसर्च सेंटर या संस्थाही या मोहीमेत सहभागी होत्या.

‘अॅस्ट्रोसॅट’ मुळे  अंतराळात वेधशाळा निर्मितीचे भारताचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि जपानने अशा प्रकारची अंतराळ वेधशाळा लॉन्च केली आहे. ‘अॅस्ट्रोसॅट’  च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे अशा प्रकारचा उपग्रह लॉन्च करणारा भारत चौथा देश ठरला आहे. खगोलीय घटकातील विविध फ्रिक्वेन्सीचं एकाच वेळी निरीक्षण करणं अॅस्ट्रोसॅटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. अशा प्रकारची हि जगातील पहिली वेधशाळा आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून विश्वाच्या विविध भागांतून आणि घटकांकडून येणाऱ्या दृश्य प्रकाश किरणांसह अल्ट्रा व्हायोलेट, कमी आणि अधिक ऊर्जेच्या क्ष किरणांचे निरीक्षण करता येणार आहे.

‘अॅस्ट्रोसॅट’ ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. -अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे. – अॅस्ट्रोसॅटचं वजन १,५१३ किलो असून  अॅस्टोसॅटसोबत आणखी सहा विदेशी उपग्रहांचंही प्रक्षेपण करण्यात आलं. यामध्ये अमेरिकेचे प्रत्येकी २८ किलो वजनाचे चार नॅनो उपग्रह, ७६ किलो वजनाचा इंडोनेशियाचा उपग्रह आणि १४ किलोचा कॅनडाचा उपग्रह आहे. – इस्रोची ही मोहीम PSLV या प्रक्षेपकाची सलग २९वी यशस्वी मोहीम ठरलीय.

‘अॅस्ट्रोसॅट’ची वैशिष्ट्ये

1) ‘अॅस्ट्रोसॅट’ ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा

2) ‘अॅस्ट्रोसॅट’ वेधशाळेच्या दृष्टीक्षेपात देशातील सर्व खगोल संस्था आणि काही महाविद्यालयं असतील.

3)  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं मिशन ऑपरेशस कॉम्प्लेक्स (मॉक्स)  या मोहिमेची देखरेख करेल.

4)  भारत पहिल्यांदाच अमेरिकेच्या व्यावसायिक उपग्रहांचं प्रक्षेपण करत आहे.

भारताच्या या अंतराळातील वेधशाळेमुळे भारताला भविष्यात निश्चित फायदाच होणार आहे. हवामानाचा अचूक अंदाज लावणे यामुळे शक्य होणार आहे. आणि याचा सर्वाधिक फायदा कृषी क्षेत्राला होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

Related posts

Shares