Search

मल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे

मल्चिंग पेपर, एक पाऊल प्रगत शेतीकडे
कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात... Read More

कुक्‍कुटपालन लसीकरण

कुक्‍कुटपालन लसीकरण
कुक्कुटपालन करताना काळजी घ्यावी लागते. कारण जर एखाद्या पक्षाला रोगाची लागण झाली तर त्याचा प्रभाव सगळ्याच पक्षांना रोग होण्याची शक्यता असते. यामुळे योग्य प्रकारे लसीकरण करणे आवश्यक आहे. तसं पाहायला गेलं तर वातावरणात सदैव विषाणू, जिवाणूंचे अस्तित्व असते. जर त्यांना पोषक वातावरण मिळाले तर रोगांचा प्रादुर्भाव वेगात होतो. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. लसीकरण करताना कोणती काळजी... Read More

श्रावण घेवडा लागवड

श्रावण घेवडा लागवड
भारतात घेवड्याची लागवड सर्वत्र केली जाते. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. घेवडयाच्‍या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्‍या दाण्‍यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या चा-यासाठी करता येतो. शेंगामध्‍ये अ आणि ब जीवनसत्‍व तसेच खनिजे, लोह आणि चुना... Read More

हळद लागवड – भाग १

हळद लागवड –  भाग १
भारतीय मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे. जमिनीची मशागत: जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. कंद चांगले पोसण्यासाठी... Read More

खरीपातील भात लागवड तंत्रज्ञान

खरीपातील भात लागवड तंत्रज्ञान
तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी: भात जातीची निवड व बियाणे... Read More

वांगी लागवड

वांगी लागवड
वांगी तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या आवडीची भाजी. प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा संगम असलेल्या या भाजीत ‘अ’,’ब’ आणि ‘क’जीवनसत्वांबरोबर लोह देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. वांगी तुलनेत कमी प्रमाणात नाशवंत असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे एक उत्तम पीक आहे. हवामान आणि जमीन: या पिकाला कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस अशा परिस्थितीत कीड... Read More

बहुपयोगी बांबूची शेती – भाग २

बहुपयोगी बांबूची शेती – भाग २
बांबूचा उपयोग शेती, घरबांधणी, खाद्य पदार्थ म्हणून तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण बांबूच्या प्रजाती व लागवडीस योग्य जमीन व हवामानाची माहिती घेतली. या भागात आपण बांबूची लागवड आणि विविध उपयोग याबद्दल जाणून घेऊ! लागवड: बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत... Read More

बहुपयोगी बांबूची शेती

बहुपयोगी बांबूची शेती
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचा उपयोग शेतीसाठी तसेच शोभेच्या वास्तू बनवण्यासाटी केला जातो, अशा या बहुउपयोगी बांबू वनस्पती लागवड बद्दल जाणून घेऊ! प्रजाती: अखंड पृथ्वीतलावर बांबूच्या सुमारे १४०० प्रजाती आहेत. यातील १४० प्रजाती भारतात आहेत, पैकी ६०... Read More

फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व

फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व
कृषिप्रधान देश असलेल्या भारतात भाजीपाला आणि फळे मोठया प्रमाणात उत्पादित होतात. विविध शासकीय योजनांमुळे मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड वाढली आहे. यामुळे फळे व भाजीपाल्याचे उत्पादन देखील वाढले आहे. मात्र असे असले तरी फळे आणि भाजीपाल्याच्या काढणीनंतरच्या प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रात भारत खूपच पिछाडीवर आहे. त्यामुळेच काढणीनंतर जवळपास ३० ते ४० टक्के उत्पादनाचे नुकसान होते. या लेखात आपण ‘फळे व भाजीपाला प्रक्रियेचे... Read More

पीक संरक्षण साधने – २

पीक संरक्षण साधने – २
कोणत्याही पिकाचे संरक्षण करताना विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करावा लागतो. मागील भागात आपण विविध प्रकारच्या स्प्रे पंप्स बद्दल माहिती घेतली. पीक संरक्षण करण्याची साधने – २ या लेखात आपण धुरळणी यंत्र तसेच इतर महत्वपूर्ण यंत्रांबाबत विस्तृत माहिती घेऊया. धुरळणी यंत्र: या यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक घटक पिकांवर धुराळले जातात. पावडर स्वरूपातील कोरडी कीटकनाशके अतिशय सूक्ष्म भागात हवेच्या झोताने झाडावर धुरळली... Read More