Search

पांढर सोन – बी.टी. कापूस

पांढर सोन – बी.टी. कापूस
[Total: 2    Average: 2.5/5]

मऊ लुसलुशीत कापूस…आणि या कापसापासून तयार  होणाऱ्या विविध वस्तू …मानवाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा. यापैकी वस्त्राची निर्मिती कापसापासून होते. पण हा कापूस तयार कसा होतो, कापसाच्या निर्मिती साठी काय करावे लागते. हे जाणून घेणे गरजेचे आहे. कापूस…पूर्वीपासूनच भारतातील एक महत्वाचे नगदीपीक असून त्याला काळया मातीतील पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. असे असून सुद्धा भारतात कापसाची सरासरी उत्पादकता हिजगाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा खूप कमी आहे, ही उत्पादकता महाराष्ट्रात तर इतर राज्याच्या तुलनेत फारच कमी म्हणजे भारताच्या सरासरीपेक्षाही कमी आहे.   सन 2002 पासून दरवर्षी यामध्ये सतत वाढ होत गेली आणि २०१२-१३ मध्ये बी.टी. संकरीत वाणाचे एकूण ९७ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले.  बी.टी. कपाशीच्या सर्व बाबींचा विचार करून पुढे काही उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी महत्वाच्या सूत्रे दिली आहेत

जमिनीची निवड :

  • बी.टी. कापूस पिकाच्या मुळया खोलवर जावून अन्नांश घेत असल्याने त्या पिकास काळी कसदार जमिन आवश्यक असते.
  • बी.टी. कपाशीकरिता मध्यम ते खोल, काळी (50 ते 70 सेंमी) तसेच योग्य पाण्याचा निचरा होणारी व जमिनीचा सामू 5 ते 8.5 असेल अशा जमिनीत लागवड करावी.
  • बी.टी. हे संकरीत वाण असल्यामुळे हलक्या प्रतिच्या (25 सेंमी. खोली) जमिनीत लागवड करू नये.

वाणांची निवड :

बी.टी. कपाशीचे बाजारामध्ये बरेच संकरीत वाण उपलब्ध आहेत. शेतकरी कोणत्या वाणाची लागवड करावी या विषयी दरवर्षी संभ्रमात असतात. तरी शेतकरी बंधूनी, त्यांच्या भागात कोणते वाण चांगले उत्पादन देतात व मागील वर्षी कुठल्या वाणाने जास्त उत्पादन दिले याची खात्री करून तसेच रसशोषण करणार्या  किडींना कमी प्रमाणात बळी पडतात, अशा संकरीत वाणांची निवड करावी.

पेरणी व अंतर :

  • पूर्वमान्सून कपाशीची लागवड मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात ठिबक सिंचन पद्धतीने 4 X 3 फुट किंवा ५ X 2 किंवा ६ X २ फुट अंतर जमिनीच्या मगदुरानुसार ठेवून करावी.
  • बियाणे 3ते 4 सेंमी खोल पुरावेत्या पेक्षा जास्त खोल पेरू नये.
  • कोरडवाहूमध्ये मान्सूनचा 75 ते 100 मीमी (3 ते4 इंच) पाऊस पडल्यानंतर जून महिन्यात (शेवटच्यापंधरवाडयात) लागवड करावी.
  • दोन ओळीमध्ये मध्यम वाढीच्या वाणाकरिता 3 X 1.5 फुट अंतरावर लागवड करावी.
  • लागवड करतांना एका ठिकाणी 2बिया झाल्यांनतर विरळणी करून एका ठिकाणी एकच रोपटे ठेवून प्रती एकरीझाडांची संख्या 8 ते 9 हजार पर्यंत राहील याची काळजी घ्यावी.
  • एका चौफुलीवर एकच बी लावायचे असेल त रत्याच दिवशी 20-25 टक्के बियाण्याची लागवड प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये करावी. जेणे करून ही रोपे खाडेभरण्यासाठी वापरता येतील आणि झाडांची योग्य संख्या ठेवणे सोर्इस्कर होर्इल.

जीवाणू खतांचा वापर :

कापूस लागवडीपूर्वी नत्र स्थिरीकरणासाठी ऍझोटोबॅक्टशर जिवाणू आणि स्फुरद विरघळवण्या करिता पीएसबीची (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी प्रत्येकी 250 ग्रॅम प्रतिदहा किलो बियाण्यास लावून पेरणी करावी. तसेच, प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करूनच जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. या खतांमुळे जमिनीत अनुपलब्ध स्वरूपातील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध स्वरूपात पुरवठा केली जातात. तसेच वर खतांद्वारे पुरवठा केलेल्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता देखील वाढवली जाते.

अन्नद्रव्य व्यवस्थापन :

सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व टिकवून ठेवली जाते, तसेच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होतो. शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत दहा टन प्रति हेक्टरी पेरणीपूर्वी शेवटच्या वखर पाळीच्या वेळेस जमिनीत चांगले मिसळून द्यावे, यामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यास मदत होते, तसेच सर्वच अन्नद्रव्यांचा एकत्रित स्वरूपात पुरवठा केला जातो.

कापसाची लागवड करताना जर योग्य नियोजन केलं गेलं  तर चांगला फायदा होऊ शकतो. एकूणच काय कि  कापुस खऱ्या अर्थाने पांढर सोने आहे.

Related posts

Shares