Search

देस्ता-सिद्धी – कृषी उत्पादनांवरील डिस्काउंट आता थेट शेतकऱ्यांना

देस्ता-सिद्धी – कृषी उत्पादनांवरील डिस्काउंट आता थेट शेतकऱ्यांना
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर!!! देस्ताग्लोबल ‘देस्ता-सिद्धी’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन आली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नामवंत कंपन्यांची कृषी उत्पादने डिस्काउंट रेट मध्ये उपलब्ध होणार आहेत. ‘देस्ताग्लोबल’  मागील सहा वर्षांपासून शेतकऱ्यांना योग्य माहिती देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य उत्पादन योग्य दरात उपलब्ध व्हावे यासाठी देस्ता नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. ‘देस्ता-सिद्धी’ या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना... Read More

ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन

ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन
रब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. या पिकांची लागवड योग्य वेळी करणे गरजेचे आहे. पुढील भाज्यांची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी. वेलवर्गिय भाज्या: काकडी,तांबडा भोपळा,कलिंगड व खरबूज या पिकांचे वेल मोकळ्या, कोरड्या जमिनीवर व्यवस्थित वेलांना दिशा देऊन पसरावेत म्हणजे वेलीची दाटी न होता फळांचा आकार वाढण्यास मदत होते. दुधी भोपळा, दोडका, कारली, घोसाळी या भाज्यांना मंडप पद्धत किंवा ताटी... Read More

स्मार्ट शेतकरी स्पर्धा

स्मार्ट शेतकरी स्पर्धा
देस्ता ग्लोबल तर्फे आयोजित स्मार्ट शेतकरी स्पर्धेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ व्हावी या उद्देशाने देस्ता ग्लोबल ची स्थापना झाली. हे करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी संदर्भात आवश्यक मार्गदर्शन व्हावे यासाठी देस्ता टॉक या वेबसाईट ची सुरुवात झाली. मागील अडीच वर्षात देस्ता टॉक ने विविध उपक्रम राबविले. कृषी विषयक माहितीचा खजिना मोबाईल किंवा इंटरनेट वर उपलब्ध करून देतानाच बळीराजाचे मनोधैर्य... Read More

मॉन्सून माहिती

मॉन्सून माहिती
मॉन्सूनच्या पावसाला कधी सुरुवात होणार याकडे बळीराजा लक्ष लावून बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे बळीराजा थोडासा सुखावला आहे. पुणे वेधशाळेने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला असून पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या भागात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया मॉन्सून ची माहिती. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ,सातारा,सोलापुरातही... Read More

मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता

मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता
यंदा पाऊस चांगला होणार अशी चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्रात यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सामान्‍यत: १ जूनला केरळमध्‍ये दाखल होणारा मान्‍सून दोन दिवस आधीच दाखल झाला. यामुळे महाराष्‍ट्रात मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्‍ये... Read More

देस्ता महाधमाका

देस्ता महाधमाका
सध्या खरीप हंगामासाठी कृषी बांधवांच नियोजन सुरु झाले आहे. खते, बियाणे, औषधे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. कृषी उत्पादनांची ऑनलाईन बाजारपेठ असलेल्या देस्ता मार्ट ने यादरम्यान आकर्षक अशा देस्ता महाधमाका चे आयोजन केले आहे. याअंतर्गत २२ ते २४ मे २०१७ असे सलग तीन दिवस सगळ्याच प्रकारच्या कृषी उत्पादनांवर भरघोस सूट घोषित करण्यात आली आहे.  यामध्ये बियाणे, खते,... Read More

साखर उत्पादनात घट

साखर उत्पादनात घट
राज्यात यंदाच्या हंगामात (2016-17) साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास निम्म्यावर आले आहे. यंदा 41 लाख 86 हजार टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या दशकभरातील हे नीच्चांकी साखर उत्पादन आहे. साखर उत्पादनात घट होण्यामागे सलग दोन वर्षे झालेला दुष्काळ कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. यंदाच्या हंगामात 150 साखर कारखान्यांनी एकूण 372 लाख टन उसाचे गाळप केले. गेल्या हंगामात एकूण 743... Read More

कृषी क्षेत्रासाठी खुशखबर

कृषी क्षेत्रासाठी खुशखबर
सरकारी योजना, त्यांना होणारी दिरंगाई आणि या योजनांचा लाभार्थ्यांना किती लाभ होतो? एक ना अनेक प्रश्न. पण आता मात्र महाराष्ट्र शासनाने या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर शोधण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. राज्यातील विविध समाज घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या वस्तू स्वरूपाच्या लाभाऐवजी रोख रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.... Read More

देस्ता कृषी परिवार च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात

देस्ता कृषी परिवार च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात
देस्ताग्लोबल ने “देस्ता कृषी परिवार” या ऑनलाईन फोटो कॉन्टेस्ट च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले आहे. “देस्ता कृषी परिवार” ही संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठीची ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धा असून www.destatalk.com  (देस्ता टॉक) या कृषीविषयक वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. शेतकऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाशी ओळख व्हावी, हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे. १ ऑक्टोबर २०१६ पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना... Read More

पेरणी सबुरीने – हवामान खात्याचा सल्ला

पेरणी सबुरीने – हवामान खात्याचा सल्ला
मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावल्याने शेतकरी उल्हासित झाले होते. मान्सूनपूर्व पावसानंतर महाराष्ट्रातील शेती कामांना वेग आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी देखील पावसाची चाहूल लागताच पेरणीच्या कामाला सुरुवात केली. मात्र हवामान खात्याने शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. याला कारण कि मान्सून लांबला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात पेरणी ची कामे वेगाने सुरु झाल्याचे लक्षात आल्यानंतर हवामान खात्याने हि सूचना जरी... Read More