Search

बजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक

बजरंगी भाई (सलमान खान) बनणार संकट मोचक
सलमान खान बॉलिवूड मधील हा सुपर स्टार त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या विविध उपक्रमांमुळे सद्देव चर्चेत राहतो. नुकताच त्याचा ’बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला.  या चित्रपटात सलमानने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुकही झाले. अनेकांनी हा सलमानचा आत्तापर्यंतचा उत्तम सिनेमा असल्याचं  सांगितलं. बॉक्स ऑफिस वर या चित्रपटाने चांगला गल्ला जमा केला. याचा फायदा आता शेतकऱ्यांना व्हावा असं या चित्रपटाचे निर्माते निर्माता सलमान आणि... Read More

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि कृषीविषयक योजना

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि कृषीविषयक योजना
महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आता ५५ वर्षे लोटली आहेत. आज महाराष्ट्र एक आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं. या कालावधीत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले. महाराष्ट्राच्या विकासासाठी या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना राबविल्या. कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या योजनांबाबत जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती... Read More

तरुणांमध्ये शेतीबद्दल ‘स्वारस्य’ निर्माण करणे

तरुणांमध्ये शेतीबद्दल ‘स्वारस्य’ निर्माण करणे
शेतीला प्रतिष्ठेचा प्रश्‍न भेडसावतो आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर, जगभरातील बहुसंख्य तरुणांसाठी शेतीमध्ये काही ‘खास’ किंवा आकर्षक असे काही दिसत नाही. बहुतेक जण असा विचार करतात की, शेती म्हणजे केवळ पाठीचा कणा मोडणारी मजूरी, तीसुध्दा फारसा आर्थिक फायदा न देणारी – आणि आपल्या करीअरच्या प्रगतीसाठीची अगदी छोटीशी संधी. शेतकर्‍यांची पिढी जुनी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कृषी क्षेत्राकडे नव्या तरुणांनी आकर्षिले... Read More

पिक विमा

पिक विमा
भारत हा कृषी प्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. कृषीउत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि धोरणे महाराष्ट्र शासन पातळीवर राबविली जात आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे शेतीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. विमा योजना शेतकरीप्रिय होण्यासाठी सध्याच्या राष्ट्रीय पीक विमा योजनेत मोठे परिवर्तन आवश्‍यक होते व आहे. राज्याच्या आठही भागातील पीकपद्धती, हवामान... Read More

शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प

शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा प्रकल्प
उद्देश – 1. राज्यातील मोठ्या शहरांच्या सभोवती बाजारपेठेतील मागणीनुसार खुल्या क्षेत्रामध्ये तसेच नियंत्रित वातावरणामध्ये भाजीपाल्याचे क्षेत्र वाढविणे. 2. पारंपारिक भाजीपाला लागवडीमध्ये बदल करून सुधारित व संकरित वाणांचा लागवडीसाठी उपयोग करणे. 3. अधिक गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी आधुनिक/उच्चतंत्र लागवड पद्धतीचा अवलंब करणे. 4. भाजीपाल्याची समूह स्वरूपात लागवड करून काढणीपश्‍चात व्यवस्थापन, पुरवठा साखळी व विपणन व्यवस्था बळकट करणे आणि त्याद्वारे उत्पादकाच्या उत्पन्नात वाढ करणे.1. लाभार्थी... Read More

जलसाक्षरतेची मोहीम गावोगाव उभी राहावी

जलसाक्षरतेची मोहीम गावोगाव उभी राहावी
भीषण पाणीटंचाईच्या काळात दोन गटांत, दोन गावांत, दोन जिल्ह्यांत, दोन विभागांत, दोन राज्यांत पाहता पाहता संघर्ष सुरू होतो. मग कळते पाण्याचे महत्त्व. पाण्यासाठीचा संघर्ष भविष्यात टाळायचा असेल तर जल साक्षरतेची चळवळ गावोगाव उभी राहणे आवश्‍यक आहे. ही चळवळ यशस्वी होण्यासाठी मानसिक बदल होणेही गरजेचे आहेत. प्रा. एस. डी. पायाळ  तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी... Read More

गारपिटीची शक्यपता मावळली

गारपिटीची शक्यपता मावळली
विदर्भात सरीवर सरी; आजही पावसाचा अंदाज  पुणे – गेल्या आठवडाभरात राज्यात ठिकठिकाणी सातत्याने सुरू असलेली गारपीट अखेर थांबण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने फक्त गुरुवारी (ता.16) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला असून, गुरुवारपासून (ता.17) राज्यात कोठेही गारपीट होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी... Read More