Search

मान्सून ची पुन्हा दमदार सुरुवात… पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता…

मान्सून ची पुन्हा दमदार सुरुवात… पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता…
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस कधी येणार या चिंतेने सगळे धास्तावले होते. मात्र अखेर वरुण राजाने बरसत सगळ्यांना चिंतामुक्त केले आहे. सध्या नैऋत्य मान्सून कर्नाटकच्या किनारपट्टीसह उर्वरित पश्चिमी किनारपट्टीला एकदम जोमाने कार्यान्वित झाला आहे. सध्या पश्चिमी किनारपट्टीला मान्सूनच्या लाटेची तीव्रता कोकण आणि गोव्यापासून थेट कर्नाटक ते केरळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचा परिणाम... Read More

कोंकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता… पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरी बरसणार

कोंकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता… पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरी बरसणार
पाऊस नेमका कुठे दडून बसला आहे ? हा प्रश्न सध्या चर्चेचा आणि बऱ्याच अंशी चिंतेचा विषय बनत चालला आहे. पण, समाधानाची बाब म्हणजे दडी मारून बसलेला पाऊस लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. लवकरच पाऊस  काही प्रमाणात बरसेल अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. येत्या रविवारपर्यंत हवामानाचा अंदाज: १६ जुलै: कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी... Read More

वादळाच्या तडाख्यातून पाऊसा ची सुटका होउदे… पुन्हा एकदा वरुणराजा बरसुदे …

वादळाच्या तडाख्यातून पाऊसा ची सुटका होउदे…  पुन्हा एकदा वरुणराजा बरसुदे …
वरुण राजाने दमदार हजेरी लावून बळीराजाच्या मनात आशेची पालवी फुलविली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वरुण राजा काहीसा रुसला आहे. यामुळे, पेरणी करून झाल्यानंतर आता शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. प्रशांत महासागरातील  उष्णकटबंधीय वादळांचा फटका आपल्या मान्सूनलाही दरवर्षी बसतो. यंदा मात्र हे संकट अधिक बिकट होईल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारणीभूत ठरली आहेत वादळे. एक... Read More

जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे – भाग – २

जुलै  महिन्यात करावयाची शेतीची कामे – भाग – २
जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे या आपल्या लेखाच्या पहिल्या भागात आपण भात, नागली, बाजरी, भुईमुग या सारख्या विविध पिकांबाबत माहिती जाणून घेतली. लेखाच्या दुसऱ्या भागात आपण सोयाबीन, सुर्यफुल, एरंडी, कारळा, कापूस यांच्यासह विविध पिके तसंच महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत. या पिकांपैकी काही पिकांची पेरणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करणे गरजेचे आहे तर, काही पिकांची पेरणी ऑगस्ट महिन्यात केली जाते.... Read More

यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन होणार…

यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन  होणार…
  डाळींचे उत्पादन १६ लाख टनापेक्षा अधिक होण्याची शक्यता पाऊस चांगला झाला तर त्याचा शेतकऱ्याला फायदा होतो हे  माहीतच आहे. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांच्या मनात उत्साह निर्माण केला आहे. महारष्ट्रातील पेरणीची बहुतांश कामे आता पूर्णत्वास गेली आहेत. जर निसर्गाने साथ दिली तर यंदा चांगले उत्पादन येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या वर्षी जर... Read More

रुसलेला वरुणराजा लवकरच बरसेल, जलधारा बरसताच बळीराजा हसेल…

रुसलेला वरुणराजा लवकरच बरसेल, जलधारा बरसताच बळीराजा हसेल…
पाऊस बरसला आणि बळीराजा सुखावला… मागील महिन्यात झालेल्या जोमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. जमिनीची मशागत झाल्यानंतर वरुणराजाने शेतकऱ्याला उमेद दिली. पण म्हणतात ना निसर्ग लहरी आहे. वातावरणात बदल झाला आणि बरसणारे ढग रुसले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता रुसलेला पूस पुन्हा बरसण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे तसेंच पूर्व... Read More

सिरकॉट (CIRCOT) तर्फे “कापुस गुणवत्ता मुल्यांकन ” या विषयावर प्रशिक्षण

सिरकॉट (CIRCOT) तर्फे  “कापुस गुणवत्ता मुल्यांकन ” या विषयावर प्रशिक्षण
  केंद्रिय कपास प्रौद्योगिकी अनुसंधान संस्थान (CIRCOT), माटुंगा, मुंबई या संस्थेतर्फे २०१५-१६ या वर्षात “कापूस गुणवत्ता मुल्यांकन” या विषयावर आधारित ५ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.  शेतकरी, खरेदीदार, प्रक्रीयाकार आणि निर्यातदार या सर्वांसाठी हे प्रशिक्षण फायदेशिर ठरणार आहे.   या प्रशिक्षण वर्गात आधुनिक जिनिंग तंत्रज्ञान, कापुस वर्गीकरण पद्धती, कापसाची              उप- उत्पादने,  परंपरागत पद्धतीने कापसाच्या तंतुचे मोजमाप, कापूस तंतुची... Read More

पावसाला विलंब झाल्यास “कांदा पिकांचे” व्यवस्थापन कसे करावे…

पावसाला विलंब झाल्यास “कांदा पिकांचे” व्यवस्थापन कसे करावे…
भारतीय हवामान विभागाद्वारे या वर्षी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरिपातील कांदा पीक (२० टक्के क्षेत्र) जिरायती स्वरूपाचे असून, प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व राजस्थानच्या काही भागांमध्ये घेतले जाते. रब्बी कांदा (६० टक्के क्षेत्र) व रांगडा कांदा (२० टक्के क्षेत्र) ही बागायती पिके म्हणून घेतली जातात. त्यामुळे कमी पावसाची शक्यतेचा खरिपातील कांदा पिकावर परीणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर कांदा... Read More

फलोत्पादन अभियान

फलोत्पादन अभियान
फलोत्पादन विभागाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते, त्यासाठी शेतकऱ्याला पहिल्या वर्षीचा हप्ता ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के रक्कम अनुदान मिळते. दुसऱ्या वर्षीचे अनुदान मिळण्यासाठी बागेतील ७५ टक्के झाडे जिवंत असली पाहिजेत. तिसऱ्या वर्षीच्या अनुदानासाठी ९० टक्के झाडे बागेत सुस्थितीत असली पाहिजे. अनुदान मिळण्यासाठी बागेचे क्षेत्र ०.२० आरपासून चार हेक्टवरपर्यंत... Read More

टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान

टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान
राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या-ना-त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच…... Read More