Search

पावसाळी भुईमूग लागवड

पावसाळी भुईमूग लागवड
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या गळीत पिकांमध्ये भुईमूग हे अत्यंत महत्वाचे पीक मानले जाते. रब्बी आणि उन्हाळी हंगामाबरोबरच पावसाळी किंवा खरिफ हंगामांत देखील भुईमुगाची शेती केली जाते. पावसाळी भुईमुग लागवड या लेखात आपण पावसाळ्यात भुईमुगाची लागवड करताना कसे नियोजन करावे याचा आढावा घेऊया. हवामान भुईमुगाच्या जातीनुसार भुईमुगाच्या झाडाची शाखीय (Vegetativ Growth) वाढ २७ अंश सें .ते ३० अंश सें. तापमानात होते .पिकाची... Read More

माती परीक्षण

माती परीक्षण
खरीपाचा ह्ंगामाला सुरुवात झालीय. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. लवकरच मान्सुनचे आगमन होईल. बळीराजाचे नियोजन सुरु झाले आहे. पण या सगळ्याआधी आपल्याला मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. आता शेतकरी बांधव म्हणतील आम्ही नेहमीच्या पद्धतीने ठरलेलच पिक घेणार आहोत, मग आम्हाला मातीच परिक्षण करायची गरज काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे माती परीक्षण या लेखात आपल्याला मिळणार आहेत. मातीच परिक्षण करणं गरजेचं... Read More

हळद लागवड – भाग १

हळद लागवड –  भाग १
भारतीय मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे. जमिनीची मशागत: जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. कंद चांगले पोसण्यासाठी... Read More

खरीपातील भात लागवड तंत्रज्ञान

खरीपातील भात लागवड तंत्रज्ञान
तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक असून भात हे मुख्यत: उष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या १० वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता तांदळाची उत्पादकता वाढविणे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. खरीप भात लागवड करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी: भात जातीची निवड व बियाणे... Read More

वांगी लागवड

वांगी लागवड
वांगी तसं पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या आवडीची भाजी. प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचा संगम असलेल्या या भाजीत ‘अ’,’ब’ आणि ‘क’जीवनसत्वांबरोबर लोह देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. वांगी तुलनेत कमी प्रमाणात नाशवंत असल्याने दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे एक उत्तम पीक आहे. हवामान आणि जमीन: या पिकाला कोरडे व थंड हवामान चांगले मानवते. ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस अशा परिस्थितीत कीड... Read More

बहुपयोगी बांबूची शेती – भाग २

बहुपयोगी बांबूची शेती – भाग २
बांबूचा उपयोग शेती, घरबांधणी, खाद्य पदार्थ म्हणून तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण बांबूच्या प्रजाती व लागवडीस योग्य जमीन व हवामानाची माहिती घेतली. या भागात आपण बांबूची लागवड आणि विविध उपयोग याबद्दल जाणून घेऊ! लागवड: बांबूची लागवड साधारणपणे ३ x ३ मीटर ते ७ x ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५ ते ४० वर्षांपर्यंत... Read More

बहुपयोगी बांबूची शेती

बहुपयोगी बांबूची शेती
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचा उपयोग शेतीसाठी तसेच शोभेच्या वास्तू बनवण्यासाटी केला जातो, अशा या बहुउपयोगी बांबू वनस्पती लागवड बद्दल जाणून घेऊ! प्रजाती: अखंड पृथ्वीतलावर बांबूच्या सुमारे १४०० प्रजाती आहेत. यातील १४० प्रजाती भारतात आहेत, पैकी ६०... Read More

फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व

फळे व भाजीपाला प्रक्रियेचे महत्व
कृषिप्रधान देश असलेल्या भारतात भाजीपाला आणि फळे मोठया प्रमाणात उत्पादित होतात. विविध शासकीय योजनांमुळे मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड वाढली आहे. यामुळे फळे व भाजीपाल्याचे उत्पादन देखील वाढले आहे. मात्र असे असले तरी फळे आणि भाजीपाल्याच्या काढणीनंतरच्या प्रक्रिया तंत्रज्ञान क्षेत्रात भारत खूपच पिछाडीवर आहे. त्यामुळेच काढणीनंतर जवळपास ३० ते ४० टक्के उत्पादनाचे नुकसान होते. या लेखात आपण ‘फळे व भाजीपाला प्रक्रियेचे... Read More

पीक संरक्षण साधने – २

पीक संरक्षण साधने – २
कोणत्याही पिकाचे संरक्षण करताना विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करावा लागतो. मागील भागात आपण विविध प्रकारच्या स्प्रे पंप्स बद्दल माहिती घेतली. पीक संरक्षण करण्याची साधने – २ या लेखात आपण धुरळणी यंत्र तसेच इतर महत्वपूर्ण यंत्रांबाबत विस्तृत माहिती घेऊया. धुरळणी यंत्र: या यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक घटक पिकांवर धुराळले जातात. पावडर स्वरूपातील कोरडी कीटकनाशके अतिशय सूक्ष्म भागात हवेच्या झोताने झाडावर धुरळली... Read More

पीक संरक्षण करण्याची साधने

पीक संरक्षण करण्याची साधने
रासायनिक कीडनाशकांची परिणामकारकता वाढविण्यासाठी ते अगदी सारख्या प्रमाणात कमीतकमी वेळेत व काइतकामी मनुष्यबळ वापरून व ज्याठिकाणी कीड आहे त्याठिकाणी मारण्यासाठी, कार्यक्षम अशा पीक संरक्षण करण्याची साधने महत्वाची भूमिका बजावतात.पीक संरक्षण साधनांचे वर्गीकरण खालील तीन प्रकारात करता येईल. १) फवारणी यंत्रे (स्प्रेअर) २) धुरळणी यंत्र (डस्टर्स) ३) इतर विविध पीक संरक्षण साधने फवारणी यंत्रे(स्प्रेअर्स): या साधनांचा उपयोग पाण्यात मिसळणारी भुकटी व... Read More