Search

कोंबड्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

कोंबड्यांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन
शेतीबरोबरचा जोडधंदा म्हणून ‘कुक्कुटपालन’ या व्यवसायाकडे पहिले जाते. वातावरणीय बदलाचा कोंबड्यांवर परिणाम होत असतो. काही वेळा त्यांना विविध आजार देखील होतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्याचा मौसम हा दमट हवामानाचा ओळखला जातो. यामुळे कोंबड्यांच्या घराची विशेष काळजी घ्यावी लागते. स्वच्छता अधिकधिक प्रमाणात ठेवावी लागते. कारण दमट हवामानात रोग प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. यामुळेच... Read More

शेततळे पहा बांधून

शेततळे पहा बांधून
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. शेततळे कसे बनवाल ? शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे. या खड्ड्याच्या... Read More

पावसाळी भुईमूग लागवड

पावसाळी भुईमूग लागवड
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या गळीत पिकांमध्ये भुईमूग हे अत्यंत महत्वाचे पीक मानले जाते. रब्बी आणि उन्हाळी हंगामाबरोबरच पावसाळी किंवा खरिफ हंगामांत देखील भुईमुगाची शेती केली जाते. पावसाळी भुईमुग लागवड या लेखात आपण पावसाळ्यात भुईमुगाची लागवड करताना कसे नियोजन करावे याचा आढावा घेऊया. हवामान भुईमुगाच्या जातीनुसार भुईमुगाच्या झाडाची शाखीय (Vegetativ Growth) वाढ २७ अंश सें .ते ३० अंश सें. तापमानात होते .पिकाची... Read More

भाताची चार सूत्री लागवड भाग – १

भाताची चार सूत्री लागवड भाग – १
कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली... Read More

सोयाबीन लागवड

सोयाबीन लागवड
जगामध्ये गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे. भारतात सोयाबीनची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात सरासरी ९०० मि. मी. पाऊस पडणाऱ्या भागात जिरायती परिस्थितीत केली जाते. सोयाबीननंतर रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, करडई ही पीक पद्धत अवलंबली जाते. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या लेखात सोयाबीन... Read More

मिरची लागवड

मिरची लागवड
भाजीपाला पिकांमध्ये मिरची हे नगदी पीक आहे. बाजारात वर्षभर हिरव्या मिरचीला मागणी असते. आपल्या दरर्जच्या आहारात मिरची हा अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये विविध औषधी गुणधर्म देखील आढळतात. ‘अ ‘, ‘ब’, ‘क’ आणि ‘इ’ जीवनसत्व असलेली मिरची रक्तवर्धक आणि कृमीनाशक आहे. मिरची लागवड कशी करावी जाणून घेऊया. हवामान आणि जमीन : मिरचीला उष्ण हवामान मानवते. बियांची उगवण १८.३ अंश ते २६.७ अंश... Read More

भेंडी लागवड

भेंडी लागवड
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू... Read More

खरिप मका लागवड

खरिप  मका लागवड
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३०... Read More

कोथिंबीर लागवड

कोथिंबीर लागवड
पालेभाज्या लागवड या लेखाच्या मागील भागांमध्ये आपण पालक तसेच मेथी लागवड याबाबत माहिती जाणून घेतली. याभागात आपण कोथिंबीर लागवड कशी करावी हे जाणून घेऊया. कोथिंबिरीचा वापर भारतीय अन्नपदार्थांमध्ये नेहमीच केला जातो. हिरवागार ताजा कोथिंबीर कोणत्याही पदार्थावर पडला कि तो पदार्थ दिसायला आकर्षक दिसू लागतोच, पण कोथिंबीर तो पदार्थ अधिक स्वादिष्ट करतो. विविध भाज्या, भाताचे विविध प्रकार, सॅलड, चटणी, करी, सूप... Read More

मेथी लागवड

मेथी लागवड
मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो. मेथीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह पुरेशा प्रमाणात असतात. मेथीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. मेथी हि पाचक असून... Read More