Search

१२ महिने सकस चारा उत्पादनाचे तंत्र

१२ महिने सकस चारा उत्पादनाचे तंत्र
[Total: 10    Average: 2.7/5]

 

शेतीमध्ये शेतकरी काम करत असतो तेव्हा त्याला साथ देतात ते त्याच्याबरोबर असलेले पशु. आणि पशूंच खाद्य म्हणजे चारा. म्हणूनच, चारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. जनावरांना १२ महिने चारा लागतो. हि मागणी कशी पूर्ण करावी? चाऱ्याची साठवण कशी करावी? असे विविध प्रश्न बळीराजाला पडत असतात. चारा साठवणुकीसाठी आणि चारा उत्पादनासाठी काय तंत्र वापरावे? यावर आपण प्रकाशझोत टाकूया.

पशूंना चार देताना, चारा सकस असणे महत्वाचे असते. कारण चारा सकस असेल तर पशूंच आरोग्य निरोगी राहते. विशेष म्हणजे गायी आणि म्हशीना देण्यात येणाऱ्या चाऱ्यावर त्यांची दुध उत्पादन क्षमता अवलंबून असते. म्हणूनच, पशूंना चांगला चार उपलब्ध करून देणे महत्वाचे.

महत्वाची चारापिके –

गिरिपुष्प : गिरीपुष्पा हे सदाहरित लान ते मध्यम आकाराचे द्विदलवर्गीय झाड सर्वसाधारणपणे उष्ण कटीबंधाच्या तसेच अतिपर्जन्यमानाच्या परदेशात चांगले वाढते. हि बहुवर्षीय वनस्पती असून झाडाची मुळे जमिनीत खोलवर जातात. झाडाला लांब कामानिसारख्या आणि भरपूर हिरवागर्द पाला असलेल्या फांद्या असतात.  पौष्टिक चारापिक म्हणून याचा वापर केला जातो.

लागवड : या वनस्पतीची वाढ कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये, डोंगर उतारावर, तसेच निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे होते.  गिरीपुष्पाची  लागवड छाट कलमाद्वारे किंवा रोपे तयार करून करता येते. लागवड करून झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला प्रतीझाडापासून २५ ते ३० किलो हिरवा पाला वर्षभरात मिळतो.

झाडपाल्यातील घटक : वासरांच्या तसेच दुभत्या गाईच्या खाद्यात प्रथिनांची गरज भागविणारा पाला म्हणून याला महत्व प्राप्त झालेले आहे. गुळाचे द्रावण तयार करून पाल्यावर शिंपडल्यास जनावरे पाला आवडीने खातात.

चारा चवळी –

चवळी हिवाळी अथवा उन्हाळी हंगामात अल्पकाळात येणारे द्विदल चाऱ्याचे उत्तम पिक आहे. चवळीच्या हिरव्या चाऱ्यापासून वाळलेली विरळ अथवा मुरघास करता येतो.

लागवड आणि कापणी : चवळीच्या पिकास मध्यम प्रतीची चांगला निचरा होणारी जमीन मानवते. मशागत करून जमीन मऊ व भुसभुशीत करावी. चवळीची पेरणी उन्हाळी किंवा हिवाळी हंगामाच्या सुरुवातीला करता येते. हिरव्या चाऱ्यासाठी, चवळी फुले येण्याच्या वेळेस कापणीसाठी तयार होते.

मका –

मका उंच वाढणारे हंगामी पिक आहे. मक्याची पाने लांब व टोकदारअसतात. हिरव्या चाऱ्यासाठी मका हे जलद वाढणारे, उंच, उत्पादनक्षम तसेच रुचकर चाऱ्याचे पीक आहे. मक्याचा हिरवा चारा दुभत्या जनावरांना खाऊ घातल्याने दुधाचे प्रमाण वाढते. मक्याच्या पिकापासून मिळणारे अनेक फायदे लक्षात घेत या पिकास चाऱ्याच्या पिकांचा राजा संबोधणे योग्य ठरेल.

झाडपाल्याचा चारा म्हणून वापर :

शिवण, पांगारा, बिवळा, पालेहसन यासारख्या स्थानिक व सुबाभूळ या विदेशी झाडांपासून पौष्टिक झाद्पदा उपलब्ध होऊ शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये १५ टक्क्यापेक्षा अधिक प्रथिने असल्याने जनावरांना पौष्टिक चार म्हणून देखील वापरता येतो.

भूसघास पद्धतीने चारा साठवण :

मका हे भूरघास तयार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पीक आहे. तसेच ज्वारी, बाजरी, संकरीत नेपियर गवत, गिनी गवत इत्यादी पिके देखील भूरघास तयार करण्यासाठी वापरता येते.

पेंढा व सुक्या गवतावर युरिया प्रक्रिया :

भाताच्या पेंध्यावर किंवा सुक्या गवतावर युरियाचि रासायनिक प्रक्रिया केल्यास चाऱ्याची पौष्टिकता वाढविता येते.

अशाप्रकारे योग्य नियोजन केल्यास आपण आपल्या पशूंना १२ महिने पौष्टिक चारा उपलब्ध करून देऊ शकता.

 

 

Related posts

Shares