Search

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २

भरघोस उत्पादन देणा-या मिरचीचे जाणुन घ्या तंत्र : भाग २


मिरचीची पेरणी, गादीवाफे तयार करणे, जातींची माहिती आपण जाणुन घेतली, आता आपण जाणुन घेऊया मिरचीची पुर्नलागवड, आंतरमशागत, काढणी व उत्पादन

पुर्नलागवड:

 • ४ ते ५ आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात.
 • रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत.
 • मिरची लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोलवर नांगरट करून, दोन – तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी २० टन/हे चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
 • धारणतः उंच वाढणाऱ्या व पसारा जास्त असणाऱ्या जातीसाठी भारी जमिनीत 60 * 60 सें.मी. व मध्यम जमिनीत 60 * 45 सें.मी. एवढे अंतर ठेवावे.
 • रोप लावणीच्या ठिकाणी चिमूटभर थिमेट ठेवून एका ठिकाणी दोन रोपांची पाणी टाकून पुनर्लागण करावी.
 • पुनर्लागणीपूर्वी दहा लिटर पाण्यात 14 मि.लि. नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन एम-45 अधिक पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम याप्रमाणे द्रावण करून रोपांचा पानाकडील भाग द्रावणात दोन मिनिटे बुडवून रोपांची पुनर्लागण करावी.


080713_239_pepper_planting_sbs1

अन्नद्रव्य व्यवस्थापन:

 • मिरचीसाठी साधारणपणे 100 किलो नत्र (225 किलो युरिया), 25 किलो स्फुरद (150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे.
 • 50 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद पुनर्लागणीनंतर दहा दिवसांनी झाडाभोवती खुरप्याच्या साहाय्याने रिंग पाडून पहिला हप्ता द्यावा.
 • पुनर्लागणीनंतर एक महिन्यानेनत्राचा दुसरा हप्ता (फुले लागण्यास सुरवात होताना) 50 टक्के नत्र रिंग पद्धतीने झाडांना द्यावे.

किड व रोग व्यवस्थापन:

पिकावरील रोग:

१. मर –

 • गादीवाफ्यात किंवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात
 • उपाय: 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.

२. फळे कुजणे आणि फांद्या वाळणे –

 • या रोगाच्या प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात.
 • दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात.
 • बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात.
 • उपाय : या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्‍या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

३. भुरी –

 • (पावडरी मिल्ड्यू) भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते.
 • या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
 • उपाय : भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्‍यात मिसळून मिरचीच्‍या पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने दोन फवारण्‍या कराव्‍यात.

chilli

महत्वाच्यी किडी

१. फुलकिडे (थ्रिप्स) – ह्या किटकांचा रंग फिकट पिवळा असतो.

 • हे किटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणा-या रसाचे शोषण करतात.
 • त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात.
 • फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
 • उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

२. कोळी (माईटस)

 • कोळी पानातील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. चुरडलेल्या पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात. फुलांच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले गळतात.
 • फळे वेडीवाकडी होतात आणि फळांच्या आकार लहान राहतो.
 • उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

३. मावा –

 • मावा हे किटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात.
 • त्यामुळे नविन पाने येणे बंद होते.
 • उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन:

 • रोप शेतात लावल्यानंतर ९० -१०० दिवसांत काढणीस तयार होते.
 • ६० दिवसापर्यत ६ -१० तोड मिळतात.

mirch

उत्पादन :

 • पिकाच्या वाणानुसार उत्पादन मिळते.हेक्टरी ७० ते १०० क्विंटल उत्पादन आपणांस मिळते.
 • लाल रंगाचा मिरच्या काढणीनंतर ४ – ५ दिवस सुर्यप्रकाशात वाळवतात व नंतर त्यांचे आकारप्रमाणे व रंगाप्रमाणे प्रतवारी करावी.

Related posts

Shares