Search

सिरकॉट द्वारे कापुस प्रक्रिया उद्योगात क्रांती – “नॅनो सेल्युलोज प्लांटचे” मुंबईत उद्घाटन

सिरकॉट द्वारे कापुस प्रक्रिया उद्योगात क्रांती – “नॅनो सेल्युलोज प्लांटचे” मुंबईत उद्घाटन

केंद्रीय कपास प्रौद्यागिक संस्था (सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी-CIRCOT) , मुंबई ही संस्था १९२४ मध्ये स्थापन झाली. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या, कृषी संशोधन विभागाच्या अखत्यारीत असलेली ही संस्था कापसापासून कापड बनवण्याच्या तंत्रज्ञानातील संशोधन कार्यात, तसेच उत्पादित कापडाच्या प्रतवारीचे प्रमाणीकरण पडताळून पाहण्याच्या पद्धतीतील विकसन कार्यात देशभरात आजही अग्रणी संशोधन संस्था म्हणून गणली जाते.

याच संस्थेमार्फत एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०१५ रोजी “नॅनोसेल्युलोज् प्लांटचे” पद्म विभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या शुभहस्ते माटुंगा मुंबई येथे उद्घाटन करण्यात आले. हि एका रुपाने कापुस प्रक्रिया उद्योगातील क्रांतीच म्हणावी लागेल. यावेळी डॉ.अय्यपन(कृषि संशोधन व शिक्षण विभाग), डॉ.अलगुसुंदरम् (सहससंचालक –अभियंता)आय.सी.ए.आर., डॉ.मायी, माजी अध्यक्ष (ASRB), श्री.सुरेश कोटक, वरिष्ठ उद्योजक संबंधित मान्यवर उपस्थित होते.

सिरकॉटने केंद्रिय कृषी अनुसंधानच्या अंतर्गत कृषी क्षेत्रामध्ये अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाच्या संशोधनावर(Nano Technology) भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याच अनुषंगाने या प्रकल्पाची निर्मीती करण्यात आली. अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाने (Nano Technology) विज्ञान, फार्मा, ईलेक्ट्रॉनिक आणि रासायनिक उद्योगामध्ये अमुलाग्र क्रान्ती केली असुन अशीच क्रान्ती अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाद्वारे कृषी व कृषी आधारित क्षेत्रातही व्हावी हा उद्देश डोळ्यसमोर ठेऊन हा प्रकाल्प कार्य करणार आहे.

कापुस व त्यासंबंधीत तंतुमय पदार्थांचा वापर करुन अतिसुक्ष्मतंत्रज्ञानाच्या आधारे विवीध उत्पादनांच्या निर्मीतीसाठी व उत्पादनांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशिर ठरेल. यासाठी कापसाचे उत्पादन झाल्यावर मिळणा-या टाकाऊ तंतुपासुन/पदार्थांचा यासाठी वापर करण्यात येईल. यामुळे कापसाचे मुल्यवर्धन होणार असुन यामुळे शेतक-यांना नवीन बाजारपेठ निर्माण होणार आहे.

या तंत्रज्ञानाद्वारे कापसाच्या दुय्यम उत्पादनांचा वापर कागदांची व प्रिंटची गुणवत्ता सुधारण्यासाठी, स्क्रॅच प्रतिबंधक उत्पादनात, औषधी उत्पादनात केला जाईल.ICAR सिरकॉट नॅनो सेल्युलोज प्लांट हे एकमेव प्लांट असणार आहे ज्या द्वारे कापसाच्या दुय्यम व टाकाऊ पदार्थांद्वारे १० किलो प्रती दिवस नॅनो सेल्यलोज बनविण्यात येणार आहे.

या सिरकॉटच्या उपक्रमामुळे भारतीय कपास शेतीला विकासाची एक नविन दिशा मिळाली आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

संदर्भ : सिरकॉट, माटुंगा

Related posts

Shares