Search

मल्चिंग च्या मदतीने कापूस लागवड

मल्चिंग च्या मदतीने कापूस लागवड
[Total: 4    Average: 3.3/5]

आपण एखाद काम करताना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही कि मग आपल्याला नैराश्य येते. अशावेळी गरज असते नेहमीच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्याची, काहीसा वेगळा नवीन मार्ग आत्मसात करण्याची. सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची समस्या तर आहेच. अशावेळी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणे गरजेचे आहे. या लेखात आपण मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन यांच्या मदतीने कापसाची शेती केल्यास काय फायदा होऊ शकतो याचा आढावा घेऊया.

कापसाला अपेक्षित भाव मिळावा, अशी मागणी सुरू आहे तर दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकरी एकरी पस्तीस क्विंटल कापसाचे उत्पादन घेण्यात यशस्वी होत आहेत. मल्चिंग आणि ठिबकचा वापर हे या यशामागचे महत्वाचे सूत्र आहे. ठिबक सिंचनाच्या मदतीने ऊस, केळी, हळद, अद्रक, ज्वारी, कापूस यांचे विक्रमी उत्पादन नेहमीच्याच खर्चात मिळविता येणे शक्य आहे.

लागवड कशी करावी

 • मल्चिंग च्या मदतीने कापसाची लागवड करताना सहा बाय एक अंतरावर बी. टी. वाणाच्या कपाशीची लागवड करावी. कोरडवाहू शेतीसाठी अजित १५५ हे वाण उत्तम ठरते.
 • सपाट जमिनीवर ठिबकच्या नळ्या अंथरून कोरडवाहू वाणाची लागवड केल्यास त्याला बागायतीचे स्वरूप देत उत्पादन घेता येऊ शकते.
 • बेड भरताना सुपर फॉस्फेट, पोटॅश, युरिया व लिंबोळी यासारख्या खतांचा वापर केला तर चांगले परिणाम मिळू शकतात.

ठिबक सिंचन माध्यम

 • ठिबकमधून १९-१९-१९ युरिया, ०-५२-३०,१२-६१.००, ०-०-५० ही खते नियोजनानुसार प्रमाणित स्वरूपात देणे आवश्यक आहे.
 • गरजेनुसार विविध कीड व रोग प्रतिकारक फवारण्या केल्यास किडी आणि विविध रोगांवर नियंत्रण मिळू शकते.

लागवड व्यवस्थापन

 • लागवड व्यवस्थापनादरम्यान संकरित बीटी कपाशीच्या वाणाची निवड करून दोन ओळींत पाच फूट अंतर ठेवून उभे काकर पाडावेत.
 • याच काकरावर ठिबकची लॅटरल पसरवावी. प्रत्येक ठिबकच्या छिद्रात दीड फूट अंतर असते. याच छिद्राला लागून कपाशीच्या बिया लावाव्या.
 • अशाप्रकारे दोन दिवसात तीन माणसे एक एकरात लागवड करू शकतात आणि साधारणपणे एका एकरात सुमारे ४८०० झाडांची लागवड करता येऊ शकते.

व्यवस्थापनाचे इतर पैलू –

 • ठिबकने पाण्याचे आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करावे. लागवडीपूर्वी अर्धा तास आणि लागवडीनंतर एक तास पाणी द्यावे.
 • रासायनिक खतांचा अति वापर टाळावा, विद्राव्य खतांच्या वापरावर अधिक भर द्यावा.
 • कापूस वेचणीत सातत्य ठेवावे, यासाठी मजूर कायम कामावर ठेवल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.
 • पेरणीपूर्वी सेंद्रिय खताचा वापर करावा एक एकरासाठी पाच ट्रॉली शेणखत पुरेसे ठरते.
 • लेंडीखतासाठी शेळ्यांचे संगोपन करावे उन्हाळ्यात शेळ्यांचा मुक्काम शेतावर ठेवावा.
 • शेळ्या गवत साफ करतात आणि लेंडी खत आणि मूत्र जमिनीस मिळते.

या  संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी  असल्यास आपण खालील नंबर वर संपर्क करा-

७७७४०४२२४४

७७७५००११८८

 

Related posts

Shares