Search

सिताफळ लागवडीचा मूलमंत्र

सिताफळ लागवडीचा मूलमंत्र

buttons eng-min

सिताफळ हा पानझडी वृक्ष मूळचा उष्णकटीबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील असून शतकाच्या अखेरीस याची आयात भारतात पोर्तुगीजांनी केली आहे. हा वृक्ष भारतात सर्वत्र लागवडीत असून महाराष्ट्रामध्ये या कोरडवाहू फळझाडाची  महाराष्ट्रमध्ये ह्या कोरडवाहू फळझाडाची लागवड जळगाव, बीड, दौलताबाद (औरंगाबाद), अहमदनगर नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त व हलक्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात केली जाते.

हवामान व जमीन

महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. उष्ण व कोरड्या हवामानातील सिताफळे चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची, गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. मोहोराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. पावसाळा सुरु झाल्याखेरीज झाडांना फलधारणा होत नाही. साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी ५००-७५० मिमि पाऊस आवश्यक असतो.


सुधारित जाती :

आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ ह्या जाती उत्पादन व दर्जाच्या दृष्टीने चांगल्या आढळून आलेल्या आहेत. वॉशिंग्टन पी-१,बार्बाडोस या सुद्धा सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत.

लागवड:

  • सिताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापुर्वी मे महिन्यात  ०.६०×०.६०×०.६०  मीटर  आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून घ्यावे.
  • ५×५ मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. या अंतराने लागवड केल्यास हेक्टरी ४०० झाडे   बसतात.
  • हे खड्डे पावसाळ्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फोस्फेट पोयटा मातीसह भरावेत.
  • थायमेट १० जी बांगडी पध्दतीने वापरण्यात यावे.
  • यासाठी हेक्टरी अर्धा टन शेणखत, २०० किलो सिंगल सुपर फोस्फेटची आवश्यकता आहे.
  • अशा प्रकारे खड्डे भरल्यानंतर झाडाची लागवड पावसाळ्यात करावी.

खते :

सिताफळाच्या झाडांना सहसा नियमितपने खते दिली जात नाहीत. परंतु मोठे व चांगले उत्पादन येण्यासाठी पावसाळा सुरु झाल्याबरोबर प्रत्येक झाडाला २ ते ३ पाट्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे योग्य ठरते. तसेच पहिल्या ३ वर्षापर्यंत प्रत्येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.

वर्षे               नत्र(ग्रॅम)                स्फुरद(ग्रॅम)                    पालाश(ग्रॅम)

१                १२५                             १२५                          १२५

२                २५०                             २५०                         २५०

३                ३७५                             २५०                         २५०

५ वर्षापुढील प्रत्येक झाडाला ५-७ पाट्या शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि २०० ते ५०० ग्रॅम युरिया द्यावा.

पाणीपुरवठा :

सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. परंतु फळे पक्क होण्याच्या सुमारास एक दोन वेळेस पाणी फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. पावसाचा ताण जास्त पडल्यास १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.

आंतरपिके

सिताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात जमिनीच्या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्यादी पिके घेता येतात.

संदर्भ – कृषी रहस्य

Related posts

Shares