Search

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५
[Total: 0    Average: 0/5]

देस्ता टॉक तुमच्या गावात घेऊन येत आहे शेतकरी मेळावा खास तुमच्यासाठी. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करता यावे यासाठी देस्ता टॉक तर्फे विविध कल्पक कार्यक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून देस्ता आता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. या अंतर्गत केळवे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच जीवनमान सुधाराव यासाठी देस्ता कडून नेहमीच  उपक्रम राबविले जातात. यासाठीच देस्ता टॉक आणि देस्ता मार्ट यांची निर्मिती करण्यात आली. देस्ता टॉक या पोर्टल च्या  माध्यमातून शेतकऱ्यांना मराठी भाषेत वैविध्यपूर्ण माहिती दिली जाते. तर, देस्ता मार्ट हे भारतातील पहिले B2B अॅग्री इनपुट ई – कॉमर्स पोर्टल आहे.

शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने देस्ता तर्फे ‘देस्ता शेतकरी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती बरोबरच त्यांचा उत्साह वाढविणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन या मेळाव्या दरम्यान केले जाणार आहे. हा एक दिवसीय मेळावा शेतकऱ्यांना खूप काही देऊन जाईल. या मेळाव्यात खालील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

विशेष आकर्षण –

  • स्थानिक प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान
  • शेतकऱ्यांना तज्ञांच मार्गदर्शन
  • शेतकऱ्यांसाठी दर्जेदार उत्पादनांचे प्रदर्शन
  • कृषी क्षेत्रातील आकर्षक नोकरीची संधी
  • भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना स्मार्ट फोन बरोबरच आकर्षक बक्षिसे

देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळावा – केळवा – २०१५

स्थळ – श्री शितळादेवी मंगलधाम,

शितळादेवी मंदिराशेजारी,

केळवे – जिल्हा पालघर.

दिनांक  – २२ डिसेंबर २०१५.

वेळ – सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

Related posts

Shares