Search

भारताच्या कृषी विकासासाठी डॉ. ए.पी.जे.कलामांची सात सुत्रे

भारताच्या कृषी  विकासासाठी डॉ. ए.पी.जे.कलामांची सात सुत्रे

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक शास्त्रज्ञ, एक प्राध्यापक, एक अभ्यासु वक्ता, दूरदृष्टी असलेला विचारवंत… काय आणि किती लिहावं, जिथे शब्द अपुरे पडतील, विशेषणे ठेंगणी भासू लागतील असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे ‘भारतरत्न’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. आपल्या नेहमीच्या बघण्यात वाचण्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्या आपल्याला जवळच्या वाटतात. डॉ. कलाम यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आणि म्हणूनच त्यांचे अकाली जाणे सगळ्यांना चटका लावून गेले. आपल्या घरातील, आपल्या जवळचे कोणी आपल्याला सोडून गेल्यावर व्हावे इतके अतीव दु:ख झाल्याची भावना अवघ्या देशभरात व्यक्त होते आहे.

 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाची बातमी आली आणि लगेचच सगळ्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणाऱ्या बातम्या प्रसारित करायला सुरुवात केली. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडिया अत्यंत प्रभावी मध्यम म्हणून नावारूपाला आला आहे. सोशल मिडिया वर डॉ. कलाम यांनी मिळवलेल्या विविध याशोगाथांबाबत भरभरून लिहिले गेले. हे सगळे नजरेखालून जात असताना मेंदू मध्ये एकच विचार येत होता कि असे प्रेम, अशी श्रद्धा आणि असा आदर मिळविण्यासाठी माणसाला सर्वसामान्यांचा हिरो होणे गरजेचे असते. यासाठी, डॉ. कलामांनी वेगळे असे काही केले नाही, फक्त आपले काम नेटाने करत राहिले.  डॉ. कलाम यांना भारतातील शेती आणि शेतकरी यांच्याविषयी खूप आदर होता. शेतीचा विकास होणे गरजेचे आहे असे त्यांना मनोमन वाटत असे.

कृषी विकास कसा व्हावा, यासाठी त्यांनी काही सूत्रांचे अवलंबन केले जावे असे सुचविले होते. यातील महत्वाच्या सात सूत्रांचा आपण आढावा घेऊया.

 

भारतीय कृषी विकासासाठी डॉ. कलामांची ७ सूत्रे. 

 

  • शेतकरी संघटनांची निर्मिती करणे – भारतात कुटुंब व्यवस्थेमुळे शेतांची रचना विभाजित असून प्रती शेतकरी जमीन मालकी अतिशय कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघातीती होऊन सहकारी पद्धतीने शेती केल्यास नक्कीच विकास होईल.

 

२) शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर – सहकारी पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना शेतामध्ये यंत्राचा वापर करणे सुलभ जाईल आणि त्यामुळे शेती उत्पादन खर्च कमी होऊन कामे जलद गतीने होतील.

 

३) शेतमाल प्रक्रियांचा विकास – जागतिक स्तरावर पाहायला गेलं तर कृषी उद्योग हा सगळ्यात प्रबळ उद्योग आहे. कृषी उत्पादनात वाढ झाली तर केवळ शेतकऱ्याचे उत्पन्न वाढत नाही तर याचा फायदा शहरी भागात अन्नधान्य आणि कच्च्या मालाची पूर्तता करण्यास होतो. म्हणूनच कृषी उत्पादनात होणारी वाढ शेतमाल प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकते.

 

४) सुयोग्य खतांचा वापर – माती परीक्षण करून त्यओरमाणे योग्य प्रमाणात व योग्य वेळी खतांचा वापर केल्यास पिकांची उत्पादकता नक्किच वाढेल.

५) मिश्र व बहुवार पीक नियोजन पद्धतीचा वापर – शेतकऱ्यांनी योग्य पीक नियोजन करून आपल्या नामिनिमध्ये बहुवार पिकाचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मातीचा पोट बिघडणार नाही व शेतकऱ्याला जोखीम घेत येणार नाही.

 

६) पाण्याचे सुयोग्य नियोजन – पिकांना आवश्यकतेप्रमाणे योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकांचा योग्य अभ्यास करून पाणी दिल्यास कृषी मालाची उत्पादकता वाढण्यास मदत होते.

 

७) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास – शेती क्षेत्राच्या विकासासाठी ग्रामीण भागातील रस्ते, वीजपुरवठा, पाणी व्यवस्थापन/ स्त्रोत, दळण वळण कृषी विपणनाची मुलभूत साधने  यांचा विकास केल्यास त्याचा थेट फायदा शेती उद्योगास होईल.

 

एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेले योगदान कधीही विसरता येणे शक्य नाही. त्यांनी सुचविलेल्या या सात सूत्रांचा अवलंब केल्यास कृषी क्षेत्रात नक्कीच प्रगती होईल अशी आशा वाटते.

 

Related posts

Shares