Search

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘देस्ता टाॅक ‘ चा मानाचा सलाम…

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ‘देस्ता टाॅक ‘ चा मानाचा सलाम…

अब्दुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम म्हणजेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर , १९३१    रोजी तमिळनाडू येथील रामेश्वर इथे झाला. बिकट परिस्थितही नवीन शिकण्याची प्रबळ इच्छा उराशी बाळगत, अपार कष्ट करत कुटुंबाला उदार्निर्वाहाला मदत व्हावी यासाठी वर्तमान पत्र विकून त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले. काळ पुढे सरकत गेला तसतसा  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रगतीचा आलेखही उंचावत गेला. एक पेपर विक्रेता ते भारताचे राष्ट्रपती हा कोणालाही स्वप्नवत वाटेल असा त्यांच्या प्रवास खरोखरच प्रेरणादायी असा आहे.

लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.  वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे.  सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती . क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

गौरव
भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
Year of Award or Honor Name of Award or Honor Awarding Organization
१९८१ पद्मभूषण भारत सरकार
१९९० पद्मविभूषण भारत सरकार
१९९७ भारतरत्न भारत सरकार
१९९७ इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार भारत सरकार
१९९८ वीर सावरकर पुरस्कार भारत सरकार
२००० रामानुजम पुरस्कार मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर
२००७ किंग चार्ल्स (दुसरा) पदक ब्रिटिश रॉयल सोसायटी
२००७ डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K
२००८ डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa) नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर
२००९ हूवर पदक ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)
२००९ आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A
२०१० डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग वॉटरलू विद्यापीठ
२०११ न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व. IEEE

‘२००२ – ते २००७’  दरम्यान,  त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषविले.  आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

काल शिलॉंग इथे आय. आय. एम इथे ते व्याख्यानासाठी गेले होते. व्याख्यानादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले झाले.  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे अवघा भारत शोकाकुल झाला आहे. देस्ता टाॅक कडून भारताच्या या महान शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा.

Related posts

Shares