Search

|| स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते ||- पद्मविभुषण डॉ.माशेलकर

|| स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते ||- पद्मविभुषण  डॉ.माशेलकर

पुर्वीपासुनच भारतीय संस्कृती, साहीत्य,कला, वेदांपासुन अतुलनीय असे ज्ञान संपुर्ण जगाला संपादन होत आहे. त्यामध्ये महर्षी कणाद, आद्य शंकराचार्य, डॉ. जगदीश्चंद्र बोस डॉ.होमी भाभा, पासुन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांपर्यंत असंख्य विद्वानांचे योगदान लाभले आहे. हे सर्व वैज्ञानिक भारताला मिळेलेले वरदानच म्हणावे लागेल.

काही दिवसापुर्वीच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या निधनाने भारतातच नव्हे तर संपुर्ण विश्वात हळ हळ व्यक्त करण्यात आली, एवढेच नव्हे तर स्वित्झरलंड या देशाने २६ मे हा दिवस डॉ. कलामांच्या भेटीच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या वैज्ञानिकांची यादी डॉ. माशेलकरांचं नाव घेतल्या शिवाय पुर्ण होणार नाही. २०१४ साली डॉ. माशेलकरांना पद्म विभुषणाच्या सन्मानाने गौरविण्यात आलं त्यांनी आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाविषयीचा हा दृष्टीक्षेप…

माशेल (गोवा) येथे रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म झाला. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. गिरगांव चौपाटीवर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करून त्यांनी अनेक शिष्यवृत्ती मिळवल्या. १९६६ मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.काही काळ युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड (लंडन) येथे व्याख्याता म्हणून काम केले. पुढे त्यांनी डेन्मार्कमधील एका विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले.

त्यानंतर, अमेरिकेतील डेलावेअर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांची पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी – एन.सी.एल. (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) येथे संचालक म्हणून नेमणूक झाली. डॉ. माशेलकरांनी या प्रयोगशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका व युरोपमध्ये निर्यात होत आहेत. पॉलिमर सायन्स व अभियांत्रिकी ही त्यांची अभ्यासाची अन् संशोधनाची क्षेत्रे होत.

सलग ११ वर्षासाठी सेंटर फॉर सायंटिफीक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) चे महासंचालक पदभार सांभाळत असताना त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून देशाची प्रगती ह्या सूत्रावर भर दिला. त्या संस्थेच्या अनेक शाखा(३८ शाखा) त्यांनी कार्यान्वित केल्या. तसेच या माध्यमातून त्यांनी असंख्य संशोधक तयार केले. पेटंटबाबत त्यांचे योगदान अविश्वसनियच म्हणावे लागेल.‘Patent or Perish’ असा इशाराच त्यांनी दिला होता.

हळद, बासमती व कडुलिंब यांच्या पेटन्ट्सबाबतचा लढा यशस्वीपणे लढून त्यांनी अमेरिकेकडून ही पेटन्ट्स परत मिळवली.‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून  संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्याचबरोबर सन २००० साली डॉ. माशेलकरांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक पदही भुषविले.

औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ.रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं.

डॉ. माशेलकर हे Global Research Alliance ह्या संस्थेचे अध्यक्षपद भुषवित असुन या संस्थेमध्ये आशिया-पॅसिफिक, युरोप, व अमेरिकेचे ६०,०००पेक्षा अधिक संशोधक समावेषित आहेत.

Fellow of Royal Society (London- in1998), Foreign Associated with National Academy of Science (USA -2011), Foreigh Fellow of US National Academy of Engineering(2003), Fellow of World Academy of Arts and Science (USA-2003) अशा अनेक जागतिक स्तरातील संस्थांमध्ये त्यांची सहकारी म्हणुन निवड करण्यात आली.

त्याचप्रमाणे रिलायंन्स, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर अशा अनेक नामांकित संस्थांचे संचालक मंडळात ते महत्वाची भुमिका बजावत आहेत.  Business India च्यानुसार डॉ.माशेलकरांना नाविन्याची कास धरणा-या(Path Breakers) स्वातंत्र्यौत्तर भारताच्या पहिल्या ५० व्यक्तींमध्ये  समावेषित करण्यात आले. माशेलकर यांना पन्नासहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री(१९९१), पद्मभूषण(२०००), पद्मविभुषण(२०१४) तसेच शांतीस्वरूप भटनागर मेडल, मटेरिअल सायंटिस्ट ऑफ दी इयर, पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी ग्लोबल अॅवॉर्ड हे त्यांपैकी काही होत.

नवीन संशोधनाद्वारे “More From Less For More” हे त्यांचे घोषवाक्य असुन त्यासाठी नवनवीन संशोधकांना नवनवीन संशोधकांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते निरंतर कार्य करत आहेत. नुकत्याच सिरकोट (केंद्रीय प्रौद्यगिक अनुसंधान संस्थान) संस्थेच्या नॅनो सेल्यलोज प्लांटचे उद्घाटन डॉ.माशेलकरांच्या सुहस्ते करण्यात आले. या निमीत्ताने यांचा सत्कारही करण्यात आला.

 

 

 

Related posts

Shares