Search

महाराष्ट्रातील १०५३ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती

महाराष्ट्रातील १०५३ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती
[Total: 0    Average: 0/5]

पाण्यावाचून जीवन नाही, पण आज महाराष्ट्रातल्या अनेक गावात प्यायला पाणी नाही. मग शेती तर दूरच राहिली. मागील मान्सून मध्ये वरून राजा रुसला आणि अगदीच थोडा बरसला. परिणामी पाणी टंचाईचा सामना करत शेतकरी बांधवांनी खरिफ हंगामात शेती केली. कारण निसर्गाशी दोन हात करण्याची जणू बळीराजाला सवयच झाली आहे. पण मान्सून मध्ये पाऊस कमी पडला आणि त्याचा विपरीत परिणाम रब्बी हंगामात दिसला. या वर्षी कधी नव्हे ते रब्बी हंगामात बळीराजाला दुष्काळाचा मुकाबला करावा लागला. हा दुष्काळ इतका आहे कि राज्य शासनालाही याची दाखल घ्यावी लागली आणि परिणामी अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातील जवळपास १०५० पेक्षा अधिक गावे दुष्काळ सदृश घोषित करण्यात आली आहेत.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. या भागात टंचाई निवारणाच्या सवलती लागू करण्यात येतील अशी माहितीही श्री. खडसे यांनी दिली आहे.

सध्या जी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे ती लक्षात घेता अहमदनगर ४०८ आणि सोलापूर मधील ६४५ गावांमध्ये शासनातर्फे काही महत्वाची पावले उचलली जाणार आहेत.

  • दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांचा सारा माफ केला जाणार आहे.
  • कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे.
  • आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी टॅन्करच्या मदतीने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
  • शेतीशी निगडीत कर्जवसुलीस स्थगिती दिली जाणार आहे.
  • शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडित केली जाऊ नये.
  • सरकारी बँकामार्फत देण्यात आलेल्या पीक कर्जाचे पुर्नगठन केले जाणार आहे.

अशा विविध सवलती रज्यशसनतर्फ़े दिल्या जातील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी दिली आहे. राज्यातील १५ हजार गावांमध्ये गावांमध्ये दुष्काळ आहे. केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारला आत्ता पर्यंत ३ हजार ४१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या मदतीचा शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच राज्यसरकारतर्फे घोषणा करण्यात आलेल्या सवलतींमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या बरोबरच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे नेहमीच सांगितले आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी अशा नरेंद्र मोदी  यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी शेताच्या सीमेवर मोठी झाडे लावावी कारण औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सी वूड ची गरज असते याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आहे. तसेच कोळी बांधवांनी समुद्रा शेजारी शेती करावी असे पंतप्रधानांनी सुचविले आहे. शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशी अशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. जर खरेच असे झाले तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी अशा वाटते. मात्र यासाठी कृती महत्वाची आहे.

 

Related posts

Shares