Search

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??

कसे कराल परदेशी भाजीपाल्याचे उत्पादन ??

भाजीपाला उत्पादनात जगामध्ये भारत दुस-या क्रमांकाचा देश आहे. एवढेच काय जगाच्या एकुण उत्पादनाच्या १४% उत्पादन केवळ भारतातच होते. म्हणजेच भारतीय हवामान शेतीसाठी अनुकुल आहे.

भाजीपाल्याच्या मागणीबरोबरच ब्रोकोली,आईसबर्ग(लेट्युस), चायना कोबी, सिलेरी, बेंझिल, झुकीनी, थायचिली, लिक, चाईव्ज इ. जीवनसत्त्वांनी युक्त परदेशी (एक्‍झॉटिक) भाज्यांना सॅलडसह विविध डिश तयार करण्यासाठी तसेच हॉटेलमध्येही वाढती मागणी आहे. त्यामुळेच या भाजीपाल्यांना विशेष वाव आहे.या भाजीपाल्या बाजारात विशेष मागणी असुन सामान्य भाजीपाल्याच्या दुप्पट ते तिप्पट भाव मिळतो. महाराष्ट्र राज्यात पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यात या भाजीपाल्याची लागवड वाढत असुन रब्बी हंगामासाठी उर्वरीत जिल्ह्यांमध्येही परदेशी भाजीपाल्याची लागवड फायद्याची ठरु शकते.

परदेशी भाजीपाला पिकांच्या ब्रोकोलीमध्ये मोठे गड्डे मिळवण्यासाठी खोडावर पानाच्या बगलेत येणारी फुट काढुन टाकावी.

ब्रोकोली लागवड:

जमिन व हवामान:

ब्रोकोली पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते.

लागवड कालावधी:

 • लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
 • लागवड करताना रोपांची मुळे ॲझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाच्या द्रावणात बुडवून लावावीत.

सुधारित वाण:

 • लागवडीसाठी गणेश ब्रोकोली या जातीची निवड करावी.
 • या जातीचा गड्डा आकर्षक, हिरव्या रंगाचा असून सरासरी वजन 180 ते 200 ग्रॅम असते.

लागवडीची पद्धत :

 • रोपांची लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यात करताना दोन ओळींमध्ये 60 सें.मी. आणि दोन रोपांत 45 सें.मी. अंतर ठेवावे.
 • बियाणे प्रति हेक्टरी ४०० ग्रॅम वापरावे.

खत व्यवस्थापन :

 • या पिकांना लागवडीपुर्वी चांगले कुजलेल शेणखते २० टन/एकर, एकरी३०:२०:३० किलो नत्र:स्फुरद:पालाश मिसळुन सपाट किंवा गादीवाफ्यांवर लागवड करावी.
 • एक महिन्याने उरलेले३० किलो नत्र द्यावे.

आंतरमशागत:

 • लागवडी नंतर पिकांमध्ये १५ दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणी करणे, वेळेत पाणी देणे आणि पिक तणविरहित ठेवणे उत्पादन वाढीसाठी गरजेचे असते.
 • झाडांना मातीचा आधार द्यावा.
 • . पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

किड व्यवस्थापन:

 • या पिकावर चौकोनी ठिपक्यांचा पतंगचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
 • या पिकाच्या नियंत्रणासाठी फ्लुफेनोझुरॉन १० मि.ली./१० लिटर प्रमाणे फवारावे.

रोग व्यवस्थापन :

 • केवडा : मेटॅलॅक्झीम एम झेड ७२.२५ ग्रॅम /१०० लि. प्रमाणे फवारावे
 • मर : कॅप्टन ५० डब्लु ३० ग्रॅम /१५ लिटर मिसळुन फवारणी करावी.

काढणी :

 • पक्वता आल्यावर ब्रोकोलीचा गड्डा घट्ट व हिरवागार दिसतो.
 • लागवडी नंतर ६०-७० दिवसात ब्रोकोली काढणीस तयार होते.
 • गड्ड्यावर मोहरीच्या दाण्यांप्रमाणे गोलाकार फुलांचा कळीचा भाग दिसतो.
 • त्यापुर्वी गड्डा काढल्यास गड्ड्याचे वजन कमी भरते आणि उशिर झाल्यास गड्डा विस्कटतो व चव कडवट लागते.
 • ब्रोकोलीची काढणी करताना गड्डा १०-१२ सेमी खोड ठेवून काढावा.
 • साधारणपणे योग्य व्यवस्थापन केल्यास ब्रोकोली पिकाचे उत्पादन ६५-७० क्विंटल/हेक्टर येते.

त्याबरोबरच इतर  पिकांची माहिती पुढील लेखात घेऊ.

 

संदर्भ :शेतकरी मासिक, महाराष्ट्र शासन

Related posts

Shares