Search

ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा वापर फायद्याचा

ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा वापर फायद्याचा
[Total: 18    Average: 3/5]

देस्ता टॉक च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी यासंदर्भात आपण वेळोवेळी माहिती देत असतो. याआधी आपण मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या मदतीने कापूस लागवड कशी करता येईल हे जाणून घेतले. या लेखात आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्यात विरघळणारी खते म्हणजेच विद्राव्य खतांचा कसा वापर करावा हे जाणून घेऊया.

ठिबक सिंचनासोबत पाण्यात विरघळणारी खते वापरण्याच्या तंत्रास “फर्टिगेशन” तंत्र असे म्हणतात. राज्यात सुमारे 16 लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन तंत्राचा वापर भाजीपाला,फळे,फुले, नगदी पिके आणि अन्य पिकांसाठी होत आहे. खताचा वापर ठिबक सिंचन पद्धतीमधून केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते, त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन तर मिळतेच आणि त्याचबरोबर गुणवत्ताही वाढते.


कमी वेळात अधिक पाणी दिल्यास पाण्याचा जमिनीतून निचरा होऊन जातो. त्याचबरोबर रासायनिक खतांमधील अन्नद्रव्यांचाही निचरा होऊन जातो,त्यामुळे पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या खोलीचा भाग कायम वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी देणे क्रमप्राप्त ठरते, त्यामुळेच ठिबक सिंचन पद्धतीचा पिकांमध्ये फायदा दिसून आलेला आहे.

 

विद्राव्य खतांचे फायदे – 
१) पाण्यात विद्राव्य असल्यामुळे पिकांस लगेच उपलब्ध होतात. कारण थेट पिकांच्या मुळांच्या कक्षेत दिली जातात त्यामुळे मुळांना त्वरित उपलब्ध होतात.

२) निर्यातक्षम गुणवत्तेचे विक्रमी उत्पादन मिळते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.

३) पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार दररोज अथवा दिवसाआड देता येतात. योग्य नियोजन शक्य होते.

४) विद्राव्य खते सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळांवर अनिष्ट परिणाम होत नाही.

५) खते देण्याची पद्धत अतिशय सोपी व सोयीची असल्यामुळे वेळ, मजूर, खर्च, ऊर्जा, यंत्रसामग्रीची बचत होते.

६) आम्लधर्मीय असल्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत होते. शिवाय ठिबक संचात क्षार साचत नाहीत. ड्रिपर्स चोक होत नाहीत.

७) साधारणपणे २५ टक्क्यांपर्यंत खताची बचत होते.

८) सोडिअम क्लोराईड्‌ससारख्या हानिकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे जमिनीच्या पोताचा ऱ्हास होत नाही.

९) हलक्या् जमिनीतही फर्टिगेशनच्या मदतीने अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते.

१)   १९:१९:१९

यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र हा अमाईड, अमोनिअम व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो.
२) १२:६१:०

यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच फळ-फांद्यांच्या वाढीसाठी या खताचा उपयोग होतो, याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात.
३) ०:५२:३४

फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळांची योग्य पक्वता व रंगासाठी हे खत वापरले जाते. या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात.
४) १३:०:४५

या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी व पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्‍यकता असते. या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते.

ठीबकच्या माध्यमातून विद्राव्य खते वापरल्यास मजूर कमी लागतात, काम वेगाने होते, उत्पादन दर्जेदार होते आणि महत्वाचे म्हणजे वाढते. याचा फायदा शेतकऱ्याला होतो. यामुळेच शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.

यासंदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास ७७७५००११८८ या क्रमांकावर संपर्क साधा. 

 

 

 

Related posts

Shares