Search

एकीचे बळ मिळते फळ – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची

एकीचे बळ मिळते फळ  – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची
[Total: 2    Average: 2/5]

एकीचे बळ मिळते फळ  – यशोगाथा जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघाची

आपण लहानपणी अनेक गोष्टी ऐकतो पण जस जसे आपण मोठे होत जातो तसे आपण या गोष्टी विसरत जातो. पण, जर सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येते कि या गोष्टींमध्ये खरच खूप रहस्य दडले आहे. आणि या गोष्टींमधील महत्वाचा संदेश जर आपण खऱ्या अर्थाने आचरणात आणला तर जगणे खऱ्या अर्थाने परिपूर्ण होऊ शकते. एकीचे बळ मिळते फळ हि गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेलच जुन्नर मधील “जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघ मर्यादित” या संस्थेच्या यशाकडे पाहिल्यावर आपल्याला त्या गोष्टीची प्रचीती येते.

“जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघ मर्यादित” (जुन्नर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी) तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी कार्यरत आहे. श्री. श्रीराम गाडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून या संस्थेचा उदय झाला. आणि २०१२ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्था सुरु करण्यापूर्वी सगळा आवश्यक तो अभ्यास केला गेला. आवश्यक तयारी झाली. चांगला दर्जेदार भाजीपाला उगविला जाणाऱ्या क्षेत्रात जाउन तेथील शेतकऱ्यांना संकल्पना समजावून सांगण्यात आली. एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शेतकऱ्यांना समजावून त्यांचा विश्वास संपादन केला गेला. आणि खऱ्या अर्थाने एकिचे बळ मिळते फळ हि उक्ती प्रत्यक्षात उतरली.

DSCN4980

संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीराम गाडवे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले कि “एकदा शेतकरी उत्पादक संघा संदर्भात माहिती आपल्या वाचनात आली होती. हि माहिती वाचल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी काय करता येईल याचा आपण पाठपुरवा केला. यासाठी आपण इंटरनेट वर सखोल माहिती मिळवली. नवी दिल्ली इथे असलेल्या लघु शेतकरी उद्योग समूह इथे भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि मग खऱ्या अर्थाने लघु शेतकरी सहकारी समूह स्थापन करण्याचे निश्चित झाले सांगताना गाडवे यांच्या आवाजातून एक प्रकारचे समाधान जाणवत होते.

सुरुवातीला आम्ही दर्जेदार भाजीपाला उत्पादन करणाऱ्या विभागांची निवड केली. आणि तेथील शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांना संकल्पना समजावून सांगितली, नफा लक्षात घेता शेतकरी तयार झाले.

DSCN4950

जस जसे सकारात्मक परिणाम समोर आले तसे आमच्याशी अधिकाधिक शेतकरी जोडले गेले आणि आज साधारण ४५० शेतकरी “जुन्नर तालुका शेतकरी उत्पादक संघ मर्यादित” चे सदस्य आहेत अशी माहिती श्री. गाडवे यांनी दिली. जसजसे शेतकरी आमच्याशी जोडले गेले तसे आम्ही शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाला विकला जावा यासाठी काय करता येईल याचा विचार सुरु केला. आणि मग यातूनच आठवडा बाजार हि संकल्पना अस्तित्वात आली. याअंतर्गत शेतकरी एका ठिकाणी आपला भाजीपाला, फळे इत्यादी कृषी माल घेऊन येतात आणि ग्राहक इथे येऊन खरेदी करतात.

Image 1

सध्या पुण्यामध्ये असे एकूण सहा आठवडा बाजार सुरु आहेत आणि आनंदाची बाब म्हणजे याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. लवकरच मुंबईत अशाप्रकारे आठवडा बाजार सुरु करण्याचा आपला मनोदय असल्याचे श्री. श्रीराम गाडवे यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता पुढे वाटचाल करत गाडवे यांनी शेतकरी उत्पादक संघ (FPO) च्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सध्यस्थितीत श्री. श्रीराम गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ शेतकरी उत्पादक संघ (FPO) कार्यरत असून या सगळ्या FPO चे एक फेडरेशन तयार करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेले श्री. गाडवे यांनी केंद्राकडून उत्तम मदत मिळते अशी माहिती दिली. सध्या महाराष्ट्रात ५०० पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक संघ (FPO) कार्यरत आहेत.

DSCN4967

महत्वाची बाब म्हणजे श्री. श्रीराम गाडवे यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी शेतकरी उत्पादक संघ (FPO) च्या संदर्भातील काही महत्वाचे पैलू मांडले.

१. शेतकरी उत्पादक संघ (FPO) ची निर्मिती केल्यास याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.

२. अशाप्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्री. गढवे नाहेमीच तयार आहेत.

३. शेतकरी उत्पादक संघ (FPO) ना सिक्युरिटी डिपॉझिट न भरता १० लाखापर्यंत लोन मिळू शकते.

४. या बरोबरच सरकारकडून इक्विटी ग्रॅन्ड मिळते.

५. शेतकरी उत्पादक संघ (FPO) ची स्थापना करताना योग्य मार्गदर्शन व्हावे आणि फसवणूक होऊ नये म्हणून श्री. श्रीराम गाडवे यांनी सी. ए आणि सी. एस ची नेमणूक केली आहे.

तुम्हालाही जर कृषी उत्पादक संघा संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा जर तुमच्या कृषी उत्पादक संघाची माहिती आम्हाला द्यायची असेल तर संपर्क करा.

७७७५००११८८

 

Related posts

Shares