Search

तंत्रशुद्ध द्राक्ष काढणी

तंत्रशुद्ध द्राक्ष काढणी
[Total: 1    Average: 5/5]

वेलवर्गातील वनस्पती असलेल्या द्राक्षाच्या दोन जाती आहेत. पिवळी द्राक्षे आणि काळी द्राक्षे. उन्हाळ्यातील हंगामात द्राक्ष मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. नाशिक जिल्ह्याला द्राक्षाचे माहेरघर म्हटले तरी वावगे ठरू नये. नाशिक मधील तासगाव,मिरज तालुके (सांगली) हे द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहे .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. सांगली,मनुका उत्पादनात भारतात पहील्या क्रमांकावर आहे. द्राक्ष खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, वाईन व मनुका तयार करण्यासाठी वापरतात. निर्यातक्षम द्राक्षांना असलेली मागणी लक्षात घेत द्राक्ष काढणी हा एक महत्वाचा टप्पा आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने द्राक्ष काढणी कशी करावी यावर प्रकाशझोत टाकूया.
निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीमध्ये द्राक्षाच्या काढणीपासून ते बाजारपेठेपर्यंत फोचेपर्यंत काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये द्राक्षाची पक्वता ओळखून काढणी करणे, त्यानंतर त्याची प्रतवारी करून पॅकिंग करणे, पुर्नशीतकरण वाहतूक करणे आणि शीतगृहात साठवण करणे, काढणी करून झाल्यानंतर त्याची गुणवत्ता कायम राखणे हे मोठे आवाहन असते.
काढणी निकष : (मॅच्युरीटी इंडायसेस)
द्राक्ष हे नाशवंत फळ आहे. एकच वेलीवरील सर्व घड एकाच वेळी काढणीस तयार होत नाहीत, म्हणून जस जसे घड काढणीस तयार होतील तास तशी काढणी करावी. काढणीसाठी पुढील निकष लक्षात घ्यावे. निर्यातक्षम द्राक्षामध्ये त्याची गोडी (Brix) १६ अंश इतकी असावी व साखर व आम्लतेचे प्रमाण २० इतके एगमार्कच्या निर्यात धोरणानुसार असावे. त्यामध्ये एकसारखा मण्यांचा रंग, मण्यांचे एकसारखे आकारमान असावे. रंगीत जातीमध्ये एकसारखा रंग फार महावाचे घटक मनाला जातो.
प्रत्यक्ष काढणी :
द्राक्षांची काढणी दिवसांतील हवा थंड असेल म्हणजे सकाळ किंवा सायंकाळी करावी. यामुळे मण्यांचा श्वसन व बाष्पीभवन क्रियेचा वेग कमी केला जातो. निर्यातक्षम द्राक्षांमध्ये काढणी कुशल कामगारांकडून करून घ्यावी. काढणीसाठी लागणारे घटक जसे कात्री, उत्तम दर्जाच्या असाव्यात. त्याचबरोबर काढणी करताना मण्यांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. एगमार्कच्या निर्यातीच्या धोरणानुसार द्राक्ष घडांच्या वरती घडाला दीड ते दोन सेमी देठ ठेऊन काढणी करावी. द्राक्ष काढणाऱ्या मजुरांच्या हातामध्ये रबरी मोजे असावेत, जेणेकरून मण्यांची चमक जाणार नाही. त्याच्यावरील असणारा मेणासारखा ठार हा उत्तम दर्जा मनाला जातो. तो पुसला जाऊ नये याची काळजी घ्यावी.
काढणी करण्याची योग्य वेळ:
द्राक्षाची काढणी मुख्यत्वे सकाळी करावी म्हणजे पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत करावी. वातावरणातील तापमान २० अंश से. होण्याअगोदर काढणी करून घ्यावी. त्यानंतर ४ अंश से. ला योग्य पद्धतीने इजा न होता साठवण करावी. परंतू या कालावधीमध्ये दवाचे प्रमाण जास्त असले तर द्राक्ष काढणी पुढे ढकलावी. जर द्राक्ष घडांमध्ये काही डागाळलेली, सडलेले मणी असतील तर असे मणी वेगळे करावेत. आणि पुढील कार्यासाठी द्राक्षाची साठवण करावी.

संदर्भ – महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे

Related posts

Shares