Search

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची

२० सुत्रे द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीची

द्राक्षावरिल छाटणीला अनन्यसाधारण महत्व आहे. एप्रिम मधिल खरड छाटणी  व ऑक्टोबर मधिल गोडी छाटणी. सध्याचा काळ ऑक्टोबर छाटणी साठी अतिषय अनुकुल कालावधी आहे.15 ऑक्‍टोबरनंतर शक्‍यतो पाऊस पडत नाही.  त्यामुळे या तारखेनंतर केलेली फळछाटणी सुरक्षित मानली जाते.

खरड छाटणीमध्ये सर्व काडयांची छाटणी जाती आणि वेलींची जाडी वगळुन, पण गोडी छाटणीमध्ये जात आणि वेलीची जाडी यांवर अवलंबुन असते. या लेखात आपण छाटणीपुर्वी, छाटणी करताना व छाटणीनंतर काय खबरदारी द्यावी हे जाणुन घेऊ.

pruning-grapes-above-bud

 1. द्राक्षाची ऑक्‍टोबर छाटणी करताना घ्यावयाची काळजी –
  द्राक्षाची ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे.
 2. छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
 3. ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी 15 दिवस अगोदर एकरी कमीतकमी 20 काड्यांचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.
 4. यामध्ये सबकेन जोडानंतर राखावयाच्या डोळ्यांचा, तसेच सरळ काडीवरील ठराविक आखूड पेरांचा विचार करावा लागतो.
 5. सबकेनच्या जोडाच्या ठिकाणावरील डोळा हा बहुतेक वेळा फलधारक असतो व या ठिकाणचा घड चांगल्या प्रतीचा असतो. यास “टायगर बड’ असे म्हटले जाते. हा डोळा राखून किंवा पुढे एकच डोळा राखून छाटणी करणे योग्य ठरते.
 6. सरळ काडीवरील 6 ते 10 डोळ्यांमध्ये जे पेर आखूड असते, ते राखून पुढे छाटणी करणे योग्य ठरते. कारण आखूड पेऱ्यांवरील डोळे फलधारक असण्याची शक्‍यता अधिक असते.
 7. वेलीवर 6 ते 10 मि.मी. जाडीच्या काड्या राखाव्या. 6 मि.मी. पेक्षा लहान व 10 मि. मी. पेक्षा जाड काड्या काढून टाकाव्यात. हे करताना वेलीवर साधारणतः 30-40 काड्या असतील याची खात्री करावी.
 8. छाटणीसाठी धारदार कात्रीचा वापर करावा व त्या वेळोवेळी कार्बेन्डेझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घ्याव्या.
 9. मंडपावरील एका चौरसफुटात 16 ते 20 पाने असावीत. एकावर एक तीन थरांपेक्षा जास्त पाने नसावीत.
 10. ऑक्टोबर छाटणी सबकेन असेल ते डोळे छाटून घ्यावी. छाटणीनंतर २४ तासाच्या आत १ % बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी. ज्यामुळे छाटणीने झालेल्या इजामध्ये बुरशी फैलणार नाही व जखम लवकर भरून येईल.
 11. काडीवर घ्यावयाचा काप इच्छित डोळ्याच्या 3-4 मि.मी. पुढे असावा, त्यामुळे डोळ्यास इजा होणार नाही व काडीवर जास्त प्रमाणात “डेड वूड’ राहणार नाही.
 12. छाटणीमध्ये वेलीवर कोणत्याही प्रकारचा अपक्व भाग राहू नये, तसेच काडीवर देठांचे अंश राहू नयेत याची काळजी घ्यावी. अपक्व भाग राहिल्यास ते लवकर फुटून येतात व वेलीच्या अवस्थेनुसार करावयाचे एकात्मिक रोग किडी व्यवस्थापन कार्यक्षमपणे होत नाही.
 13. छाटणीनंतर “हायड्रोजन सायनामाइड’ या रसायनाचा वापर फूट निघण्यासाठी केला जातो.
  छाटणीनंतर 24 तासांच्या आत हायड्रोजन सायनामाइडच्या 5% ते 3% द्रावणाचा वापर करावा. द्रावणाची तीव्रता ही अनेक घटकांवर अवलंबून असते व त्यानुसार त्यामध्ये बदल करावेत.
 14. काडीची जाडी – हायड्रोजन सायनामाइडचे प्रमाण
  6-8 मि.लि. – 40-60 मि.लि.
  8-10 मि.लि. – 60-70 मि.लि.
 15. छाटणीच्या वेळचे कमाल तापमान 20 अंश से.पेक्षा कमी होत असताना अधिक तीव्रतेचे द्रावण वापरावे.
 16. द्रावण लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करता येतो, त्यामध्ये हाताने द्रावण लावण्याची पद्धत (पेस्टिंग) सर्रास वापरली जाते. त्याचप्रमाणे काडीबुडवणी, फवारणी व ड्रॉपर पद्धतीने या द्रावणाचा वापर करणे शक्‍य असते.
 17. गरज असल्यास 20 पीपीएम जीएचा वापर करावा. जर पाकळ्यांची लांबी आधीच्या जीएच्या वापराने योग्य प्रकारे मिळाली असेल तर त्या वेळी जीए वापरू नये.
 18. नत्र युक्त खतांचा वापर करताना ती जमिनीत मिसळली जावीत,जेणेकरून ४ ते ६ दिवसात आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच आम्लयुक्त नत्र खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट ऑक्टोबर छाटणीनंतर द्यावेत.
 19. ऑक्‍टोबर छाटणीनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशके व्यवस्थित वापरली तर रोगाचा धोका कमी होतो.
 20. द्रावणाचा योग्य वापर होण्यासाठी ते काडीच्या डोळ्यांना व्यवस्थित लागणे आवश्‍यक असते. द्रावणात लाल रंग वापरून औषधाची लावणी चांगल्या प्रकारे होत असल्याची खात्री करता येते.

Related posts

Shares