Search

हरितगृहातील शेतीची संकल्पना भाग १

हरितगृहातील शेतीची संकल्पना भाग १

polyhouse

  • कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो.
  • हरितगृहांतील शेती हा अगदी अलीकडच्या काळातील अतिशय विशेषीकृत शेतीप्रकार आहे.
  • हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाइपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला जातो.
  • जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलशेतीसाठी हरितगृहांचा वापर मोठया प्रमाणात होतो.
  • व्यापारी तत्त्वावर हरितगृह प्रकल्प करताना खालील मुद्दे विचारात घ्यावेत. 
  • हरितगृहाचा प्रकार

हरितगृहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण कोणती पिके घेतो व आपल्या भागात किती पाऊस पडतो,यावर हरितगृहाचा प्रकार निश्‍चित करता येतो. जास्त पाऊस असलेल्या भागांमध्ये पॉलिहाऊस व कमी पावसाच्या ठिकाणी शेडहाऊस करणे सोईस्कर असते.

हरितगृहाचे अनियंत्रित, अंशत: नियंत्रित आणि पूर्ण नियंत्रित असेही तीन प्रकार आहेत.

gh const
ब) हरितगृहासाठी लागणारी जागा.
व्यापारी तत्त्वावर हरितगृहाचा प्रकल्प करताना कमीत कमी 10 गुंठे (1000 वर्गमीटर) जागा असली पाहिजे व जास्तीत जास्त एक एकर/ प्रति युनिट हरितगृह प्रकल्प असावा.
क) आर्द्रता –
हरितगृहाचा प्रकल्प करताना त्या भागातील आर्द्रता वर्षभर कशी आहे, याचा अभ्यास करावा. आपल्या भागातील आर्द्रतेनुसार हरितगृहाचे योग्य प्रकार व पिके घ्यावीत. उदा. कोकणामध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे कार्नेशन पिकामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते योग्यप्रकारे येत नाही. खर्चामध्ये वाढ होते. पर्यायाने ते पीक आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आपल्या प्रदेशातील वातावरणानुसार पिके घ्यावीत.

 

हरितगृहामध्ये घेतली जाणारी पिके : 
हरितगृहामध्ये खालील पिकांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते.
अ) फुलपिके : हरितगृहामध्ये प्रामुख्याने दांड्याच्या फुलांचे उत्पादन घेतले जातात. त्यात गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, लिलीनियम, शेवंती यांसारख्या फुलांचा समावेश असतो.
ब) भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळी इ.
क) पालेभाज्या : कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी इ.
ड) परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकेनि, लॅट्युस, लिक, पार्सेली इ.
इ) औषधी पिके : हळद, आले, चिवस, मीट, बसीगिल इ.
ई) फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज इ.

Cucumber.preview

 

images

हरीतगृह मल्चींग, शेडनेट, प्लास्टीक टनेल व सामुहीक तळे योजना

शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानामध्ये फलोत्पादन करणे शक्य व्हावे याकरिता प्लास्टीकचा वापर अत्यंत महत्वाचा आहे. बिगर हंगामी पिक घेणे, उच्च प्रतींच्या फुलांचे उत्पादन, उतीसंवर्धन रोपवाटीका, याकरीता हरीतगृहाची तर बाष्पीभवन टाळण्याकरीता व तणांची वाढ होवू नये म्हणून प्लास्टीक आच्छादनांचा वापर करणे गरजेचे आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पाणी मिळणेकरीता शेततळ्याचा व ठिबक सिंचनाचा फायदा होतो.

 

घटनिहाय अनुदान

अ.क्र घटकाचे नाव शेतकरी वर्ग अनुदान
हरीतगृह (उच्च तंत्रज्ञान)१००० चौ.मि. क्षेत्रमर्यादा अल्प व अत्यल्प भूधारक ५० टक्के कमाल रु. ३२५/ प्रती चौ.मि.
इतर ३३.३३ टक्के कमाल रु.२१५/ प्र.चौ.मि.
हरीतगृह (सर्वसाधारण)१००० चौ.मि. क्षेत्रमर्यादा अल्प व अत्यल्प भूधारक ५० टक्के कमाल रु. १२५/ प्रति चौ.मि.
इतर ३३.३३ टक्के कमालरु.८३/ प्र.चौ.मि.
शेडनेट (२.०० हे.क्षेत्रमर्यादा) सर्व ५० टक्के कमाल रु. ७/- प्रती चौ.मि.

 

हरितगृह लागवडीसाठी वाफ्याचे नियोजन

हरितगृहाची उभारणी केल्यानंतर लागवडीसाठी आवश्‍यक माध्यम (म्हणजेच माती, कोकोपीट किंवा अन्य सुधारित माध्यमे) याचा विचार करणे आवश्‍यक आहे. हरितगृहातील बहुतांश लागवड ही एक वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची असल्याने माती किंवा माध्यमाची निवड काळजीपूर्वक करावी. आजच्या लेखामध्ये माती या माध्यमाविषयी माहिती घेऊ.

माती ः योग्य सामू आणि विद्युतवाहकता या गुणधर्माबरोबरच निचरा होणारी माती लागवडीसाठी आवश्‍यक असते. हरितगृहामधील पिकांच्या लागवडीसाठी लाल मातीचा वापर करावा. लोहाची विविध ऑक्‍साईड्‌स असल्याने विशिष्ट असा लाल रंग मातीला प्राप्त होतो. या प्रकारची माती हलक्‍या सच्छिद्र, चुनाविरहित, कमी विद्राव्य क्षार व कमी सुपीकता असलेली असते. या जमिनीचा पी.एच. (सामू) 5.5 ते 6.5 असावा. क्षारता ही एकपेक्षा कमी असावी. हरितगृहामध्ये प्रस्तावित पिकाच्या वाफ्यांचा आकार, उंचीनुसार गरजेनुसार योग्य तितकी ब्रास माती टाकून घ्यावी. ती सर्वत्र समप्रमाणात पसरून घ्यावी. या मातीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक असते.

मातीचे निर्जंतुकीकरण :
जमिनीतील रोगकारक जीव, कीटक व तणांचा नाश करण्याची प्रक्रिया म्हणजेच निर्जंतुकीकरण होय. सूक्ष्मजीव हे काही भौतिक, रासायनिक अथवा आयर्न्सच्या स्वरूपातील घटकांचा वापर करून मारले अथवा दूर केले जातात.

या रासायनिक घटकांतील मिथिल ब्रोमाईडसारखे काही घटक हे सामान्य तापमानाला वायुरूप धारण करतात. तसेच ते अत्यंत विषारी असल्याने योग्य प्रशिक्षित आणि परवाना असलेल्या लोकांच्या साह्यानेच त्याचा वापर करावा लागतो. अर्थात त्याचा खर्च अधिक पडतो. आर्थिकदृष्ट्या आपल्या भागामध्ये फॉरमॅलिन या रसायनाचा वापर मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते.

 

gh bp

 

फॉर्मल्डेहाईड (फॉरमॅलिन) :
बाजारात फॉरमॅलिन नावाने मिळणारे द्रावण 37-40 टक्के फॉर्मल्डेहाईडयुक्त असते.

निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे फॉरमॅलिन पाण्यात 1:10 या प्रमाणात मिसळावे.

ड्रेचिंगसाठी 7.5 लि./फॉरमॅलिन 100 चौ. मीटरसाठी म्हणजेच पाच गुंठ्याच्या (500 चौ. मी.) पॉलिहाऊससाठी 37.5 लिटर फॉरमॉलिनची गरज असते.
– हे रसायन वापरण्याआधी माती ही वाफसा स्थितीत असावी.
– रसायन पहाटे किंवा सकाळी लवकर जमिनीवर टाकावे.
– रसायन टाकल्यानंतर उपलब्ध उष्णतेनुसार साधारणतः तीन ते सात दिवस त्यावर काळ्या रंगाचे पॉलिथिन पसरावे. त्यात निर्माण होणारा वायू बाहेर जाऊ नये, याकरिता मातीने पॉलिथिनच्या कडा किंवा बाजू व्यवस्थित गाडून घ्याव्यात.
-सात दिवसांनंतर पॉलिथिन काढून एक दिवस हरितगृहाच्या सर्व खिडक्‍या आणि दरवाजे उघडे ठेवून वायू बाहेर जाऊ द्यावा.
– भरपूर पाण्याने रसायन मातीतून धुऊन जाईल असे पाहावे.
– त्यानंतर वाफसा आल्यानंतर (ड्रेचिंगनंतर दोन आठवड्यांनी) वाफे बनविण्यास सुरवात करावी.

मातीचे वाफे तयार करणे :
फुलझाडे व भाज्या लागवडीसाठी शेडहाऊससाठी लाल माती, शेणखत, भाताचे तूस पुढील प्रमाणात वापरून माध्यम तयार करावे.
1) लाल माती – 70 टक्के
2) शेणखत (एफवायएम) – 20 टक्के
3) भाताचे तूस – 10 टक्के
या शिवाय अन्य सेंद्रिय पदार्थ. उदा. निंबोळी पेंड, बोनमील, खतांची पायाभूत मात्रा यासारख्या गोष्टी वाफे करताना घालाव्यात.

 वाफे तयार करण्याची पद्धत ः
अ) वाफ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम असावी.
ब) वाफे शेडहाऊस व पिकाप्रमाणे योग्य प्रकारे आखलेले असावेत.
क) मुख्य रस्त्यासाठी, विविध कामांसाठी पुरेशी जागा शेडहाऊसच्या आकाराप्रमाणे योग्य अशी ठेवावी.
ड) शेडहाऊसचे कॉलम्स शक्‍यतो वाफ्यांवर यावेत. चालण्याच्या पाथमध्ये येऊ नयेत.
इ) वाफे तयार केल्यावर त्यावरून चालू नये.
ई) दोन वाफ्यांत मशागतीची कामे करण्यासाठी पुरेसे रुंद रस्ते असावेत.
फ) पिकांच्या आवश्‍यकतेनुसार आधाराच्या रचना आधी बनवून मग वाफे करावेत. नंतर रचना करताना वाफे मोडले जातात.

 

Related posts

Shares