Search

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांची चिंता दूर, तर अनेक नद्यांना पूर…

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांची चिंता दूर, तर अनेक नद्यांना पूर…

पाऊस… ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो पाऊस अखेर आला आणि सगळ्यांना सुखद दिलासा देवून गेला.  मागील काही दिवसांपासून पाऊस कधी येणार? आला तर पुरेसा पाऊस होईल का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरीपातील पिके पावसामुळे जगातील कि पावसा अभावी करपतील कि काय? अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती.

“मान्सून” ला सुरुवात झाल्यापासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला होता. यामुळे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी काही प्रमाणात समाधानी होते. मात्र, असे असले तरी विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. या मूळे या भागातील शेतकरी धास्तावले होते. या सगळ्या समस्यांना आणि चिंतांना पूर्ण विराम देत दीड महिन्यांहून अधिक काळ दीड महिन्यांहून अधिक काळ दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर विदर्भ आणि मराठवाड्यावर कृपादृष्टी दाखवत जोरदार हजेरी लावली आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा परिणाम झाला आहे.  वरूण राजाच्या या दमदार हजेरीमुळे मराठवाड्यातील ७६ पैकी ७२ तालुक्यात पावसाचे आगमन झाले तर विदर्भातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या मराठवाडा आण‌ि मध्य महाराष्ट्राला पावसाने दिलासा दिला आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरी उस्मानाबाद, बीड, लातूरला मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे.  मात्र, विदर्भाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात झालेल्या या पावसाने सोयाबीन, तूर आणि इतर पिकांना तारले आहे. महत्वाचे म्हणजे या पावसामुळे विदर्भातील कपाशीला जीवदान मिळाले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. अकोला विभागाचा कृषीच्या दृष्टीकोनातून विचार करायचा इथे कडधान्य अधिक प्रमाणात पिकवले जाते. आता जो पाऊस पडला आहे त्याचा कडधान्य उत्पादनासाठी पोषक आहे.  याशिवाय,  पश्चिम महाराष्ट्रात मात्र तुरळक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह कोकणातही अधून मधून पावसाच्या सरी अधून मधून पडत आहे.

एकूणच, हि परिस्थिती पाहता योग्य वेळी आवश्यक तिथे दमदार हजेरी लावत पावसाने शेतकऱ्यांवर ओढवलेल दुबार पेरणीचे संकट दूर करत आपण तारणहार असल्याचे सिद्ध केले आहे असे म्हणता येईल.

Related posts

Shares