Search

संकरीत भात लागवड – भाग २

संकरीत भात लागवड – भाग २

buttons eng-minमहाराष्ट्रात मान्सून ने हजेरी लावल्याने सगळे सुखावले आहेत. बळीराजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पावसाचे आगमन झाल्याने सगळ्या शेती कामांना आता वेग आला आहे. भात लागवड हि जोमात सुरु होईल. संकरीत भात लागवड भाग २ मध्येसंकरीत भात लागवड कशी करावी‘? हे जाणून घेऊया.

बीज प्रक्रिया :

पेरणीसाठी उत्तम प्रतीचे आणि चांगला रुजावा असलेले बी वापरावे. तीन टक्के मिठाच्या द्रावणात बियाणे बुडवून द्रावणावर तरंगणारे बी काढून टाकावे. तळाशी राहिलेले जड बी स्वच्छ पाण्याने दोनदा किंवा तीनदा धुवावे आणि सावलीत २४ तास वळवावे. नंतर १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात थायरम चोळावे.

बियाणे : एक हेक्टर संकरीत भात बीजोत्पादनासाठी, मादी वाणाचे १५ किलो आणि नर वाणाचे ५ किलो बियाणे वापरावे.

पेरणी : नर वाण हा मादी वाणापेक्षा ८ ते १० दिवस उशिरा फुलोऱ्यावर येत असल्याने, नर वाणाची पेरणी मादी वाणाच्या अगोदर ८ दिवस करावी. परंतु मादी फुलोरा १० ते १२ दिवस उपलब्ध असल्यामुळे तेवढे दिवस नर वाणाचे परागकण मिळणे आवश्यक असते, यासाठी नर व मादी वाणाची पेरणी पुढीलप्रमाणे करणे गरजेचे आहे.

पेरणीची वेळ

वाण

बियाणे(कि.) / प्रती हेक्टर

पहिला दिवस

नर वाण

1.5

सहावा दिवस

नर वाण

2

अकरावा दिवस

नर वाण

1.5

अठरावा दिवस

मादी वाण

15

लावणी : मादी वाणाचे रोप २५ दिवसांचे अथवा ५ ते ६ पानावर असताना लावणीसाठी योग्य समजावे. रोपे उपटण्यापूर्वी २ दिवस रोपवाटीकेला पाणी दिल्यास रोपे उपटणे सोपे जाते. लावणी करतेवेळी ६ मादी वाणाच्या व २ नर वाणाच्या ओळी आलटून पालटून लागवड करावी. मादी वाणाच्या दोन ओळींमध्ये ३० सें.मी. व नर वाणाच्या दोन ओळींमध्ये ३० सें.मी. ठेवावे. लावणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करावी.

खत व्यवस्थापन : लावणीपूर्वी ३ आठवडे प्रती हेक्टरी १० टन याप्रमाणे लावणी प्रक्षेत्रास गिरिपुष्प हिरवळीचे खत द्यावे. तसेच प्रती हेक्टरी १०० कि. नत्र, ५० कि. स्फुरद व ५० कि. पालाश शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा तीन वेळा विभागून देण्यात यावी. पन्नास किलो नत्र आणि स्फुरद आणि पालाशाचा संपूर्ण हप्ता चिखलणीच्या वेळी द्यावा. तर २५ किलो नत्राची दुसरी मात्रा लावणीनंतर २५ ते ३० दिवसांनी म्हणजेच रोपांना फुटवे येण्याच्या वेळी द्यावी. शिल्लक राहिलेला २५ किलो नत्राचा तिसरा हप्ता पीक फ़ुओर्यत येण्याच्या वेळी द्यावा. गिरीपुष्पाचा पाला उपलब्ध नसल्यास हेक्टरी ५० किलो जास्त नत्र द्यावे.

पाणी व्यवस्थापन : लावणीनंतर सुरुवातीच्या ३० दिवसांमध्ये २ ते ३ सें.मी. उंची इतके पाणी शेतामध्ये ठेवावे. त्यानंतर पिकातील दाणा पक्व होईपर्यंत पाण्याची पातळी ५ सें.मी. ठेवावी. वारंवार पाणीपुरवठा व निचऱ्याची सोय करावी. कापणीपूर्वी १० दिवस शेतातील संपूर्ण पाणी काढून टाकावे.

आंतरमशागत : लावणीनंतर १५ दिवसांनी शेतातील तण काढून टाकावे. तणाच्या तीव्रतेनुसार दर १५ दिवसांनी शेताची बेणणी करावी.

 

Related posts

Shares