Search

“आजीचा बटवा” म्हणजे काय? – बहुगुणकारी औषधी वनस्पती…

“आजीचा बटवा” म्हणजे काय? – बहुगुणकारी औषधी वनस्पती…
[Total: 10    Average: 3.5/5]

“आजीचा बटवा” म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर कदाचित आपल्यापैकी काही जणांना नक्की माहिती असेल. मात्र, आपलाल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल. कारण, सध्या आपण नैसर्गिक धन संपदेपासून दूर जाऊ लागलो आहोत. मानव जातीसाठी निसर्गाने अनेक वरदाने दिली आहेत. त्यात औषधी वनस्पतीचाहि समावेश आहे. निसर्गाने येथील मानवाला उपलब्ध करून दिलेला वनौषधी खजिना म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. निसर्गाने ज्या औषधी वनस्पती निर्माण केल्या आहेत त्या आजूबाजूला, जंगलात आणि परिसरात असतात. फक्त अपल्याला त्याची ओळख नाही. अशा वनस्पती ओळखता आल्या, त्यांच्या गुणधर्मांची माहिती झाली तर विविध व्याधीवर त्याचा उपयोग होऊ शकतो. रोग निदान खरे असेल आणि त्यावर योग्य वनस्पती औषधाचा उपाय केला तर शीघ्र लाभ दिसून येतो. ताज्या वनस्पतीचा फार लवकर फायदा होतो. म्हणूनच सामान्य जनतेला वन औषधींचे गुण व उपयोग याची माहिती होणे अत्यंत आवश्यक आहे.

पुरातन काळापासून पाहायला गेलं तर भारतात आयुर्वेद या उपचार पद्धतीचा प्रसार झाला होता याचे दाखले मिळतात. संपूर्ण भारताचा विचार केल्यास साधारणत: औषधी वनस्पतींच्या २,००० जाती आढळतात. भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशात औषधी वनस्पतींमध्येहि विविधता आढळते. निरनिराळ्या वनस्पतींचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) क्षेत्रही भिन्न आहे. त्यांपैकी बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीलाही यशस्वीपणे तोंड देण्याची क्षमता असल्यामुळे “जिराईत पीक”ut म्हणून त्यांची लागवड करणे शक्य आहे.  औषधी वनस्पतींची नियोजन करून मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यास ग्रामीण जनतेला नवीन व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल आणि निर्यातीच्याद्वारे परकीय  चलन  मिळवणे शक्य होईल.

भारतात वन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन वन विभागाची निर्मिती करण्यात आली. वन विभागातर्फे विविध वनस्पतींचे जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. या अंतर्गत हरडा, बेहडा, आवळा, वावडिंग, धावडा, अर्जुन, वाकेरी या वनस्पती जमा केल्या जातात. या सगळ्या वनस्पती दरसाल उत्पन्न देणाऱ्या वनस्पती आहेत.

औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी करण्यात येणारे प्रयोग

 

  • औषधी वनस्पतींच्या जीवनक्रम वेगवेगळा असतो.jii90 हे लक्षात घेऊन औषधी वनस्पतींचा जीवनक्रम व लागवडीसंबंधी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे.

 

  • भारतात आजही सरणासाठी काही प्रमाणात वृक्ष तोड होते. हे लक्षात घेता डिकेमाली, टेटू, पळस, सातवीण, बिब्बा, बेल, शिवण, वायवर्णा, साबर, हिरडा, बेहडा, जीतसई (जितसाया), गोरखचिंच इ. झाडांचे संवर्धन होऊन त्यांची जळणासाठी लाकूड म्हणून तोड होणार नाही ह्याची खबरदारी घेतली जात आहे.

 

  • काही औषधी वनस्पती अल्पावधीत उत्पन्न देतात. यामध्ये, शतावरी, इसबगोल, रिंगणी, ज्येष्ठमध, आंबेहळद, पिठवण, सोनामुखी, कोरफड यांचा समावेश आहे. या वनस्पतींबाबत बरीच माहिती गोळा करण्यात आली असून त्यासंबंधी प्रयोग होत आहेत.

 

  • औषधी वनस्पतींचे हे महत्त्व जाणून इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर) या संस्थेची निर्मिती करण्यात आली. या संस्थेतर्फे आठ प्रमुख पिकांवर [अफू, इसबगोल, सोनामुखी, सर्पगंधा, कीटक्षोद (पायरेथ्रम), ज्येष्ठमध, डिजिटॅलीस व सदाफुली] देशातील निरनिराळ्या भागांत संशोधन हाती घेण्यात आले आहे.

 

  • या व्यतिरिक्त कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च व इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च यांच्या निरनिराळ्या प्रयोगशाळा, तसेच विविध संशोधन संस्थांमध्ये औषधी वनस्पतीं संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे.

 

Related posts

Shares