Search

फणसापासून बनवा प्रक्रियायुक्त रुचकर पदार्थ

फणसापासून बनवा प्रक्रियायुक्त रुचकर पदार्थ

 

Jackfruitआपल्या नेहमीच्या जीवनात आपण काही परवलीचे शब्द किंवा वाक्याप्रचारांचा वापर करत असतो. तो अमुक एक माणूस आहे ना अगदी फणसासारखा आहे. याचा मतितार्थ काय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला फणसाचे गुणधर्म जाणून घ्यावे लागतील. फणस हा वर दिसायला काटेरी असला तरी फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात.

त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टतर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो.jackfruit-03

काही ठिकाणी फणसाच्या बियासुद्धा खाद्य म्हणून वापरतात. बियांमध्ये कर्बोदकांचे / पिष्टमय पदार्थांचे प्रमाण मुबलक आहे. बी खाण्यासाठी वापरताना भाजून किंवा उकडून खाण्यासाठी वापरतात.

बिया ओल्या असताना त्याची चिरून भाजी करतात. तर, पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टंर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात.

कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. अशा प्रकारच्या फणसापासून लोणचेदेखील चांगले होते. फणसाच्या लाकडाचा उपयोग इमारतीसाठी वापरला जातो. फणसाचे गरे व बिया सोडून राहिलेला भाग जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो.

आरोग्यास उपयोगी फणस :

 1. फणस रुचकर, मधुर व गोड असतो. फणस खाण्याने तृप्ती होते.
 2. फणस शुक्रधातू वाढविण्यास मदत करतो.
 3. ताकद वाढविण्यास हितकारक.
 4. वजन वाढविण्यास मदत करतो.
 5. रक्तपित्त रोगावर हितकारक.
 6. फणस गराचे अतिप्रमाणात सेवन केल्याने छाती-पोटात दाह होऊ शकतो.

 

 

फणसाचे पदार्थ

1. फणस पोळी –

fanas poli

 1.  पोळी तयार करण्यासाठी गऱ्यांमधील बिया काढाव्यात.
 2. गऱ्यांतील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण साखर टाकून 23 ते 25 अंश ब्रिक्सा करावे.
 3. मिक्स रमध्ये गरे व साखर एकजीव करून घ्यावे.
 4. एकजीव केलेले मिश्रण, तुपाचा हात लावलेल्या पसरट स्टीलच्या ताटात पातळ पसरावे.
 5. उन्हामध्ये वाळविण्यास किंवा वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 अंश तापमानास वाळवावे.
 6. गराचा एक थर वाळल्यानंतर दुसरा थर द्यावा.
 7. असे थरावर थर देऊन जाडी 5 सें.मी. झाली की बटर किंवा ऍल्युमिनिअम फॉईलच्या पेपरमध्ये गुंडाळून रुंद तोंडाच्या बरणीत भरून साठवितात.

कच्च्या फणसाचे पदार्थ

२. वेफर्स

jackfruit_chips

 1. पूर्ण परिपक्व झालेले, परंतु कच्चे फणस निवडून धारदार सुरीच्या साह्याने कापून गरे काढावेत.
 2. सुरी किंवा विळीच्या साह्याने गऱ्याचे तीन ते चार मि.मी. रुंदीचे तुकडे बिया बाजूला करून करावेत.
 3. तेल कढईमध्ये घेऊन गरम करण्यास ठेवावे. तेल व्यवस्थित गरम झाल्याची खात्री झाल्यानंतर गरे व्यवस्थित तळून घ्यावेत.
 4. असे तळून काढलेले गरे जाळीवर काही काळ ठेवावेत, जेणेकरून अतिरिक्त तेल पाझरून निघून जाईल.
 5. यानंतर चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार मसाले मिसळावेत. अशाप्रकारे आपण खमंग आणि चविष्ट वेफर्स तयार करू शकतो. हा शेतकऱ्यांसाठी एक जोड उद्योग ठरू शकेल.

 

 

. फणसाचा चिवडा

jackfruit snacks

 1. फळाच्या गऱ्यांपासून उत्तम प्रतीचा चिवडा तयार करता येतो. यासाठी काप्या फणसाचा वापर केला जातो.
 2. प्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढले जातात. गऱ्यांपासून धारदार सुरीच्या साह्याने बिया वेगळ्या करून चार मि.मी. जाडीचे तुकडे/काप केले जातात.
 3. या कापांना/तुकड्यांना एक वाफ दिली जाते किंवा उकळत्या पाण्यात दोन-तीन मिनिटे धरले जाते.
 4. जास्तीचे पाणी निथळून देऊन तुकडे तळले जातात. तळत असताना त्यावर 5 टक्के मिठाचे संपृक्त द्रावण शिंपडावे.
 5. तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला चोळावा.

स्त्रोत: अग्रोवन

Related posts

Shares