Search

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम

एक सकारात्मक पाऊल : घडविला कृष्णा – गोदावरीचा संगम

एके ठिकाणी संपुर्ण शेती पुराखाली वाहुन गेली तर एकीकडे पिण्यासाठीही पाणी नाही अशी अवस्था देशभ रात झाली असतानाच, त्यावर मात करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पडले आहे.
आंध्रप्रदेशातील गोदावरी आणि कृष्णा या दोन महत्वाच्या नद्यांना जोडण्यात आले. या नदीजोडमुळे गोदावरीतील 80 टीएमसी  कालव्यातून कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी इब्राहिमपटणम येथे पूजा करून या उपक्रमाचा प्रारंभ केला. पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातून येणारा गोदावरी नदीचा प्रवाह येथे कृष्णानदीला जोडण्यात आला आहे.

या ऐतिहासिक टप्प्यामुळे कृष्णा नदीपात्रानजिकच्या प्रदेशात असलेली पाण्याची टंचाई दूर होणार आहे. तसेच गुंटूर जिल्ह्यातली पाणी टंचाईही दूर होणार आहे. गोदावरी नदीच्या पूराचे 3 हजार टिएमसी पाणी दरवर्षी बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. एकप्रकारे हे पाणी वायाच जाते. आता ते वाया न जाता आवर्षण असलेल्या भागातील सिंचनासाठी उपयोगी येऊ शकेल.
विख्यात अभियंते आणि माजी केंद्रीय मंत्री के.एल राव यांनी कित्येक दशकांपूर्वी मांडलेल्या संकल्पनेतून हा नदी जोड साकारण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी यावेळी सांगितले.

भविष्यात यामुळे जवळपास १७ लाख एकर जमिनीचे सिंचन होणार आहे. तसेच कृष्णा, कुर्नुल, कडप्पा, गुंटूर, अनंतपूर, चित्तूर आणि प्रकाशम या जिल्ह्यातील शेतकऱयांनाही याचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचे मोठे यश मानले जात आहे. या पुढेही देशभरातील एकूण ३० नद्यांना एकमेकांसोबत जोडण्याचा सरकारचा मानस आहे.

 

फोटो कर्टसी : www.ndtv.com

Related posts

Shares