Search

नाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी

नाशिक चे विशाल विजय वाघले ठरले देस्ता स्मार्ट शेतकरी
[Total: 1    Average: 2/5]

शेतकरी प्रगल्भ व्हावा त्याने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करावे यासाठी देस्ता नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा यासाठी देस्ता नेहमीच विविध कृषी प्रदर्शनांना भेट देत असते. नुकतेच नाशिक येथे ‘कृषीथॉन – २०१५’ संपन्न झाले. या प्रदर्शनात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने देस्ता तर्फे एक स्टॉल घेण्यात आला होता.

शेतकऱ्यांनी इंटरनेट चा वापर करावा आणि कॉम्पुटर किंवा स्मार्ट फोन च्या मदतीने शेती संदर्भातील आवश्यक माहिती मिळवावी आणि आपल्या शेतीला एक वेगळा आयाम द्यावा हा आमचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या कौतुकास पात्र ठरला. पाच दिवसाच्या या प्रदर्शनात देस्ता च्या स्टॉल वर होणारी शेतकऱ्यांची गर्दी दिवसागणिक वाढतच गेली. सकाळ पासून संध्याकाळी प्रदर्शन संपेपर्यंत देस्ता च्या स्टॉल भोवती असलेली शेतकऱ्यांची गर्दी अधिक बोलती होती.

शेतकरी येत होते कुपन्स भरून देत होते, देस्ता च्या टीम बरोबर संवाद साधत होते. यामुळे आमचा उत्साह अधिक वाढत होता. कृषीथॉन दरम्यान देस्ता टॉक शी किती शेतकरी संलग्न होतील याचे आम्ही कयास बांधत होतो. प्रदर्शन संपल्यानंतर जेव्हा देस्ता टीम च्या उत्साहात अधिक भर पडली कारण थोडे थोडके नाही तर चक्क साडे आठ हजार पेक्षा अधिक शेतकरी देस्ता टॉक बरोबर संलग्न झाले.

शेतकऱ्यांकडून माहिती घेतानाचा आम्ही त्यांना पहिले बक्षीस मोबाईल फोन असल्याचे सांगितले होते, लक्की ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड होणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे देस्ता टीम कडून विजेत्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु झाली. सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता होती. कृषीथॉन लक्की ड्रॉ निकाल खालीलप्रमाणे आहेत.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (स्मार्ट फोन) – विजेते – विशाल विजय वाघले (नाशिक)

द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक ( मनगटी घड्याळ) विजेते – केशव बन्सु पालवी (नाशिक)

तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ( मनगटी घड्याळ) – विजेते – राहुल पाटील (धुळे)

या स्पर्धेतील सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन आणि देस्ता बरोबर संलग्न झालेल्या सगळ्या शेतकरी मित्रांचे आभार.

याआधी बारामतीमधील कृषक या शेती प्रदर्शनात भाग घेऊन देस्ता ने थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रदर्शनादरम्यान साधारणपणे ५००० शेतकरी देस्ता टॉक बरोबर संलग्न झाले होते.

जर, आपल्यालाही देस्ता टॉक बरोबर संलग्न व्हायचे असेल तर आपण www.destatalk.com या साईट ला भेट देऊन सबस्क्रिप्शन फॉर्म भरा.

अधिक माहिती साठी संपर्क – ७७७५००११८८

 

Related posts

Shares