Search

परभणी चे दिलीप नारायणराव शहाणे झाले देस्ता स्मार्ट शेतकरी

परभणी चे दिलीप नारायणराव शहाणे झाले देस्ता स्मार्ट शेतकरी
[Total: 3    Average: 3/5]

शेतकरी प्रगल्भ व्हावा यासाठी देस्ता नेहमीच विविध उपक्रम राबवीत असते. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता यावा त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी यासाठी देस्ता विविध कृषी प्रदर्शनांमध्ये भाग घेत असते. नुकतेच बारामती इथे “कृषक” हे शेतीविषयक महत्वपूर्ण प्रदर्शन संपन्न झाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी देस्ताटॉक च्या वतीने या प्रदर्शनात मोठ्या उत्साहात भाग घेण्यात आला होता. आणि या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिला तो पाहून देस्ता चा उत्साह द्विगुणीत झाला.

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या देस्ता ने देस्ताटॉक या वेबसाईट ला सुरुवात केली. आणि अवघ्या सहा महिन्यात आमची वेबसाईट शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरून यशस्वी घोडदौड करत आहे. शेतीविषयक माहिती या  वेबसाईट च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सोप्या शब्दात पोहोचविली जाते. एकूणच काय कृषी विषयक कोणत्याही समस्येवर तोडगा हवा असेल तर देस्ताटॉक असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.

स्मार्ट फोन च्या माध्यमातून शेतकरी या वेबसाईट वरील माहिती वाचू शकतात. हि कृषिविषयक माहिती शेतकऱ्यांच्या हाती स्मार्ट फोन च्या माध्यमातून जावी हा देस्ताचा प्रयत्न. या प्रयत्नाला मूर्त रूप मिळावे यासाठी देस्ता ने कृषक मध्ये एक वेगळी शक्कल लढविली. इथे आम्ही शेतकऱ्यांसाठी लक्की ड्रॉ चा नाविन्यपूर्ण पर्याय ठेवला. यातील प्रथम विजेत्याला स्मार्ट फोन चे बक्षीस ठेवण्यात आले होते तर दोन उपविजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.

आम्हाला सांगण्यास आनंद होतो कि या आमच्या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आणि साधारण ५ हजार शेतकऱ्यांनी आमच्याशी संवाद साधला. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आम्ही या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांची निवड केली. देस्ता चे सी. ई. ओ श्री. मोहनीश शर्मा यांच्या हस्ते विजेत्याची निवड करण्यात आली. नावाची घोषणा झाली आणि देस्ता च्या मुख्यालयात टाळ्यांचा गडगडाट झाला.

विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

प्रथम पारितोषिक – स्मार्ट फोन

विजेता – दिलीप नारायणराव शहाणे – दुधगाव – परभणी

द्वितीय पारितोषिक –  सौर कंदील

विजेता – सुनील अनंता माने – माळशिरस – सोलापूर

तृतीय पारितोषिक – सौर दिवा

विजेता – सागर लक्ष्मण नाळे – फलटण – सातारा

आपल्यालाही जर देस्ता परिवाराचे सदस्य व्हायचे असेल तर तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधा आमचं फेस बुक पेज वर किंवा व्हॉट्सअॅप करा – ८६५५४४०३३०

Related posts

Shares