हवामान

हवामान
[Total: 8    Average: 2.3/5]

ये रे ये रे पावसा…तुला देतो पैसा… एवढ बोलल्यावर हि पाऊस काही येत नाही. आकाशात पावसाच्या ढगांची कमतरता असताना मनात मात्र विचारांच्या ढगांचा गडगडाट सुरु आहे. यंदा मान्सून योग्य प्रमाणात झालेला नाही यामुळे बळीराजा धास्तावला आहे. पावसाने पाठ फिरवली असती तरी प्रशासनाने निसर्गाला आव्हान देत पाऊस पाडण्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या आहेत. हि त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.

पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला असला तरी कोंकण आणि किनारपट्टी भागात पावसाची ये जा सुरु आहे. पावसाची हि फसवा फसवी दिवसागणिक अधिक बिकट होत चालली आहे. मात्र, निसर्ग कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. असेच काहीसे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा प्रभाव होणार असून यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज स्काय मेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.

याबरोबरच पुणे वेधशाळेने आपले दैनदिन हवामान वृत्त जारी केलं आहे. यानुसार हवामानाचा अंदाज खाली प्रमाणे आहे.

२७ ऑगस्ट: कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी,विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचीशक्यता.*

२८ ऑगस्ट: कोकण-गोवा, मराठवाडा  व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*

२९ ऑगस्ट: मराठवाडा  व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण-गोवा व उत्तर मध्य-महाराष्ट्रात बऱ्याच  ठिकाणी तर दक्षिण मध्य-महाराष्ट्रात

काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*

२९ ऑगस्ट: कोकण-गोवा, उत्तर मध्य-महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस

पडण्याची  शक्यता.*

इशारा :

२७ ऑगस्ट: कोकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.*

२८-२९ ऑगस्ट: मराठवाडा व विदर्भात तुरळक  ठिकाणी  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.*

३० ऑगस्ट: उत्तर मध्य-महाराष्ट्र व विदर्भात तुरळक  ठिकाणी  मसुळधार पाऊस पडण्याची शक्यता.*

पुणे आणि  आसपासच्या परीसरासाठीचा  हवामानाचा अंदाज:

२७ ऑगस्ट: पावसाच्या एक/दोन सरी पडण्याची  शक्यता.* कमाल व किमान  तापमान अनुक्रमे २९° व २२° से. च्या आसपास राहील.

२८ ऑगस्ट: पावसाच्या एक/दोन सरी पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे २९° व २३° से. च्या आसपास राहील.

२९ ऑगस्ट: पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे २९° व २२° से. च्या आसपास राहील.

३० ऑगस्ट: पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे २८° व २२° से. च्या आसपास राहील.

३१ ऑगस्ट: पावसाच्या काही सरी पडण्याची  शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे २८° व २१° से. च्या आसपास राहील.

१ सप्टेंबर: पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे २८° व २१° से. च्या आसपास राहील.

शक्यतेची टक्के वारी= * = ५१ ते ७५ टक्के / ** = २६ ते ५० टक्के, /*** = < २५ टक्के

संदर्भ –  पुणे वेधशाळा

स्काय – मेट

Related posts

Shares