Search

मोबाईल च्या मदतीने फुलवली द्राक्ष बाग

मोबाईल च्या मदतीने फुलवली द्राक्ष बाग
[Total: 31    Average: 2.8/5]

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी प्रगल्भ व्हावे याकरिता देस्ता टॉक तर्फे वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. माहितीच्या या युगात शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी www.destatalk.com या वेब साईट ची सुरुवात करण्यात आली. सोशल मिडिया किंवा इंटरनेट चा योग्य वापर किती फायद्याचा ठरू शकतो हे जाणून घेणे रंजक ठरेल.
सध्या तरुणांचा सर्वाधिक वेळ ‘सोशल मिडिया’ च्या वापरामध्ये जात असल्याची ओरड सुरु आहे. मात्र, त्याच ‘सोशल मिडिया’ चा योग्य वापर करून निफाड तालुक्यातील ज्ञानेश्वर बोरस्ते या तरुणानी द्राक्ष शेतीमध्ये लौकिक मिळवला आहे.
उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक शेतीचे द्राक्ष बागेत रूपांतर केले. उत्तम गुणवत्ता आणि चमकदार द्राक्षाचे एकरी २५ टनापर्यंत विक्रमी उत्पादन घेऊन रशिया, युके आणि नेदरलँडपर्यंत पोहोचवले. शेतीपासून दूर जाणाऱ्या तरुणासाठी ज्ञानेश्वरचे शेतीमधले ‘करिअर’ प्रेरणादायी ठरले आहे. द्राक्षाच्या उत्पादनासाठी काही अडचण आल्यास फेसबुक वर अडचण टाकून त्याने सल्ले घेतले. ज्याला इंटरनेट च्या जगात क्राउड सोर्सिंग म्हटले जाते.
नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्तम दर्जाचे उत्पादन घेतल्यानंतर बाजारात योग्य किंमत मिळत नसल्याने शतकरी शेतीपासून दूर जात आहे. वडिलोपार्जित कितीही शेती असली तरीही शेतकऱ्यांची मुले नोकरीलाच पहिली पसंती देतात. मात्र, निफाड तालुक्यातील साकोरेच्या ज्ञानेश्वर बोरस्ते या ३० वर्षाच्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्धार केला. वडिलोपार्जित ६ एकर शेतीमध्ये द्राक्ष शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शेतीला आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी खर्चात उत्तम शेती करण्याचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून तंत्र आत्मसात केले. पाण्याच्या कमी वापरासाठी शास्त्रोक्त ठिबक पद्धती शेतीमध्ये अंमलात आणली. जमीन कसदार राहावी यासाठी सेंद्रिय आणि गांडूळ खताबरोबर शेन खताचा अवलंब केला.
फुलोरा, द्राक्ष वाढीच्या काळामध्ये बुरशी आणि अळी नियंत्रणासाठी योग्य औषधांचा वापर केला. द्राक्षांच्या आकारापेक्षा गुणवत्ता आणि चमककडे विशेष लक्ष दिल्याने परदेशामध्ये द्राक्षाला मागणी झाली. मागील २ वर्षामध्ये एकरी २५ टनापर्यंत विक्रमी द्राक्ष उत्पादन घेऊन चीनमधील शेतकऱ्यांनाही अचंबित केले आहे.
मोबाईल बनला मार्गदर्शक
पदवीचे शिक्षण घेऊन शेतीमध्ये उतरल्यानंतर सुरुवातीला कृषी तज्ञ आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. मात्र, वारंवार कृषी तज्ञांकडे न जाता ज्ञानेश्वरनी आपल्या मोबाईल ला कृषी तज्ञ केले. हवामानातील बदल, बदलानुसार द्राक्ष शेतीमध्ये करावयाची कामे, द्राक्ष बाग वाढ होत असताना घ्यावयाची काळजी आणि द्राक्ष बाजारातील स्थिती मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून घेत राहतो. फेसबुक, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून जिभेला साखरेसारखा गोडवा देणारे द्राक्ष नातेवाईक, मित्र आणि बाजारापारांत पोहोचवले.
परदेशातील मागणीनुसार निर्यात कशी करायची याची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून घेतली. शेतीमधले तंत्र आत्मसात केल्याने कमी खर्चात मी शेती केली. माझी द्राक्ष शेती पाहण्यासाठी चीनमधील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेट देऊन गेले. यानंतर वाढते उत्पादन आणि त्याची गुणवत्ता लक्षात घेता रशिया, युके आणि नेदरलेंड मध्ये द्राक्षाची निर्यात केली.
इंटरनेट वर विविध विषयाची माहिती उपलब्ध आहे. शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती पाहणे आणि त्याचे आकलन करून अवलंब करणे यावर शेतकऱ्यांनी भर देणे गरजेचे आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. एकूणच पाहता नवीन तंत्रज्ञान वरदान ठरू शकते. यामुळेच, शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
संदर्भ – महाराष्ट्र टाईम्स

Related posts

Shares