Search

वादळाच्या तडाख्यातून पाऊसा ची सुटका होउदे… पुन्हा एकदा वरुणराजा बरसुदे …

वादळाच्या तडाख्यातून पाऊसा ची सुटका होउदे…  पुन्हा एकदा वरुणराजा बरसुदे …

वरुण राजाने दमदार हजेरी लावून बळीराजाच्या मनात आशेची पालवी फुलविली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वरुण राजा काहीसा रुसला आहे. यामुळे, पेरणी करून झाल्यानंतर आता शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. प्रशांत महासागरातील  उष्णकटबंधीय वादळांचा फटका आपल्या मान्सूनलाही दरवर्षी बसतो. यंदा मात्र हे संकट अधिक बिकट होईल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारणीभूत ठरली आहेत वादळे. एक दोन नाही तर तब्बल तीन वादळे…

भारता शेजारच्या चीनला चान-होम ( Chan-hom) वादळानं झोडपून काढलं आहे. या वादळामुळे जवळपास साडेपाच हजार कोटींची नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर तिकडे जपानच्या किनाऱ्यावर ‘नांग्का’ (Nangka) वादळ घोंघावत आहे. आज रात्रीपासून पुढचा आठवडाभर ‘नांग्का’ तिथे धुमाकूळ घालू शकतं. हे कमी म्हणून की काय, त्यापाठोपाठ आता ‘हलोला’ वादळंही येत आहे. ‘हलोला’ वादळाच्या रुपाने महाराष्ट्रातील पावसाच्या वाटेत नवं संकट उभं आहे की काय अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

शेतकरी मित्रांनो यामुळे आपण धास्तावून जाऊ नका. कारण, या वादळांमुळे मान्सून वर परिणाम होणार असला तरी तो अल्प काळासाठी असणार आहे. परिणामी पाऊस दहा दिवस लांबणीवर पडणार आहे. निसर्ग कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे वादळाच्या तडाख्यातून पाऊसा ची सुटका होउदे आणि पुन्हा एकदा वरुणराजा बरसुदे अशी मनोमन प्रार्थना करूया.

Photo Source : Rainbowed Satellite image from Chan-hom

Source : Skymate weather

Related posts

Shares