Search

मान्सून ची पुन्हा दमदार सुरुवात… पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता…

मान्सून ची पुन्हा दमदार सुरुवात… पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता…

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस कधी येणार या चिंतेने सगळे धास्तावले होते. मात्र अखेर वरुण राजाने बरसत सगळ्यांना चिंतामुक्त केले आहे. सध्या नैऋत्य मान्सून कर्नाटकच्या किनारपट्टीसह उर्वरित पश्चिमी किनारपट्टीला एकदम जोमाने कार्यान्वित झाला आहे.

सध्या पश्चिमी किनारपट्टीला मान्सूनच्या लाटेची तीव्रता कोकण आणि गोव्यापासून थेट कर्नाटक ते केरळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे. यामुळेच, मुंबईसह कोकणामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्याच सामाधान्कारी चित्र पाहायला मिळते आहे. येत्या काही दिवसात किनारपट्टीजवळील कमी दाबाच्या क्षेत्रचा प्रभाव वाढणार आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक केरळात पावसाची तीव्रता वाढणार आहे. तसेच येत्या २४ तासात मुंबईतही चांगलाच पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. एकूणच पाहायला गेले तर येत्या दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. बळीराजासाठी हि गोष्ट खरोखरच आनंदाची आहे.

कर्नाटकच्या किनारपट्टीला पावसाची कमतरता २५ टक्के असून केरळची २६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पश्चिमी किनारपट्टीला होणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या पावसामुळे त्या भागातील पावसाचा तुटवडा भरून निघेल. जूनच्या अखेरीस कर्नाटकाच्या किनारपट्टीला आणि केरळ येथे पावसाची तुट अनुक्रमे १८ % आणि १३ % होती. तसेच जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाच्या कमतरतेमुळे या टक्केवारीत वाढ झाली होती.

सर्वसामान्यतः जुलै आणि ऑगस्ट महिने पश्चिमी किनारपट्टीसाठी भरपूर पावसाचे असतात. सुरुवातीलाच दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी किनारपट्टीजवळ असेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढलेली असल्याने तेथे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच पुणे वेध शाळेच्या  दैनदंदन हवामान वृत्तातही २१ जुलै ते २४ जुलै पर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

weather

पुढील हवामानाचा अंदाज:

  • २० जुलै: कोकण-गोव्यात बहुताांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात  काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*
  • २१ जुलै: कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*
  • २२ जुलै: कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात  काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*
  • २३ जुलै: कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*
  • २४ जुलै: कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र,मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.*

इशारा:

  • २० जुलै: कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्य-महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.*
  • २१ जुलै: कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.*
  • २२ – २३ जुलै: कोकण-गोव्यात तुरळक  ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.*

या सगळ्या शक्यता जर प्रत्यक्षात उतरल्या तर शेतकऱ्यांना  मिळेल.

शक्यतेची टक्के वारी= * = ५१ ते ७५ टक्के / ** = २६ ते ५० टक्के, /*** = < २५ टक्के.

Related posts

Shares