Search

कोंकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता… पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरी बरसणार

कोंकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता… पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या सरी बरसणार

पाऊस नेमका कुठे दडून बसला आहे ? हा प्रश्न सध्या चर्चेचा आणि बऱ्याच अंशी चिंतेचा विषय बनत चालला आहे. पण, समाधानाची बाब म्हणजे दडी मारून बसलेला पाऊस लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. लवकरच पाऊस  काही प्रमाणात बरसेल अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

येत्या रविवारपर्यंत हवामानाचा अंदाज:

१६ जुलै: कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता.*

१७ जुलै: कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता.*

१८-१९ जुलै :  कोकण-गोव्यात बहुताांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी  पाऊस पडण्याची शक्यता.*

इशारा: १८ व १९ जुलै कोकण-गोव्यात तुरळक दठकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.*

पुणे आणि आसपासच्या पररसरासाठी हवामानाचा अंदाज:

१६ जुलै: काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३०° व २२° से.च्या आसपास राहील.

१७ जुलै: पावसाच्या एक / दोन सरी पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनक्रुमे २९° व २३° से.च्या आसपास राहील.

१८ जुलै: पावसाच्या एक / दोन सरी पडण्याची शक्यता.* कमाल व किमान तापमान अनुक्रमे २८° व २३° से. च्या आसपास राहील.

शक्यतेची टक्के वारी= * = ५१ ते ७५ टक्के / ** = २६ ते ५० टक्के, /*** = < २५ टक्के.

 

संदर्भ : भारतीय हवामान शास्त्र विभाग , पुणे.

Related posts

Shares