Search

मुंबई ए.पी.एम.सी. मध्ये भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव

मुंबई ए.पी.एम.सी. मध्ये भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव

मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या विविध उत्पादनांचे दर ज्याप्रमाणे त्यांची आवक होते त्याप्रमाणे बदलत असतात. आता आपण मुंबई कृषी उत्पन्न बजार समिती मधील विविध उत्पादनांच्या ताज्या बाजारभावावर नजर टाकूया. एक नंबर टोमॅटोची 2 हजार 60 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोस 1000 ते 1400 व सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजार समितीत सातारी आले, काकडी, भेंडी, कारले, ढोबळी मिरची, दोडका, वाटाणा या भाज्यांचे दर वधारले होते. आल्याची 170 क्विंटल आवक झाली. आल्याला 3000 ते 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. बटाट्याची 9 हजार 680 क्विंटल आवक झाली. बटाट्याला 1000 ते 1200 व सरासरी 1100 रुपये प्रतिक्विंटल दर होता. वाटाण्याची एक हजार क्विंटल आवक झाली. वाटाण्यास 4 ते 5 हजार व सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. कांद्याची 9 हजार 200 क्विंटल आवक झाली. कांद्यास 1200 ते 1600 व सरासरी 1000 रुपये प्रतिक्विंटल दर होता.

ढोबळी मिरचीची 890 क्विंटल आवक झाली. त्यास किमान 1600, कमाल 2000 व सरासरी 1800 रुपये प्रतिक्विंटल दर होता. फ्लॉवरची 1 हजार 420 क्विंटल आवक झाली. त्यास 1000 ते 1400 व सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. काकडी (नं.1) ची 910 क्विंटल आवक झाली. काकडीस 1400 ते 1800 व सरासरी 1600 रुपये प्रतिक्विंटल दर होता. कारल्याची 650 क्विंटल आवक झाली. कारली 1800 ते 2400 व सरासरी 2100 रुपये प्रतिक्विंटल दर होता.

मुंबई “ए.पी.एम.सी.” तील आवक व दर (रुपये/क्विंटल)

शेतीमाल—आवक—किमान—कमाल दर

भेंडी नं.1—270—1800—2200

गाजर—900—1000—1400

कोबी—1570—400—800

रताळी—100—800—1000

वांगी—190—1200—1600

मिरची ज्वाला—1175—2800—3000

कोथिंबीर—380—1600—1800

सादर केलेले दर हे ५ मे  रोजीचे आहेत.

 

स्त्रोत – अग्रोवन

Related posts

Shares