Search

राष्ट्रिय अभियंता दिन विशेष : ह्यांनी रचिला पाया भारतात जलसिंचनाचा “डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरेय्या”

राष्ट्रिय अभियंता दिन विशेष : ह्यांनी रचिला पाया भारतात जलसिंचनाचा “डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरेय्या”

स्वातंत्र्यपुर्व काळातील अनेक ऐतिहासिक वास्तु आपण बघतो आणि इंग्रजांच्या काळात झाल्या असल्यामुळे त्यांच्या बांधकाम शास्त्रातील निपुणतेचे आपण  तोंडभरुन कौतुक करतो. परंतु जे त्यांना जमते ते आपल्याला का जमु नये? हा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि आपणही हे करुन दाखवायचे असा चंग त्यांनी मनात बांधला. ह्यातुनच स्वातंत्र्यपुर्व भारताला जलसिंचन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा  एक महान अभियंता, विचारक, शास्त्रज्ञ जन्माला आला त्यांचे नाव “डॉ. मोक्षगुंडन विश्‍वेश्‍वरैया”.

 

त्यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी सप्टेंबर १५, इ.स. १८६१ रोजी झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकटलक्षम्मा होते.

ते मूळचे कर्नाटकातील मदनहळ्ळी गावचे होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असूनही ते पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून १८८३ मध्ये सर्वप्रथम येऊन पदवीधर झाले.

मुंबई प्रांताच्या पाटबंधारे खात्यात मुख्य अभियंता म्हणून त्यांनी अभिनव कल्पनांचा उपयोग करून रचनात्मक कार्य सुरू केले.

त्यांनी केलेले काम ‘ब्लॉक सिस्टीम’ आणि ‘ऑटोमॅटिक गेट्स’ म्हणून आजही परिचित आहे, कारण त्यामुळे पाणी-साठवण करण्याची धरणांची क्षमता वाढली.

मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा पाणीपुरवठा त्यांनी सुधारला.

 

डॉ.विश्वेश्वरय्यांचे कार्य:

 • १८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी व शुद्धिकरणासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘सक्कर’ बंधाऱ्याची योजना केली व या योजनेच्या यशामुळे त्यांना “केसर ए हिंद” नावाने गौरविण्यात आले.
 • बैंगलोर, पूणे,म्हैसूर, बड़ौदा, कराची, हैदराबाद, ग्वालियर, इंदौर, कोल्हापुर, सूरत, नाशिक, नागपुर, बीजापुर, धारवाड़ सहित अनेक भागांत जलसिंचन व्यवस्था करुन जलसमृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.
 • १८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टिम शोधून काढली ही कृषी सिंचन क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल.
 • तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित दरवाजाची रचना केली.
 • त्यांनी शिवसमुद्रम, शिंशा, गिरसप्पा, कृष्णराजसागरसाठी अनेक धरणांच्या योजना आखून कार्यवाही केली, त्यामुळे घराघरांतून वीज खेळविली गेली व अनेक कारखाने सुरू झाले.
 • डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली व त्याच्या नजीकच वृंदावन बगच्याची रचना केली हा बगिचा आजही पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
 • विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली.
 • विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
 • याचबरोबर मा.महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळकांबरोबर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी कार्य केले.
 • व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या वाढीसाठी त्यांनी ‘बँक ऑफ म्हैसूर’ च्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता..
 • डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान व दारिद्‌र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.
 • म्हैसूर सोप फॅक्टरी,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.
 • त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटांनी त्यांची टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.
 • देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे, यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते. त्यांनी या विषयावर ‘प्लॅन्ड इकोनॉमी फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले आहे.

डॉ. विश्वेश्वरय्यांचा सन्मान

 • डॉ.विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी.लिट उपाध्या मिळाल्या होत्या.
 • ते म्हैसूर संस्थान येथे दिवाण(प्रधानमंत्री) असतांना त्यांना जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले.
 • ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ या उपाधीने गौरिवले
 • विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला.
 • देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले.
 • सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते.
 • देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेन्द्रप्रसाद यांनी १९५५ साली ‘भारतरत्न’ या उपाधीने सन्मानित केले.
 • त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात आले आहे.

त्यांनी देशात इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन, ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Related posts

Shares