Search

जायफळ काढणी पश्चात तंत्रज्ञान

जायफळ काढणी पश्चात तंत्रज्ञान
[Total: 2    Average: 3/5]

जायफळ… बहुगुणकारी आणि उपयोगी असा मसाल्याचा पदार्थ… जायफळाचे मुळस्थान हे इंडोनेशियातील मोलुक्कास बेटात आहे. पण जायफळाचा औषधी गुणधर्म त्याला जागतिक महत्व प्राप्त करून गेला. जायफळाला गोड, मसालेदार, उग्र गंध आणि तिखट चव असते. तर जायपत्रीला तिखट, कडवट आणि उग्र वास असतो. जायपत्री रंगाने पिवळट करडी किंवा नारंगी रंगाची असते. जायफळाचा उपयोग प्रामुख्याने गोड पदार्थ, मिठाई, गोड मेवा, केक या पदार्थात केला जातो, तर जायपत्री ही प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरली जाते.

Jayfal green

जायफळाचे झाड बहुवर्षायु असते. याची लागवड कोकणात समुद्रकिनारी गाळाच्या जमिनीत, बागेत छायेखाली चांगली होते. जायफळाचे झाड शोभिवंत असते. साल मऊ असते आणि आंतरसाल लाल असते. सदापर्णी झाडाची पाने लांबट भाल्यासारखी रुंद असतात. पाने वरून भुरकट व खालून करडी असतात.  फळे झाडावर फार दिवस टिकून राहतात. जायफळाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

jaypatri

जायफळाच्या झाडापासून जायफळ बी व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात. मसाल्यामध्ये जायपत्री आणि जायफळाचा उपयोग केला जातो. कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण सुगंधा’, ‘कोकण स्वाद’ व ‘कोकण श्रीमंती’ या जाती विकसित केल्या आहेत.

जायफळाच्या झाडास किडी रोगांपासून फारसा उपद्रव होत नाही. क्वचित फळ कुजणे हा रोग आढळून येतो. यासाठी १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करून ह्या रोगावर नियंत्रण मिळविता येते.

काढणी व उत्पादन :

कलमांची लागवड केल्यापासून चार वर्षात फळांचे उत्पन्न सुरु होते. रोपांपासून लागवड केल्यास सुमारे ५० टक्के नर झाडे मिळतात आणि मादी झाडापासून फळांचे उत्पन्न ७ ते ८ वर्षानंतर मिळते. झाडापासून वर्षभर फळे मिळत असली तरी जुलै ते सप्टेंबरमध्ये सर्वाधिक फळे मिळतात.

jayfal flower

जायफळाला फूले आल्यानंतर फलधारणा ते काढणी पर्यंत ८ ते १० महिन्याचा कालावधी लागतो. जायफळाला वर्षभर फूले येत असतात. परंतु जुलै-ऑगस्‍ट आणि फेब्रूवारी मार्च या कालावधीत फळांची जास्‍त काढणी केली जाते. पुर्ण पक्‍व झालेल्‍या फळांचा रंग पिवळा होतो. तसेच पूर्ण पक्व फळांच्या टरफलाला तडा जातो. अशी फळे गोल करावी अथवा काढावी. टरफल काढून जायपत्री व जायफळ वेगळे करावे. सात दिवसांत जायपत्री तर १५ ते २० दिवसांत बी वाळते.

jayfal & javitri

पावसाळ्यात बी वळवणी यंत्रात ५५ ते ६० अंश सेल्सिअस तपमानास वळवावी किंवा उन्हात वळवावी. दहा वर्षाच्या कलमी झाडापासून साधारण ५०० ते ६०० किलो फळे मिळतात.  पुर्ण वाढीच्‍या मादी झाडापासून 500 ते 800 फळे मिळतात. पंचवीस वर्षापर्यंत उत्‍पन्‍न वाढत जाते. पंचवीस वर्षाच्‍या झाडापासून दोन ते तीन हजार फळे मिळतात. 60 ते 70 वर्ष या झाडापासून किफायतशिर उत्पन्न मिळते.

Related posts

Shares