Search

सेंद्रिय शेतीसाठीची मानके

सेंद्रिय शेतीसाठीची मानके

यापुढील सेंद्रिय शेती या विभागातील  सदरात आपण सेंद्रिय शेती करण्यापूर्वीचे निकष, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, विविध योजना, सेंद्रिय शेती कार्यक्रम पद्धती, सेंद्रिय शेती प्रचारप्रसिद्धी, अभ्यास दौरे, शेतकरी शेती कामकाजाच्या समूहासाठी विविध अनुदान, राष्ट्रिय फलोत्पादन विकास संस्थेच्या शेती प्रोत्साहानासाठी योजना , सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी  इ . सर्व गोष्टीची माहिती आम्ही आपल्याला प्रत्येक सेंद्रिय शेतीच्या सदरातून देणार आहोत. त्यामध्ये मुख्यत सेंद्रिय शेती करण्याची गरज आपण मागील सदरात बघितले आता ह्या सदरात सेंद्रिय शेतीची काय मानके असतील ते बघूया.

जे बी, बियाणे आपण वापरणार आहोत ते गावरानच वापरावे कारण ते रोग व कीड प्रतिकारक असतात आणि कोणत्याही वातावरणात ते उत्तम वाढतात. जर आपल्याकडे असे काही उपलब्ध नसेल तर आपण आपल्या शेतीत पूर्वी तयार केलेले बियाणे वापरावे.

पिकाची फेरपालट करून जमिनीतील अन्नद्रव्याचे परमान वाढून कीड व रोगाचे नियत्रण होते .

शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतीत उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ, हिरवळीची खते , गांडूळ खते , कंपोस्ट खत , खोल मुळे असणाऱ्या वनस्पती तसेच द्विदल पिकाची लागवड करणे जरुरी आहे.

पिक लागवडीच्या आधी बीज पारंपारिक व नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा. उदा. गोमुत्र, राख, जीवाणू खत ई .

पिक संरक्षणासाठी निंबोळी अर्क , सापळा पिके, मित्र पिके, लसुन मिरची ताक मिश्रण, परोपकारी जीवजंतू व कीटकांचा वापर करावा.

पिकाची वाढ होण्याकरिता रासायनिक संप्रेरकाचा वापर न करता शेती व परिसरातील वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीवजंतूपासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेली कीड व रोग नियंत्रक वापरावीत.

शेजारील शेतीतून रासायनिक खते येणार नाहीत याची काळजी घ्यावीत.

पाण्याचा स्रोत असणारे विहीर, नदी, नाला, ओढा, तलाव हे प्रदूषणमुक्त असावे किवा त्यास प्रदूषणापासून संरक्षण करावे.

पाळीव पक्षी, प्राणी यांना सेंद्रिय आहार द्यावा व त्याच्या आरोग्याचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण करावे.

साठवणुकीकरता पारंपारिक नैसर्गिक योजना म्हणजेच कडूनिंबाचा पाला , राख यांचा वापर करावा.

सेंद्रिय शेतकर्याने  आपल्या दैनदिन नोंदवहीत सर्व कामाची नोंद करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय शेती करताना रासायनिक पदार्थाचा वापर करू नये. सेंद्रिय शेती किवा शेतीमाल याचे प्रमाणीकरण करण्याकरिता शेती सलग तीन वर्षापासून रसायन मुक्त असावी.

शेवटी कस सेंद्रिय शेती करण्याचे ध्येय असावे अन्यथा पुन्हा जमिनीचे प्रदूषण, आरोग्याचे धोके वाढून हे दृष्टचक्र जास्तीच बलावणार आहे.

Related posts

Shares