Search

आर्थिक समृद्धीसाठी सेंद्रिय शेती

आर्थिक समृद्धीसाठी सेंद्रिय शेती

”शुद्ध बीजापोटी, रसाळ गोमटी” तुकाराम महाराज या पंक्तीत रसाळ गोमट्या फळाची महती सांगतात. उत्तम वाणाच बी जतन करण्याची आपली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली या बिजावारच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रस्थ बसवले आहे. पुढची पिढी उगवणारच नाही अशी निरंकुर बियाणे त्यांनी तयार केली आहेत त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक हंगामाला कंपनीच्या दारातच जायला लागत.

जगाच्या वाढत्या लोकसंख्येला पोटभर खाऊ घालायच्या उद्दीष्टाने काम सगळे काम करत असले तरी शेवटी नफा कमवणे हाच त्यामागचा उद्देश. रास्यानिक खताविना आपण शेतीच करू शकत नाही अशी मानसिकता शेतकरी बंधूची तयार झाली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊनही आजारचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नवीन आजाराचे नाव दररोज कानावर पडतेय. शेवटी ह्या सर्व आजाराचा स्रोत अन्न हेच आहे आणि आपली बदललेली जीवनशैली. आपल स्वास्थ्य हे वनस्पती, पशुपक्षी, आणि जमीन ह्या सर्वावर चालणारे आहे. सतत रसायनाच्या वापरामुळे आपली माती रोगट, अशक्त, आणि मृतवत होत चालली आहे. गांडूळ. जीवाणू, आणि बुरशी ह्या काही मातीच्या सुपिकतेला कारणीभूत असलेले  जीव नष्ट झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. आपण आपल्या बुद्धीकौशल्याने पंचमहाभूतामंध्ये हस्तक्षेप केला त्यामुळे भरपूर प्रगतीही झाली आणि शेवटी काय निसर्गावर मात करण्यापर्यंत त्याची महत्वाकांक्षा वाढली. या सर्व प्रगतीत  माणूस निसर्गापासून फक्त दूरच नाही तर निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध गेला. परस्परावर अवलंबून राहणारे सर्व सजीव नष्ट होत चालले आहेत माणसाने या सर्व जिवंत प्रक्रियांचा बळी देऊन निसर्गाच चक्र आपल्या हाती घेण्याचा मक्ता घेतला. निसर्गचक्राचा आदर नाही त्यावर विजय  मिळवण्याचा माणसाचा  अट्टहास आहे. आपल्या स्वतचा विचार आहे पण कदाचित या स्वतामध्ये संपूर्ण मानवजाती आहेच ना. पण हे कुठपर्यंत चालू शकेल ??

१८४० च्या सुमारास जस्टस लायबिग या जर्मन शास्र्ज्ञाने नत्र, स्फुरद , पालाश हे बाहेरून दिले तर वनस्पतीची जोमाने वाढ होईल असा शोध लावला. ते प्रत्यक्षात उतरलं आणि तिथून पुढे खर्या अर्थाने ‘रासायनिक शेती ‘ सुरु झाली. पण उण्यापुरया दोनशे वर्षाच्या आतच ते धोक्याच दिसू लागल.

कृत्रिम रसायनामुळे अन्नद्रव्यांच संतुलन ढासळू लागल, जमिनीच आरोग्य ढासळू लागल , जमीनीच आरोग्य बिघडलं आणि याचा परिणाम उत्पादनावर झाला या  सर्वाच बदल मातीच्या पोतात दिसतोये आणि ”कोंभाची लवलव । सांगे मातीचे मार्दव ” या तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे ते पिकातही उतरले. शेतीतल्या पिकलेल्या अन्नामध्ये कसच राहिला नाही त्यातली पोषकद्रवे ज्यातून शरीराच पोषण होत त्याचा ह्रास होत चालला आहे आणि दररोजच्या जीवनात होणारे बदल आपण बघतच आहोत. क्रोमियमसारखी अतिसुक्ष्म प्रमाणातील लागणारी, शरीरातील साखरेच्या व्यवस्थापनाला आवश्यक द्रव्य खोल जमिनीतून पिकाच्या मुळापर्यंत पोहोचविण्याच काम गांडूळ करत असतॊ. जर सेंद्रिय शेती वाढली तर मधुमेह, हृदयरोग या सर्वाना आपण आटोक्यात आणू शकतो.

एकीकडे नवनवीन होणारया आजारावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि दुसरीकडे अन्नातूनच आपण आपल्या शरीराचा ह्रास करत आहे हा केवढा विरोधाभास आहे. रसायनामुळे लिंगबदल, जन्मजात विकृती , व्यंग , कॅन्सर इतके भयानक आजार वाढत आहे .

आता ह्या सर्वाला उपाय आपल्याकडे फक्त सेंद्रिय शेतीकडे वाटचाल इतकाच राहिला आहे. गावरान गाईच्या शेणमुत्रापासून जीवामृत, मिश्र पिके , सापळा पिके , आछादन, पाण्याचा कमीत कमी वापर , वनभिंती , किड भक्षी पक्ष्यांना जागा तयार करणे , कामगंध सापळे , निंबोळी अर्क , पेंड, तेल , करंज पेंड या अशा अनेक पद्धतीतून आपण नैसर्गिक यत्रणांच अनुकरण करू शकतो.

आरोग्य आणि त्यासाठी आरोग्यदायी अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आज सर्वासाठी विषमुक्त अन्न प्रत्येकाला उपलब्ध झाल पाहिजे. त्यासाठी आपल्याला शेतीधोरण बदलावच लागेल. आपल्या कुटुंबाच आरोग्य , अगदी वैयक्तिक स्वार्थापासून ते शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबून पर्यावरणाला हातभार आपण नक्की तयार करू शकतो .

Carrot-Farming-in-Ooty

 

 

Related posts

Shares