Search

गुपित डाळींब लागवडीचे…भाग २

गुपित डाळींब लागवडीचे…भाग २

डाळींबावरील गुटी कलम :

 • डाळिंब उत्पादक प्रमुख राज्यामध्ये नवीन बागेच्या लागवडीकरिता गुटी कलमाद्वारे तयार केलेल्या रोपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
 • गुटी कलम करण्याकरिता सरळ वाढलेल्या, निरोगी, आणि ८ ते १५ मि. मि. जाडीच्या काडीची निवड करावी व आतील भागास इजा न होऊ देता अलगद गोलाकार कापून काढावी.
 • काप दिलेल्या भागावर २००० ते ३००० पी. पी. एम. तीव्रतेच्या इंडोल ब्युट्रिक असिड (आय. बि. ए.)चा लेप द्यावा.
 • साल काढलेल्या भागावर मॉस ओले करून चोहोबाजूंनी व्यवस्थित गुंडाळून त्यावर पोलिथिन मध्ये लावावी आणि रोप वाटिकेमध्ये जतन करवित.
 • गुटी कलम प्रामुख्याने जास्त आर्द्रता असणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये बांधावीत.

layer-pom
डाळींबावरील कीड व रोग

कीड

१) मावा : . या किडीच्या शरीरातूनही गोड चिकट पदार्थ स्रवतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पाने वेडीवाकडी होऊन फांद्यांची वाढ थांबते.

२) पिठ्या ढेकूण (Milley bug) : पिठ्या ढेकूण ही कीड ‘मिलीबग’ किंवा’ पांढर्‍या ढेकण्या’ या नवानेही ओळखली जाते. हे किटक झाडांवरील फळांवर देठांवर तसेच फळाच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर राहून पेशीद्रव्ये शोषणात. त्यावेळी कळ्या गळून पडतात.
३) फुलकिडे (Thrips): ही कीड पानांचा, फळांचा पृष्ठभाग खरडून त्यातील पेशिद्रव्य शोषून घेतात.
४) स्केल किंवा देवी किंवा खवले कीड. मध्यम व पुर्ण वाढ झालेले खवले किडे पानातून, कोवळ्या फांद्यातून व फळांतून रस शोषून घेतात. रस शोषणाच्या क्रियेमुळे फांद्या सुकतात व काही वेळा वाळून जातात.

५) फळे पोखणारी अळी (सुरसा अळी) : ही कीड मुख्यत्वे पावसाळ्यात मृग बहारावरील फळांवर आढळून येते. फळाला पाडलेल्या छिद्राद्वारे अळीची विष्ठा बाहेर येते. ही अळी रंगाने काळी व अंगावर पांढरे डाग असतात. पूर्ण वाढ झालेली अळी १७ ते २० मि.मी. लांब असते अशा फळात छिद्रावाटे जीवाणू तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळे कुजून खराब होतात. परिणामी उत्पादनात घट येते.

 

 

६) खोडकिडा :

झाड किंवा फांदी वाळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या झाडाचे बारकाईने निरीक्षण केल्यास या किडीचे अस्तित्व निदर्शनास येते. बिशेषत: जुन्या बागेत किंवा दुर्लक्षीत बागेत या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

खोडाच्या आतील भागात सरळ अथवा नागमोडी पोखरलेला भाग दिसतो. या संपूर्ण पोखरलेल्या भागात पोखरलेला भुस्सा आणि अळीची विष्ठा भरलेली दिसते खोडाच्या बुंध्याजवळ जमिनीवर लाकडी भुस्सा छिद्रातून पडून साचलेला दिसतो. यावरून खोडकिड्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होते.

व्यवस्थापनाकरीत उपाययोजना :

१) खोडावर किंवा फांद्यावर भुस्सा दिसल्यास त्या जागेवरील छिद्र साफ करून छिद्रात तारेच्या सहाय्याने अळीचा नाश करावा.

२) खोडावर/ फांद्यावर प्रादुर्भाव झालेल्या छिद्रामध्ये डायक्लोरव्हॉस १० मि. ली. किंवा फेनव्हलरेट ५ मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन किंवा पेट्रोल ५ मि. ली. छिद्रात इंजेक्शनच्या सहाय्याने सोडून छिद्रे चिखलाने अथवा लांबीने सिलबंद करावीत.

३) पावसाळी हंगामात जून – ऑक्टोबर कालावधीत कार्बारील ५० % विद्राव्य ४० ग्रॅम किंवा डायक्लोरव्हॉस २५ मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झाडांवर २ ते ३ वेळेस फवारणी करावी.

४) खोडाला जून – जुलै महिन्यात प्रतिबंधात्मक उपायांतर्गत मुलामा (पेस्ट) लावावी. त्यासाठी कॉपर ५०० ग्रॅम, गेरू ५०० ग्रॅम, प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम आणि चुना २५० ते ५०० ग्रॅम (झाडाच्या खोडाच्या आकारमानानुसार) १० लिटर पाण्यात पेस्ट करून कुंच्याने किंवा ब्रशने खोडाचे २’ ते २ ॥’ भागावर बहार धरतेवेळेस एकदा आणि नंतर दोन महिन्याने लावणे.

बाग स्वच्छ ठेवावी, झाडांची दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.

बोगेभोवती अथवा जवळपास शक्यतो एरंडी लागवड करू नये.

रोग –

डाळिंबावरील तेल्या रोग : तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास आक्झानोपोडीस पीव्ही पुनिकी या अणुजीवामुळे होतो असे आढळून आले आहे.

रोगग्रस्त भागातून आणलेल्या गुटीकलमाचा वापर केल्यास बागेत प्रथम रोगाची लागण होते.
बागेशेजारी रोगग्रस्त फळे आणि झाडाचे रोगग्रस्त अवशेष टाकल्यास त्यापासून बागेत रोगाचा प्रसार होतो.
बाग स्वच्छ न ठेवल्यास, त्याचबरोबर झाडांच्या दाटीमुळे हवा खेळती न राहिल्यास व सुर्यप्रकाशाचा अभाव असल्यास रोगाचा प्रसार आणि वाढ झपाट्याने होते.

pomo telya

रोगाची लक्षणे :

सुरुवातीला रोगग्रस्त पानावर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पानथळ तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येवून ते १ ते २ सेंमी. आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते, यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते.

काही वेळस ठिपक्यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते.

रोगाचे प्रथमावस्थेत आढळणारे तेलकट डाग, अनियमित, लंबगोलाकार आकाराचे तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले असतात. नंतर फळाला रोगग्रस्त भागावर आडवे – उभे तडे जातात व फळे सुकतात. फळावर थोडा जरी रोग आला तरी त्यांची प्रत पुर्णपणे खराब होते आणि फळांना बाजारभाव मिळत नाही.

 नियंत्रणासाठी उपाययोजना :

 1. हलक्‍या व मध्यम जमिनीत डाळिंब लागवड करावी.
 2. रोगग्रस्त भागांत शक्‍यतो हस्त बहर घ्यावा .
 3. लागवडीसाठी रोगविरहित प्रमाणित केलेली रोपे वापरावीत.
 4. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
 5. प्रत्येक झाडास तीन ते चार खोडे ठेवावीत.
 6. छाटणीसाठी व इतर अवजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1 लि. पाण्यात 50 ग्रॅम मोरचूद बारीक करून रघळून घ्यावे व या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मि. बुडवावे. नंतरच अवजारांचा वापर करावा.
 7. रोगग्रस्त पाने, फुले, फळे, फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
 8. बागेत जमिनीवर कॉपर डस्ट 4 टक्के (20 किलो प्रति हेक्टर) धुरळणी करावी.
 9. छाटणीनंतर खोडावर व छाटलेल्या भागावर बॅक्टीरियानाशक 50 ग्रॅम + कॅप्टन (5 टक्के) 500 ग्रॅम मि.लि. पाण्यात मिसळून तयार झालेल्या द्रावणाचा मुलामा द्यावा.
 10. छाटणीनंतर लगेचच 1 टक्का बोर्डोमिश्रणाची पहिली फवारणी करावी.
 11. दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने बॅक्टीरियानाशक 50 ग्रॅम + कॅप्टन (5 टक्के) 500 ग्रॅम मि.लि. पाण्यात मिसळून या द्रावणाची करावी.
 12. त्यानंतर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक सल्फेट (1 ग्रॅम) + मॅग्नेशिअम सल्फेट (1 ग्रॅम) + कॅल्शिअम नायट्रेट (1 ग्रॅम) + बोरॉन (1 ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी.
 13. बागेतील रोगाचे प्रमाण आणि रोग वाढीस अनुकूल हवामान असल्यास गरजेनुसार वरीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.१) मर रोग :
 • हा रोग झाडाच्या खोडाभोवती सतत ओलावा किंवा जमीन काळी असेल अथवा पावसाळ्याच्या सुरुवातीस उष्ण व आर्द्रतायुक्त हवामान असल्यास होतो.प्रथमत: एखादी फांदी वाळते. त्यानंतर त्याची तीव्रता वाढून संपूर्ण झाड वाळते. मुळे व खोडांचा आंतरर्छेद घेतला असता तपकिरी किंवा काळसर पट्टा दिसतो.


mar

 •  नियंत्रणासाठी उपाययोजना: 
 • कार्बेन्डॅझीमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. एक महीन्यानंतर हेक्टरी २.५ किलो ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसीस + १०० किलो शेणखत हे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी दर महिन्याला २ किलो शेणखत प्रती झाड खोडाजवळ मिसळून द्यावे.
 • मर रोग झालेल्या झाडांच्या आजूबाजूच्या २ ओळीतील झाडांना ट्रायकोडर्मा + पॅसिलोमायसिसचे प्रमाण ५ पटीने वाढवावे.

 

त्पादन :

कलमांपासून दीड ते दोन वर्षात उत्पादन सुरू होते, तर रोपांपासून अडीच ते तीन वर्ष उत्पादनास लागतात.

पहिला बहार – ६० ते ८० फळे ( १५ ते २५ किलो)

दुसरा बहार – ८० ते १०० फळे (२५ ते ३० किलो )

तिसरा बहार – १०० ते १५० फळे (३० ते ५० किलो)

झाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजे ५ ते ६ व्या वर्षापासून प्रत्येक झाडापासून २०० ते ३०० फळे मिळतात. १५ वर्षापर्यंत चांगले पीक येऊ शकते.

 

डाळिंब फळाचे तोडणीपूर्वी पक्व्तेची लक्षणे

11755838_1613534198903759_1154612024197080927_n

 • भगवा जातीचे फळ १५० तर गणेश जातीचे फळ १३५ दिवसांनी पक्व होतात.
 • भगवा जातीची फळे पक्व झाल्यानंतर गडद लाल व गणेश जाती मध्ये पिवळसर रंग येतो व दोन्ही मध्ये सालीवर चकाकी दिसून येते.
  पक्वतेत कळीच्या पुढच्या टोकाचा भाग आतील भागास वळतो व
 • फळांचा आकार कठीण बनतो आणि फळावरील साल खरवडली जाऊ शकते.
 • फळाला बोटांनी टिचकी मारल्यावर खणखण आवाज येतो.
 • पक्व्तेमध्ये भगवा जातीच्या फळातील दाणे भडक लाल तर, गणेश जातीतील दाणे फिक्कट गुलाबी दिसतात.

 

Related posts

Shares